AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरीच अगदी सोप्या पद्धतीने बनवा बाजारात मिळणारी मँगो मस्तानी, जाणून घ्या ही रेसिपी

आंब्याचा हंगाम सुरू झाला की आंब्यापासून वेगवेगळे पदार्थ तसेच पेय बनवले जातात. आंबा केवळ भारतातच नव्हे तर जगभरात त्याच्या चवीमुळे लोकप्रिय आहे. या आंब्याच्या हंगामात अगदी बाजारात मिळणारी मँगो मस्तानी या सोप्या पद्धतीने तुम्ही घरी बनवू शकता.

घरीच अगदी सोप्या पद्धतीने बनवा बाजारात मिळणारी मँगो मस्तानी, जाणून घ्या ही रेसिपी
Mango Mastani
| Edited By: | Updated on: Mar 31, 2026 | 3:10 PM
Share

भारतात आंब्याचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत आणि प्रत्येक जातीच्या प्रकारच्या आंब्याची स्वतःची अशी खास वैशिष्ट्ये आहेत. आंब्याच्या हंगाम सुरू झाला की बाजारपेठ आंब्यांनी भरून जाते आणि त्यासोबतच आंब्याची मागणीही भारतापुरती मर्यादीत न राहता आता परदेशात आंबा निर्यात केला जातो. कारण आंबे चविष्ट असण्यासोबतच पोषक तत्वांनीही परिपूर्ण असतात. व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत असण्यासोबतच, ते इतर अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजांनीही परिपूर्ण असतात. भारतीय स्वयंपाकघरात अनेक आंबट-गोड आणि मसालेदार पदार्थ बनवण्यासाठी कच्च्या आंब्यांचा वापर केला जातो, तर पिकलेल्या आंब्यांचा वापरही मँगो श्रीखंड आणि मँगो शेक यांसारखे अनेक पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. तर आजच्या लेखात आपण बाजारात मिळणारी मँगो मस्तानी घरच्या घरी अगदी त्याचप्रमाणे कशी बनवायची ते स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात.

क्रीमी टेक्सचर असलेली मँगो मस्तानी चवीला अप्रतिम लागते. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच हे पेय आवडते चला तर मग अगदी झटपट पद्धतीने मँगो मस्तानीची रेसिपी जाणून घेऊयात.

मँगो मस्तानीसाठी लागणारे साहित्य

1/2 कप पिकलेल्या आंब्याच्या फोडी, 2 मोठे चमचे साखर, 1 कप थंड दूध, 1/2 कप व्हॅनिला आईस्क्रीम, 8 मोठे चमचे बारीक कापलेला आंबा (वेगळा), 4 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम, 2 छोटे चमचे बदामाचे तुकडे, 2 छोटे चमचे पिस्त्याचे तुकडे, 2 छोटे चमचे रंगीबेरंगी टुटी-फ्रुटी

मँगो मस्तानी बनवण्याची पद्धत

  • मँगो मस्तानी बनवण्यासाठी प्रथम मिक्सरच्या जारमध्ये आंब्याच्या फोडी, साखर, दूध टाका आणि त्यात व्हॅनिला आईस्क्रीम टाका.
  • सर्व साहित्य पूर्णपणे एकजीव होईपर्यंत मिक्समध्ये क्रीमी टेक्सचर येईपर्यंत बारीक करा. त्यानंतर ते बाजूला ठेवा.
  • आता एक मोठा ग्लास घ्या. प्रथम त्यात 2 मोठे चमचे आंब्याच्या बारीक केलेले काप टाका. नंतर त्यावर 1/4 कप मँगो शेक टाका. आता ग्लासमध्ये व्हॅनिला आईस्क्रीमचा 1 स्कूप टाका. त्यानंतर २ मोठे चमचे बारीक कापलेला आंबा टाकून तुम्हाला अशी ग्लासमध्ये लेअर तयार करायची आहे.
  • आता पुन्हा 1/4 कप मँगो शेक टाका आणि त्यावर व्हॅनिला आईस्क्रीमचा 1 स्कूप ठेवा. ग्लास भरेपर्यंत ही प्रक्रिया पुन्हा करा. शेवटी मँगो मस्तानी बदामाचे तुकडे, पिस्त्याचे तुकडे आणि 1 चमचा टुटी फ्रुटीने सजवा.
  • सर्व्ह करताना, सर्व ग्लास एक-एक करून तयार करा. त्यानंतर, ते लगेच थंडगार सर्व्ह करा.

पिकलेल्या आंब्याचे 5 चविष्ट पदार्थ

मँगो मस्तानी व्यतिरिक्त तुम्ही पिकलेल्या आंब्यांपासून अनेक चविष्ट पदार्थ बनवू शकता. मँगो श्रीखंडसुद्धा अतिशय चविष्ट लागते. मँगो कुल्फी, गोड आम पापड, मँगो चीझकेक आणि मँगो कस्टर्ड हे पदार्थसुद्धा खूप चविष्ट लागतात. जेव्हा आंब्याचा हंगाम सुरू होतो तेव्हा तो फक्त फळ म्हणून खाऊ नका तर त्यापासून विविध प्रकारचे पदार्थ बनवून खाण्याचा आनंद घ्या.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
Sunetra Pawar | 'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्...
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्... भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर
मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
Amit Satam | मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण