Health Care : घरच्या-घरी तयार करा आरोग्यदायी गोकर्णाच्या फुलांचा चहा, जाणून घ्या खास रेसिपी!

गोकर्णाची फुले जशी दिसायला सुंदर आहेत, तशीच ती आपल्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहेत. दररोज सकाळी गोकर्णाच्या फुलांचा चहा घेतला तर आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. ही फुले निळ्या रंगाची असतात, ज्यामुळे चहाला निळा रंग येतो.

Health Care : घरच्या-घरी तयार करा आरोग्यदायी गोकर्णाच्या फुलांचा चहा, जाणून घ्या खास रेसिपी!
गोकर्णाच्या फुलांचा चहा

मुंबई : गोकर्णाची फुले जशी दिसायला सुंदर आहेत, तशीच ती आपल्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहेत. दररोज सकाळी गोकर्णाच्या फुलांचा चहा घेतला तर आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. ही फुले निळ्या रंगाची असतात, ज्यामुळे चहाला निळा रंग येतो. हा चहा तयार करण्यासाठी, तुम्हाला फक्त गोकर्णाची फुले, पाणी, मध, लिंबाचा रस आणि आले हे लागणार आहे. चला तर बघूयात हा खास चहा घरी कसा तयार करायचा.

गोकर्णाच्या फुलाच्या चहाचे साहित्य

6 खाण्यायोग्य गोकर्णाची फुले

1 टीस्पून लिंबाचा रस

1 चमचे मध

1 1/4 कप पाणी

1 इंच आले

स्टेप 1-

एक कपमध्ये किसलेले आले सह पाणी घाला. मध्यम आचेवर ठेवा आणि गरम होऊ द्या. आता त्यात गोकर्णाची फुल बारीक करून मिक्स करा.

स्टेप 2-

आच मध्यम ठेवा आणि चहाला पाच मिनिटे उकळू द्या.

स्टेप 3-

आता एका कपमध्ये चहा गाळून घ्या. लिंबाचा रस, मध घालून चांगले मिक्स करा आणि सर्व्ह करा.

चहा पिण्याचे आरोग्य फायदे-

गोकर्णाच्या फुलाच्या चहाचे अनेक फायदे आहेत. डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यापासून आणि हृदयाला बळकट करण्यापासून ते अँटिऑक्सिडंट्ससाठी हा चहा फायदेशीर आहे. हा चहा रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित करू शकतो. हा चहा शून्य-कॅफीन उत्पादन आहे. ज्यामुळे त्याचे फायदे अधिक होतात. हा चहा तणावाची पातळी देखील कमी करते.

या चहामध्ये किसलेले आले, लिंबू आणि मध मिक्स केल्याने त्याची चव अधिक चांगली होते. चहाला तिखट चव देण्यासाठी, चहा उकळताना तुम्ही दालचिनी, वेलची किंवा लवंगा घालू शकता. मात्र, गर्भवती महिलांनी आणि ऍलर्जी असलेल्या लोकांनी ते घेताना सावधगिरी बाळगली पाहिजे आणि नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

संबंधित बातम्या : 

Skin Care | चेहऱ्यावरील नको असणाऱ्या केसांमुळे त्रस्त आहात? पार्लर विसरा आणि ‘हे’ उपाय ट्राय करा!

तुम्हीसुद्धा सकाळी नाश्त्यामध्ये ‘पोहे’ खाता का? मग जाणून घ्या आरोग्यावर काय होतो परिणाम!


Published On - 9:01 am, Mon, 22 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI