Health care : आपल्या जीवनशैलीमध्ये ‘हे’ बदल करा आणि निरोगी आयुष्य जगा!

आपल्या आधुनिक जीवनात आपल्या अशा सवयी आहेत. ज्याचे पालन करणे आपल्याला चांगले वाटते. परंतु प्रत्यक्षात आपले आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्ती या सवयींमुळे हळूहळू कमी होते.

Health care : आपल्या जीवनशैलीमध्ये 'हे' बदल करा आणि निरोगी आयुष्य जगा!
आरोग्य

मुंबई : आपल्या आधुनिक जीवनात अशा सवयी आहेत, ज्याचे पालन करणे आपल्याला चांगले वाटते. परंतु प्रत्यक्षात आपले आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्ती या सवयींमुळे हळूहळू कमी होते. धूम्रपान करण्याइतक्याच 4 सवयी तुमच्या शरीरासाठी विषारी आणि घातक ठरू शकतात. या चार सवयी नेमक्या कोणत्या हे आज आपण बघूयात. (Make these changes in your lifestyle and live a healthy life)

अपुरी झोप

जर आपली पुरेशी झोप झाली नाहीतर दुसऱ्या दिवशी आपल्याला आळश आणि चिडचिडपणा होतो. चांगल्या झोपेकडे दुर्लक्ष केल्याने आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात. आरोग्य तज्ज्ञाच्या मते, आपले शरीर त्याच्या नैसर्गिक गतीने काम करत असते. दररोज किमान 6 तास झोप घेतली पाहिजे. झोपेच्या वेळेत कोणतीही तडजोड आपल्या रोगप्रतिकारक शक्ती, श्वसन आणि पाचन तंत्रांवर नकारात्मक परिणाम करते.

उच्च प्रथिनेयुक्त आहार घेणे

मांसासारख्या प्राण्यांच्या प्रथिनेयुक्त अन्नाचा जास्त वापर IGF1 नावाच्या संप्रेरकामुळे कर्करोगाच्या विकासास उत्तेजन देऊ शकतो. यासाठी जोखीम घटक धूम्रपानाच्या बरोबरीचा आहे. अशा प्रथिनांचे जास्त सेवन टाळण्यासाठी, आपल्या आहारात बीन्स सारख्या वनस्पती प्रथिने समाविष्ट करा.

दीर्घकाळ बसण्याची वेळ

दिवसभर एकाच जागी चिकटून बसणे धूम्रपान करण्याइतकेच धोकादायक आहे. अभ्यासानुसार दीर्घकाळापर्यंत बसणे, मग ते कामासाठी असो किंवा ड्रायव्हिंगसाठी, फुफ्फुस, स्तन आणि कोलन सारख्या वेगवेगळ्या कर्करोगाशी जोडलेले आहे. प्रत्येक एक किंवा दोन तास जागेवरून उठून थोडेतरी फिरले पाहिजे.

घरात बसून राहणे

जेव्हा आपल्या शरीराला प्रतिकारशक्ती निर्माण करणे किंवा परत मिळवणे गरजेचे असते. तेव्हा व्हिटॅमिन डी हे सर्वात महत्वाचे पोषक घटक आहे आणि सूर्य त्याचा मोठा स्रोत आहे. म्हणून 24 तास घरात बसून राहिल्याने आपल्या शरीराला नुकसान होते. यामुळे व्हिटॅमिन-डीची कमतरता येऊ शकते.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

(Make these changes in your lifestyle and live a healthy life)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI