AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नववर्षाच्या स्वागतासाठी तुमच्या कुटुंबाकरीता तयार करा ‘हे’ गाजराचे तीन डेझर्ट

नववर्षाच्या औचित्य साधून अनेक लोकं कितीही फिरले किंवा पार्टी केली तरी त्यांना घरात काहीतरी गोड हवे असते. या नवीन वर्षात गाजराच्या हलव्या व्यतिरिक्त त्यापासून बनवलेल्या तीन वेगवेगळ्या प्रकारच्या डेझर्ट ट्राय करू शकता, ज्याची चव तुम्ही पुन्हा चाखत राहाल.

नववर्षाच्या स्वागतासाठी तुमच्या कुटुंबाकरीता तयार करा 'हे' गाजराचे तीन डेझर्ट
recipe Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 31, 2024 | 10:16 PM
Share

बहुतेक लोकं नवीन वर्षाच्या स्वागतासाठी खूप उत्सुक आहेत आणि त्यानुसार प्रत्येकजण वेगवेगळे प्लॅनिंग करतात. येणारे नवीन वर्ष सुखाचे आनंदाचे जावे यासाठी काहीजण देवाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी देव दर्शनाला जातात. तर काहीजण सहलीला किंवा पार्टीला जातात. तर काहींना नववर्ष घरातच कुटुंबासोबत साजरे करायला आवडते. जर तुम्हीही अशा लोकांपैकी एक असाल जे कुटुंबासोबत घरी नवीन वर्ष साजरे करण्याचा प्लॅन करत असाल तर या दिवशी तुम्ही गाजरापासून बनवलेल्या डेझर्टपैकी एका पदार्थाचा तुमच्या फूड मेन्यू लिस्टमध्ये समावेश करू शकता. गाजर ही हिवाळ्यातील हंगामी फळ भाजी आहे जी उबदार आणि पौष्टिक समृद्ध आहे.

हिवाळ्यात येणाऱ्या हंगामी फळ भाज्यांपैकी गाजर हे खूप कमी लोकांना आवडत असले तरी गाजरापासून तयार केलेलं पदार्थ खायला खूप आवडते. गाजराचा हलवा ही सर्वात सामान्य पदार्थ आहे जी हिवाळ्यात खूप सहज सगळ्याच घरांमध्ये बनवून खाल्ली जाते. सध्या गाजराच्या पुडिंगव्यतिरिक्त अतिशय चविष्ट दिसणाऱ्या या गाजरापासून अनेक डेझर्टचे प्रकार तुम्ही बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया.

गाजराची खीर बनवा

गाजराचा हलवा तुम्ही भरपूर वेळा खाल्ला असेल. त्यातच गाजरापासून तयार केलेली खीरही खूप चविष्ट लागते. गाजराची खीर तयार करण्यासाठी गाजर सोलून किसून घ्या आणि नंतर चांगले शिजवा, जेणेकरून कच्चापणा दूर होईल. आता त्यात दूध घालून घट्ट होईपर्यंत चांगले शिजवावे. एका बाजूला कढईत देशी तूप घालून बदाम, काजू आणि इतर नुटस तळून घ्यावेत. ते चिरून खीरमध्ये घालावे. वेलची पूड घाला. तुम्ही तसेच गोडव्यासाठी यात साखर घालून छान मिक्स करून १० ते १५ मिनिट शिजवा. अश्याने तुमची चविष्ट गाजराची खीर तयार आहे.

गाजराची बर्फीही अप्रतिम लागते

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला तुम्ही गाजराची बर्फी बनवू शकता. यासाठी गाजर किसून घ्या. त्यानंतर एका कढईत देशी तूपात गाजराचा किस चांगले परतून घ्यावे. त्यात मिल्क पावडर आणि थोडे दूध घालून ढवळत रहा. जेव्हा ते घट्ट होऊ लागते तेव्हा त्यात ड्रायफ्रूट्स व साखर घालून पुन्हा घट्ट होईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर वरील मिश्रण एका तुपाने ग्रीस केलेल्या ट्रेमध्ये काढून ठेऊन द्या. काहीवेळाने मिश्रण यात सेट झाल्यावर तुम्हाला हवं असेल तर बर्फीसारखे काप करा किंवा लाडू ही बनवू शकता.

गाजराचा रसगुल्ला तुम्ही कधी ट्राय केला आहे का?

तुम्हाला माहीतच असेल कि गाजराची खीर, हलवा आणि बर्फीच आपण तयार करतो. पण कधी गाजरापासून रसगुल्लाही बनवून पाहिला आहे का? तर गाजरापासून तुम्ही घराच्या घरी अगदी सहज सोप्या पद्धतीने गाजराचा रसगुल्ला बनवता येतो. सध्या तो खूप ट्रेंडमध्येही आहे. गाजर किसल्यानंतर हलक्या आचेवर देशी तूपात शिजवावे. त्यानंतर यात थोडी साखर, दूध आणि रवा घालून शिजवा.

आता हे मिश्रण झाकून ठेवा व थंड होऊ द्या. कमीत कमी अर्ध्या रसगुतासानंतर मिश्रण थंड झाल्यावर त्याचे गोल लाडू आकारात देऊन तयार करा. त्यानंतर हे लाडू गरम तेलात तळून घ्या आणि एका कढईत पाक तयार करण्यासाठी साखर पाणी योग्य प्रमाणात घेऊन त्यात वेलची पूड आणि केशर घालून शिजवा. त्यानंतर तळलेले रसगुल्ले पाकात बुडवून ठेवा. गाजराचा रसगुल्ला गरम किंवा थंड सर्व्ह केले जाऊ शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही.)

चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.