AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सापासारखा दिसणारा ‘हा’ मासा आहे प्रचंड चविष्ट, औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध, कमी वजन कमी करण्याासून ते अनेक फायदे

रिबन मासा हा वेगळ्या पद्धतीचा मासा असून तो सापासारखा दिसतो. भारतात प्रामुख्याने हा मासा तामिळनाडू आणि श्रीलंकेच्या समुद्रांमध्ये आढळतो. त्याचा गरुवड नावाचा वाळलेला प्रकार ताजा माशा पेक्षा अधिक जास्त स्वादिष्ट लागतो.

सापासारखा दिसणारा 'हा' मासा आहे प्रचंड चविष्ट, औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध, कमी वजन कमी करण्याासून ते अनेक फायदे
आकांक्षा वाघ
आकांक्षा वाघ | Edited By: | Updated on: Jan 03, 2025 | 8:25 PM
Share

रिबन मासा हा एक वेगळा पद्धतीचा मासा आहे. ज्याच्या लांब आणि पातळ शरीरामुळे तो सापासारखा दिसतो. हा मासा उष्णकटिबंधीय समुद्रामध्ये आढळतो आणि त्याच्या पांढऱ्या आणि पिवळ्या रंगासाठी तसेच औषधी गुणधर्मांसाठी तो ओळखला जातो. तरुणांसाठी हा मासा सुपर फूड बनवू शकतो. जाणून घेऊया या माशाबद्दल. जेव्हा रिबन मासा बार्बलेस असतो तेव्हा त्याला स्वॉर्डफिश म्हणतात तर ज्याला काटे असतील तर त्याला खडू स्वॉर्डफिश म्हणतात. खोल समुद्रात पकडल्या जाणाऱ्या रिबन मासा काळा रंगाचा असतो तर किनारी भागात आढळणारा मासा हा राखाडी रंगाचा असतो. हा मासा सुमारे 100 सेंटीमीटर लांब आणि दहा किलो वजनाचा असू शकतो. मात्र मच्छीमारांना एक ते पाच किलो वजनाचे मासे मिळतात.

कुठे मिळतो हा मासा?

रिबन माशांना उष्णकटिबंधीय भागात राहणे आवडते. भारतामध्ये प्रामुख्याने हे मासे श्रीलंकेच्या आणि तामिळनाडूच्या जवळपासच्या समुद्रांमध्ये सापडतात. त्यांच्या आहारात लहान मासे आणि कोळंबी यांचा समावेश होतो. रात्रीच्या वेळी हे मासे समुद्राच्या किनाऱ्यावर येऊन कोळंबीची शिकार करतात आणि मच्छीमारांच्या जाळ्यात अडकतात.

रिबन माशाची चव सामान्य माशांपेक्षा चांगली आहे असे सांगितल्या जाते. तामिळनाडूतून विविध जिल्ह्यांमध्ये त्याची निर्यात केली जाते. हंगामामध्ये हा मासा 250 ते 350 रुपये किलो दराने विकला जातो. विशेष म्हणजे त्याचा गरुवड नावाचा वाळलेला प्रकार ताज्या माशा पेक्षा अधिक जास्त स्वादिष्ट लागतो. तामिळनाडूच्या रामेश्वरम येथील मच्छीमारांचे म्हणणे आहे की, गरुवडाची चव ताज्या माशांपेक्षाही चांगली लागते.

रिबन माशात असलेले औषधे गुणधर्म

  • ओमेगा 3 फॅटी ॲसिड: या माशात ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.
  • प्रथिने आणि सोडियम: उच्च प्रथिने आणि सोडियम फिटनेस किंवा वजन कमी करण्यावर लक्ष केंद्रीत करणाऱ्या तरुणांसाठी उत्तम पर्याय बनवतात.
  • व्हिटॅमिन बी 12: हे जीवनसत्व हृदय आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारते तसेच नैराश्य टाळण्यासाठी आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठी देखील मदत करते.
  • सांधेदुखीवर आराम: खालचा पाय आणि सांधेदुखी बरे करण्यासाठी हे फायदेशीर ठरते.

कसे करायचे रिबन माशयाचे सेवन?

  • रिबन मासा अनेक प्रकारे खाता येऊ शकतो.
  • फिश करी
  • ग्रिल्ड फिश
  • गरुवड

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला