AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वयंपाकघरात दडले आहे चमकदार त्वचेचे रहस्य, ‘या’ गोष्टी आहेत सर्वोत्तम एक्सफोलिएटर्स

बदलत्या वातावरणाचा आपल्या आरोग्याबरोबर आपल्या त्वचेवर सुद्धा परिणाम होत असतो. अशातच प्रत्येकाला चमकदार त्वचा हवी असते. यासाठी त्वचेला एक्सफोलिएट करणे आवश्यक आहे.

स्वयंपाकघरात दडले आहे चमकदार त्वचेचे रहस्य, 'या' गोष्टी आहेत सर्वोत्तम एक्सफोलिएटर्स
| Edited By: | Updated on: May 10, 2025 | 10:05 PM
Share

वातावरणातील बदल तसेच दमट हवामान यामुळे यासर्वांचा परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. तसेच त्वचेच्या समस्या निर्माण होण्यास सुरूवात होत असते. तर याच समस्या दुर करण्यासाठी दर 8 ते 10 दिवसांनी त्वचेला एक्सफोलिएट करावे. यामुळे चेहऱ्यावर साचलेली घाण निघून जाते आणि मृत त्वचेच्या पेशी देखील निघून जातात. त्यातच चेहऱ्यावर स्क्रबिंग केल्याने छिद्रे खोलवर साफ होतात आणि ब्लॅकहेड्स होण्याची शक्यता कमी होते.

पण त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी अनेकजण बाजारात उपलब्ध असलेले प्रॉडक्टचा योग्य फायदा प्रत्येकाच्या त्वचेला होत नाही. कारण त्यामध्ये असलेले कॅमिकल त्वचेचे काळातरांने नुकसान करते. अशा वेळेस त्वचेवर कोणतेही दुष्परिणाम होऊ नये यासाठी नैसर्गिक गोष्टी वापरणे चांगले. तुमच्या स्वयंपाकघरातच असे काही घटक आहेत जे त्वचेसाठी वरदानापेक्षा कमी नाहीत. तुमच्या त्वचेला एक्सफोलिएट करण्यापासून ते टॅनिंग काढून टाकण्यापर्यंत, पिंपल्सपासून मुक्तता मिळवण्यापर्यंत आणि तुमचा रंग सुधारण्यासाठी तुम्ही या घटकांचा वापर करू शकता.

उन्हाळ्यात तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला नुकसान होते, त्याशिवाय, घामामुळे, चेहऱ्यावर धूळ लवकर जमा होते आणि छिद्रांमध्ये जमा होते. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स, व्हाईट हेड्स, ब्लॅकहेड्स सारख्या समस्या येऊ लागतात. एक्सफोलिएशन सतत करून या समस्या टाळता येतात. स्क्रब म्हणून काम करणाऱ्या अशा घटकांबद्दल आजच्या या लेखात जाणून घेऊया.

मसूर डाळीचे पीठ स्क्रब म्हणून काम करते

नैसर्गिक एक्सफोलिएटरबद्दल बोलायचे झाले तर, तुम्ही मसूर वापरू शकता. यामुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जातील आणि त्वचा मऊ होईल. यासाठी प्रथम डाळ काही तास पाण्यात भिजत ठेवा. आता ही डाळ बारीक करा आणि कच्च्या दुधात मिक्स करून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि काही वेळ तसेच राहू द्या. नंतर हलक्या हातांनी गोलाकार हालचालीत मसाज करून त्वचेला एक्सफोलिएट करा.

ओटस देखील एक उत्तम घटक

नाश्त्यासाठी ओटस हा एक चांगला पर्याय आहे, जो तुमच्या त्वचेसाठी देखील चांगला आहे. हे संवेदनशील त्वचेसाठी देखील चांगले मानले जाते. ओटस दही किंवा पाण्यात मिसळून पेस्ट बनवा, नंतर तयार पेस्‍ट तुमच्या चेहऱ्यावर स्क्रब करा. तुम्ही तुमच्या हातांची आणि पायांची त्वचा देखील एक्सफोलिएट करू शकता.

स्वयंपाकघरात ठेवलेली साखर

आरोग्यासाठी साखर कमी खाणे उचित आहे, परंतु ते तुमच्या त्वचेसाठी एक उत्तम एक्सफोलिएटर म्हणून काम करते. जर तुम्हाला साखरेने स्क्रब करायचे असेल तर त्यात मध किंवा बदाम-ऑलिव्ह तेल टाका. जर तुम्हाला तुमचा चेहरा स्क्रब करायचा असेल तर तुम्ही साखर हलकी बारीक करू शकता जेणेकरून दाणे बारीक होतील. साखर, मध आणि लिंबाचा रस मिक्स करून हात आणि पायांची त्वचा एक्सफोलिएट केल्याने काळेपणा दूर होतो.

कॉफी देखील एक एक्सफोलिएटर आहे

तुम्ही कॉफी पावडरने त्वचेला एक्सफोलिएट करू शकता. मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यासाठी हे एक उत्तम स्क्रब म्हणून काम करते. यामुळे त्वचेमध्ये रक्ताभिसरण देखील वाढते. कॉफीमध्ये ऑलिव्ह किंवा नारळाचे तेल मिसळून तुम्ही हळूवारपणे स्क्रब करू शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.