AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सॅल्मोन माशाचे शरीराला 10 फायदे, थायरॉईड अॅनेमिया आजारांवर गुणकारी

साल्मन माशाचे शरीराला 10 फायदे, थायराईड अॅनेमिया आजारांवर गुणकारी (know 10 benefits to the body of salmon fish curative for thyroid anemia)

सॅल्मोन माशाचे शरीराला 10 फायदे, थायरॉईड अॅनेमिया आजारांवर गुणकारी
सॅल्मोन माशाचे शरीराला 10 फायदे
| Updated on: Feb 24, 2021 | 8:34 PM
Share

मुंबई : निरोगी जीवनासाठी, आहारात निरोगी अन्नाचा समावेश करणे फार महत्वाचे आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या म्हणण्यानुसार आपण आठवड्यातून किमान दोनदा समुद्री मासे खायला हवे. आरोग्य तज्ञ यासाठी साल्मन फिश खाण्याची शिफारस करतात, जे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. आम्ही आपल्याला सॅल्मोन फिश खाण्याचे 10 मोठे फायदे सांगणार आहोत. (know 10 benefits to the body of salmon fish curative for thyroid anemia)

ओमेगा-3 फॅटी अॅसिड : सॅल्मोन हे ओमेगा -3 फॅटी अॅसिडचे चांगले स्रोत मानले जाते. एका अभ्यासानुसार या अॅसिडचे शरीराला बरेच फायदे आहेत. हे ड्राय आय डिसीज, रयूमेटॉयड अर्थरायटीससह आपल्या

प्रोटीन : युनायटेड स्टेट्स ऑफ एग्रीकल्चर विभागाच्या मते, 100 ग्रॅम साल्मन फिशमध्ये सुमारे 20 ग्रॅम प्रथिने असतात. महिलांच्या शरीराला एका दिवसात सुमारे 14 ग्रॅम प्रथिने आवश्यक असतात, तर पुरुषांच्या शरीराला सुमारे 46 ग्रॅम प्रथिने आवश्यक असतात. सॅल्मोन फिश आपल्या स्नायूंनाही बरे करते.

मूड स्विंग आणि झोप : सॅल्मोन फिशमध्ये ट्रायप्टोफॅन नावाचा अमिनो अॅसिड देखील असते. यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या म्हणण्यानुसार जेव्हा हे अॅसिड शरीरात तयार होत नाही तेव्हा आहारातून याची कमी भरुन काढता येते. ट्रिप्टोफेन शरीराला मेलाटोनिन आणि सेराटोनिन सारखे हार्मोन्स तयार करण्यास मदत करते. माणसाचे मूड स्विंग आणि झोपेचे चक्र या हार्मोन्सवर अवलंबून असतात.

प्रतिकारशक्ती : जर आपली रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असेल तर आपण आहारात सॅल्मोन फिशचा समावेश करणे आवश्यक आहे. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा पोषक तत्व आहे. त्यात असलेले व्हिटॅमिन-ए केवळ आपल्या प्रतिकारशक्तीसाठी चांगले नाही तर पुनरुत्पादक प्रक्रिया आणि डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहे.

थकवा आणि कमजोरी : सॅल्मोन फिशमध्ये व्हिटॅमिन-बी 12 देखील आढळते. क्लीव्हलँड क्लिनिक्स सेंटर फॉर ह्युमन न्यूट्रिशन, व्हिटॅमिन-बी 12 च्या कमतरतेमुळे थकवा, बद्धकोष्ठता, भूक न लागणे आणि शारीरिक कमजोरी येते.

बॉडी सेल्स फंक्शन : सॅल्मोन फिशमध्ये उपस्थित व्हिटॅमिन बी 3 शरीरात जाणाऱ्या अन्नाला उर्जेमध्ये रूपांतरीत करते. तसेच, आपल्या शरीरातील पेशींच्या कार्यासाठी हे खूप महत्वाचे मानले जाते.

थायरॉईड हार्मोन्स : सॅल्मोन फिशमध्ये रोगप्रतिकारक बूस्टिंग पोषक तत्व असतात. सेलेनियमयुक्त अन्नाचे आपल्या शरीराला बरेच फायदे आहेत. हे थायरॉईड हार्मोन्स मेटाबॉलिज्म, रिप्रोडक्शन आणि डीएनए सिंथेसाइसिससाठी चांगले आहेत.

ग्लुटामाईन : ग्लूटामाइन हा अल्फा अमिनो अॅसिड आहे जे प्रोटीनच्या जैव संश्लेषणात वापरले जाते. हे 20 अमिनो अॅसिडपैकीच एक आहे. ग्लूटामाईनचे मुख्य कार्य प्रथिने बनविणे. आपल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी आणि आतड्यांसाठी हे चांगले आहे. शरीरात नायट्रोजन संतुलन राखते.

लोह : सॅल्मोन फिश लोहाचेही उत्तम स्रोत मानले जाते, जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. लोह आपल्या फुफ्फुसातून इतर ऊतकांमध्ये ऑक्सिजन पोहोचवण्याचे कार्य करते. याव्यतिरिक्त, ते मसल मेटाबॉलिज्मला सपोर्ट करते. लोहाच्या कमतरतेमुळे स्त्रियांमध्ये अशक्तपणा येतो. म्हणूनच महिलांना साल्मन फिशचे सेवन करण्याचा विशेष सल्ला दिला जातो.

अँटीऑक्सिडंट : सॅल्मोन फिशमध्ये एस्टॅक्सॅथिन नावाचा अँटीऑक्सिडंट आढळतो. नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थच्या म्हणण्यानुसार हे अँटीऑक्सिडेंट्स आपल्या पेशींच्या कार्यास सपोर्ट करतात आणि शरीराचे अनेक आजारांपासून बचाव करतात. (know 10 benefits to the body of salmon fish curative for thyroid anemia)

इतर बातम्या

Weather change sickness । बदलत्या हवामानात चुकूनही करु नका या 5 चुका, आजारी पडाल

आता चार्जिंग पॅडशिवाय फोन होणार चार्ज, ओप्पोची नविन टेक्नोलॉजी

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.