Osteoporosis Diet : मजबूत हाडांसाठी उन्हाळ्यात खा ही फळे, जाणून घ्या यांचे आरोग्यदायी फायदे

मुंबई : सांधे आणि हाडांच्या वेदना केवळ असह्य नसतात, तर या वेदना आपल्या दैनंदिन कामात अडथळा आणतात. ऑस्टिओपोरोसिस हा एक आजार आहे जो तुमची हाडे खूपच कमकुवत किंवा नाजूक करतो, परिणामी शेवटी हाडांचे नुकसान होते. आपले शरीर सतत जुन्या हाडांच्या टिश्यूला नव्यामध्ये रूपांतरीत करते, तर ऑस्टिओपोरोसिसमध्ये, नवीन हाडांची निर्मिती उशिरा होते. यामुळे मुख्यतः वृद्ध किंवा […]

Osteoporosis Diet : मजबूत हाडांसाठी उन्हाळ्यात खा ही फळे, जाणून घ्या यांचे आरोग्यदायी फायदे
मजबूत हाडांसाठी उन्हाळ्यात खा ही फळे
Follow us
| Updated on: Mar 26, 2021 | 7:45 AM

मुंबई : सांधे आणि हाडांच्या वेदना केवळ असह्य नसतात, तर या वेदना आपल्या दैनंदिन कामात अडथळा आणतात. ऑस्टिओपोरोसिस हा एक आजार आहे जो तुमची हाडे खूपच कमकुवत किंवा नाजूक करतो, परिणामी शेवटी हाडांचे नुकसान होते. आपले शरीर सतत जुन्या हाडांच्या टिश्यूला नव्यामध्ये रूपांतरीत करते, तर ऑस्टिओपोरोसिसमध्ये, नवीन हाडांची निर्मिती उशिरा होते. यामुळे मुख्यतः वृद्ध किंवा स्त्रियांना नुकसान पोहचवते, परंतु आजकाल ही समस्या अगदी तरुणांमध्येही सामान्य झाली आहे. (know the health benefits of eating this fruit in summer for strong bones)

हंगामी फळे खा

ही चिंतेची बाब आहे कारण ऑस्टिओपोरोसिसने ग्रस्त लोकांना किरकोळ टक्करनेही गंभीर दुखापत होऊ शकते आणि आराम मिळण्यास बराच काळ लागू शकतो. जर आपल्यालाही अशी लक्षणे जाणवत असतील तर समस्या अधिक वाढण्यापूर्वी ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. या व्यतिरिक्त काही हंगामी फळांचे सेवन करुनही हाडे मजबूत करु शकता. ही फळे नैसर्गिकरित्या हाडे मजबूत करण्यासाठी ओळखली जातात. मजबूत हाडांसाठी आपण उन्हाळ्यातील काही फळे खावी.

सफरचंद

सफरचंद हे वर्षभर उपलब्ध असणारे फळ आहे. सफरचंदामध्ये हाडांसाठी आवश्यक कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हे दोन घटक कोलेजन तयार करण्यासाठी आणि नवीन हाडांना उत्तेजन देण्याचे काम करतात.

पपई

हे गोड फळ उष्णता सहन करण्यास सक्षम बनवते. चांगली गोष्ट म्हणजे पपईं आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. व्हिटॅमिन सीने युक्त पपई खाल्ल्याने तुमची हाडे, त्वचा आणि प्रतिकारशक्तीवर चांगले परिणाम होऊ शकतात.

अननस

हे आंबट-गोड फळ पोटॅशिअमने भरलेले आहे. संशोधनानुसार, पोटॅशिअमचा वापर अॅसिडचा परिणाम कमी होण्यास मदत करू शकतो आणि अशा प्रकारे कॅल्शिअमची कमतरता काही प्रमाणात कमी होऊ शकते. याशिवाय हे व्हिटॅमिन ए आणि कॅल्शियमचा उत्कृष्ट स्रोत आहे. हे दोन्हीही मजबूत हाडांसाठी महत्त्वपूर्ण घटक आहेत.

स्ट्रॉबेरी

ही सुंदर लाल बेरी ताजेपणाने भरलेली असते आणि हे खाल्ल्याने आरोग्यास बरेच फायदे मिळतात. स्ट्रॉबेरीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात जे हाडांचे नुकसान होण्यास कारणीभूत फ्री रेडीकलच्या नुकसानाविरोधात लढायला मदत करतात. या व्यतिरिक्त हे फळ कॅल्शिअम, मॅंगनीज, पोटॅशिअम, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहेत. हे सर्व नवीन हाडांच्या निर्मितीस मदत करतात. (know the health benefits of eating this fruit in summer for strong bones)

इतर बातम्या

Skin care : ऑफिस शिफ्टमध्ये त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी वापरा या टिप्स, चेहरा दिसेल तजेलदार

Holi 2021 | रासायनिक रंगानी होऊ शकतो कर्करोगाचा धोका, होळीच्या रंगाचा बेरंग होण्यापूर्वी जाणून घ्या दुष्परिणाम!

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.