AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कमी झोप घेणे आरोग्यासाठी हानिकारक, हृदयावरही होतात परिणाम, कशी पूर्ण कराल झोप?

निरोगी राहण्यासाठी झोप खूप महत्त्वाची आहे. झोपेच्या कमतरतेमुळे अनेक शारीरिक आजार होऊ शकतात. दररोजच्या कामासाठी झोपेमुळे नवीन ऊर्जा निर्माण होते. तुम्ही दैनंदिन काम झोप पूर्ण झाल्यास व्यवस्थित रित्या करू शकतात.

कमी झोप घेणे आरोग्यासाठी हानिकारक, हृदयावरही होतात परिणाम, कशी पूर्ण कराल झोप?
sleep disordersImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 11, 2024 | 8:49 AM
Share

Sleeping Schedule Habit : तरुणांना सध्याच्या काळात सोशल मीडियाचा वेड लागलं आहे. यामुळे रात्र रात्रभर अनेक तरुण मोबाईल बघत बसतात. त्याचा झोपेवर परिणाम होतो. तरुणांना झोप कमी येणे ही समस्या बनली आहे. एकतर त्यांना मुद्दाम कमी झोप लागते किंवा कामाच्या तणावामुळे त्यांना कमी झोपावे लागते. कारण काहीही असो पण ठराविक तासांपेक्षा कमी झोप घेतल्याने अनेक बदल होतात. त्यामुळे अनेक आजार उद्भवण्याची शक्यता असते.

झोपताना आपल्या शरीरातील अनेक हार्मोन्स बाहेर पडतात. जे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की आपण रोज रात्री किती तासांची झोप घेणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते निरोगी राहण्यासाठी दररोज सात ते आठ तास झोप घेणे आवश्यक आहे. यापेक्षा कमी झोप घेतल्यास शरीरावर अनेक नकारात्मक परिणाम होतात.

नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, वीस वर्षाखालील मुले दररोज फक्त पाच तासांची झोप घेतात. जे त्यांच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. आजच्या आधुनिक जीवनशैलीमुळे लोकांच्या झोपेचे तास कमी झाले आहे. याचा त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. झोपेच्या कमतरतेने लोकांना उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, मधुमेह, कमकुवत प्रतिकारशक्ती अशा अनेक आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो आहे.

संशोधकांचे म्हणणे आहे की झोपेच्या कमतरतेमुळे जास्त कॅलरी असलेले अन्न खाल्ल्यानंतर आपल्याला पोट भरलेले वाटते. यामुळे ट्रायग्लिसराईड समृद्ध लीपोप्रोटीन वाढू लागतात. ज्यामुळे शरीराच्या धमन्यांमध्ये धोकादायक फॅटी प्लेक तयार होतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका हृदयाशी संबंधित आजार आणि पक्षाघाताचा धोका वाढू शकतो.

कमी झोप घेणे शरीरासाठी हानिकारक

रात्री कमी झोप घेतल्यामुळे फक्त शारीरिक नाही तर अनेक मानसिक समस्या देखील उद्भवतात कारण झोपेचा आपल्या शरीरावर तसेच आपल्या मनावर देखील विपरीत परिणाम होतो.

कमी झोपण्याची कारणे

रात्री उशिरा पार्टी करणे. तणावामुळे निद्रानाश. रात्रभर कार्यालयाशी संबंधित काम करणे. रात्रभर मोबाईलवर चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही पाहणे. रात्री जड अन्न खाणे.

पुरेशी झोप कशी घ्याल?

झोपण्यापूर्वी संगीत ऐका किंवा पुस्तके वाचा. ऑफिसचे काम रात्री उशिरापर्यंत करू नका. रात्री मोबाईल टीव्ही आणि इतर कोणत्याही स्क्रीन पासून दूर रहा. रात्री फक्त हलके अन्न खा. झोपण्यापूर्वी दिवे मंद करा. झोपण्याची वेळ निश्चित करा.

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.