AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips : कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘हे’ खास पेय प्या !

ध्याचा कोरोनाच्या काळात आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

Health Tips : कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी 'हे' खास पेय प्या !
| Edited By: | Updated on: May 09, 2021 | 7:01 AM
Share

मुंबई : सध्याचा कोरोनाच्या काळात आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. त्यामध्येही जर तुम्हाला कोरोनापासून दूर राहिचे असेल तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे गरजेचे आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला आहारात थोडासा बदल करावा लागणार आहे. ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल. (Mango and cucumber are beneficial for boosting the immune system)

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक खास पेय सांगणार आहोत. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे अतिशय चांगले आहे. यासाठी आपल्याला दोन आंबे, दोन काकडी, हळद, आले, 1 चमचे मध, ताज्या लिंबाचा रस आणि वेलची हे साहित्य लागणार आहे. आंबे आणि काकडी बारीक करून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये मध आणि लिंबाचा रस मिक्स करा.

हे अगोदर व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यामध्ये शेवटी आले घाला आणि या मिश्रणात पाणी घाला. हे पेय दिवसातून दोन वेळा पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. लिंबामध्ये ‘व्हिटॅमिन सी’ची मात्रा अधिक असते. यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत होते. लिंबामध्ये औषधी गुणधर्मही आहेत. थकवा दूर करण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी लिंबाचा उपयोग केला जातो.

सध्याचा कोरोनाच्या परिस्थितीमध्ये तर दररोज आहारामध्ये लिंबाचा समावेश करणे आवश्यक आहे. आल्यात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आहेत, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढवते. याशिवाय सर्दी आणि खोकल्यातदेखील आले खूप फायदेशीर ठरते. आल्यामुळे स्नायूंना आराम मिळतो. यात अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-ऑक्सिडंट, औषधी आणि उपचारात्मक असे बरेच गुणधर्म आहेत.

आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी सोबतच कॉपर, झिंक, पोटॅशियमसारखे अनेक मिनरल्स असतात. जे आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहेत. आंब्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी आंबा उपयुक्त ठरतो. आंब्यात शर्करा असल्याने आंबा खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. याशिवाय नुसता आंबा खाण्याऐवजी मॅंगो शेक किंवा कैरीचे पन्हे घेणेही अधिक फायदेशीर ठरु शकते.

संबंधित बातम्या : 

(Mango and cucumber are beneficial for boosting the immune system)

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.