miscarriage | गर्भपाताची लक्षणं आणि कारणं काय?, 8 पैकी एका महिलेला गंभीर धोका, NHS अहवाल काय सांगतो?, वाचा…

प्रेग्नेंसीच्या २० व्या आठवड्याआधीच बाळाचा मृत्यु होणं यालाच गर्भपात म्हणजेच (miscarriage) असं म्हणतात. साधारणत: गर्भावस्थेच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच गर्भावस्थेच्या पहिल्या तीन आठवड्यांमध्ये गर्भपाताचा धोका अधिक असतो.

miscarriage | गर्भपाताची लक्षणं आणि कारणं काय?, 8 पैकी एका महिलेला गंभीर धोका, NHS अहवाल काय सांगतो?, वाचा...
pregnancy

मुंबई :  प्रेग्नेंसीच्या २० व्या आठवड्याआधीच बाळाचा मृत्यु होणं यालाच गर्भपात म्हणजेच (miscarriage) असं म्हणतात. साधारणत: गर्भावस्थेच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच गर्भावस्थेच्या पहिल्या तीन आठवड्यांमध्ये गर्भपाताचा धोका अधिक असतो. गर्भपात होण्यास अनेक कारणं कारणीभूत असू शकतात आणि या गोष्टी आपण थांबवू शकत नाही. पण जर तुम्ही गर्भपाताची लक्षणे आणि संकेत योग्य वेळी ओळखलीत तर त्यावर उपचार करणं आणि हा धोका टाळणं अधिक सोपं जाऊ शकतं.

गर्भपात म्हणजे गर्भधारणेच्या पहिल्या तीन ते चार महिन्यांत गर्भाचा नाश. गर्भपाताची अनेक कारणे असू शकतात, परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये आईला चुकीचे मानले जाते पण आता नॅशनल हेल्थ सर्विस (NHS) यांनी एक अहवाल सादर केला आहे. त्या अहवालामध्ये त्यांनी गर्भपात होण्याची लक्षणे सांगितली आहेत.

गर्भधारण होण्यासाठी महिला व पुरुष दोघांनाही आयुष्याच्या जीवनरेखेत काही बदल करावे लागतात. कधी कधी ही सर्व मेहनत घेतल्यानंतर गर्भधारणा होते आणि ऐन उत्साहात जोडप्यांना गर्भपातासारख्या दु:खद बातमीचा सामना करावा लागतो. कधी कधी ब्लड क्लॉटिंग डिसॉर्डर, थायरॉइड यांसारख्या आजारांमुळे देखील गर्भधारण होण्यासाठी अडचण येत असते.प्‍लेसेंटाचं असामान्य रुपाने विकसित होणं, आईकडून बाळाला होणा-या रक्तपुरवठ्या मध्ये बाधा किंवा अडथळा येणं, बाळाला चुकीच्या संख्येमध्ये क्रोमोजोम मिळणं, बाळाचा असामान्य आकार, गर्भाशयात जाळीदार लेयर बनणं, पॉलीसिस्टिक अंडाशय सिंड्रोम (पीसीओएस), गर्भाशय ग्रीवा कमकुवत होणं ही सर्व कारणं गर्भपात होण्यास कारणीभूत ठरु शकतात.

45 वर्षांनंतर अधिक समस्या

NHS च्या अहवालानुसार, गर्भपाताची समस्या अतिशय सामान्य आहे. आठपैकी एक गर्भवती महिला गर्भपाताने ग्रस्त आहे. आपण गर्भवती आहोत हे माहीत असण्यापूर्वीच अनेक स्त्रियांचा गर्भपात होतो. तथापि, वारंवार गर्भपात होण्याची समस्या (तीन किंवा अधिक वेळा) 100 पैकी फक्त एक महिलांना भेडसावते. वृद्ध स्त्रियांमध्ये गर्भपाताची समस्या अधिक सामान्य आहे. 30 वर्षांखालील 10 पैकी एका महिलेचा गर्भपात होतो.

काय आहेत गर्भपाताची लक्षणे

गर्भपाताचा सर्वात पहिला संकेत रक्तस्त्राव हा असतो पण प्रेग्नेंसी मध्ये होणा-या प्रत्येक रक्तस्त्रावाचा अर्थ गर्भपात हा अजिबात नसतो. कारण प्रेग्नेंसीच्या पहिल्या तिमाहीत ब्लीडिंग होणं अत्यंत साधारण गोष्ट आहे. अनेक प्रकरणांत कपड्यांवर फक्त रक्ताचे डाग पडतात. गर्भपातामध्ये आधी रक्तस्त्राव हळू हळू होतो आणि नंतर वाढतो. याला तुम्ही नॉर्मल पिरीयड्सपेक्षा जास्त म्हणू शकता. जर रक्तस्त्रावाचा रंग तपकिरी ऐवजी गडद लाल असेल आणि तुम्हाला स्नायूंमध्ये अवघडलेपण जाणवत असेल तर तो गर्भपाताचा संकेत असू शकतो.

मळमळ बंद होणं
बहुतांश वेळा प्रेग्नेंसीच्या पहिल्या तिमाहीत मळमळण्याची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. पण जर प्रेग्नेंसीच्या दुस-या तिमाहीत प्रवेश करण्याआधीच तुमच्या उलट्या होणं बंद झालं तर हा गर्भपाताचा संकेत असू शकतो. याव्यतिरिक्त ब्रेस्टला हात लावताच वेदना होणं आणि मॉर्निंग सिकनेस होणं या सर्व गोष्टींचा प्रेग्नेंसीच्या साधारण लक्षणांमध्ये समावेश होतो. जर अशाप्रकारच्या लक्षणांमध्ये गर्भावस्थेच्या दुस-या तिमाहीत प्रवेश करण्याआधीच कमतरता जाणवू लागली तर तुम्हाला सावध होणं अत्यंत आवश्यक आहे.

इतर बातम्या :

Home Remedies For Sinus : सायनसचा त्रास दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा!

कोरोना, टाळेबंदीमुळे मुलांची चीडचीड, त्रागा वाढला, आत्ममग्न मुलांच्या उपचारातही अडचण

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 13 हजारांवर, सक्रिय रुग्णसंख्याही 227 दिवसातील नीचांकी

 

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI