पावसाळ्यात वीजेच्या धोक्यापासून वाचण्यासाठी ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करा
पावसाळ्यात पाणी आणि ओलसरपणा यामुळे वीजेचा प्रवाह सहज पसरतो. बऱ्याचदा घरातली अर्थिंग कमकुवत असते किंवा खराब तारांमुळे करंट पसरतो. यामुळे शॉर्ट सर्किट किंवा करंट लागण्याच्या घटना घडतात. पण या सोप्या टिप्स पाळल्या, तर तुम्ही आणि तुमचं कुटुंब सुरक्षित राहाल.

पावसाळा आला की, थंडी आणि मस्त हवामान येतं, पण सोबत येतो वीजेचा धोका. घरात करंट पसरण्याचं प्रमाण या काळात वाढतं. यामुळे मोठी दुर्घटना किंवा जीवितहानी होऊ शकते. पण काळजी नको! आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्याने तुम्ही आणि तुमचं कुटुंब सुरक्षित राहाल.
घराची अर्थिंग नीट करा
पावसाळ्यात करंट पसरण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे अर्थिंगचा अभाव किंवा कमकुवत अर्थिंग. अर्थिंग नीट नसेल, तर वीजेच्या उपकरणांमुळे मोठा धोका होऊ शकतो, कधीकधी जीवही जाऊ शकतो. त्यामुळे घराची अर्थिंग नीट करणं खूप गरजेचं आहे. तसेच दर ६ महिन्यांनी अर्थिंग तपासा आणि टेस्टरने करंट लीक होतंय का? हे बघा.
वीजेच्या उपकरणांचा वापर काळजीपूर्वक करा
पाण्यात करंट खूप वेगाने पसरतो. त्यामुळे पाण्याशी संबंधित वीजेची उपकरणं वापरताना ही काळजी घ्या.
1. अनवाणी पायाने वीजेची उपकरणं हाताळू नका.
2. वापरात नसलेल्या उपकरणांचे प्लग काढून ठेवा.
3. उपकरणं खरेदी करताना आयएसआय मार्क असलेलीच घ्या.
4. खराब क्वालिटीची उपकरणं वापरू नका.
5. जर उपकरणांचे तार खराब असतील, तर त्यांचा वापर टाळा.
प्लग आणि सॉकेट वापरताना ही सावधगिरी बाळगा
घरातील विद्युत उपकरणे वापरताना प्लग आणि सॉकेटचा वापर नेहमी काळजीपूर्वक करणे अत्यंत गरजेचे आहे. ओले हात किंवा पायऱ्या जमिनीवर ठेवून कधीही प्लग लावू नका, कारण शॉक बसण्याचा धोका असतो. सॉकेटमध्ये नेहमी योग्य क्षमतेचा प्लगच लावा आणि सैल प्लग टाकू नका. विजेच्या लोडपेक्षा जास्त भार देणं टाळा, अन्यथा सॉकेट गरम होऊन शॉर्ट सर्किट होऊ शकते. प्लग काढताना वायरला ओढू नका, तर प्लगला घट्ट पकडूनच बाहेर काढा. खराब किंवा तुटलेले सॉकेट तात्काळ बदलावे. या छोट्या काळजीमुळे मोठ्या अपघातांना आपण टाळू शकतो.
छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या
काही छोट्या गोष्टी पाळल्या, तर वीजेचा धोका खूप कमी होतो:
1. वीजेचं कोणतंही उपकरण हाताळण्यापूर्वी रबराच्या चपला घाला.
2. पाण्याजवळ किंवा नळाजवळ धातूची वीजेची उपकरणं ठेवू नका.
3. कूलर किंवा इतर वीजेच्या उपकरणांचा स्टँड प्लास्टिक किंवा लाकडी असावा, धातूचा टाळा.
4. फ्रिजच्या हँडलवर कापडी कव्हर लावा.
5. जर करंट लीक होण्याची शंका असेल, तर तातडीने टेस्टर वापरून तपासा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
