AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध भारतातील सर्वोत्तम रोड ट्रिप करायची आहे तर ‘या’ ठिकाणी नक्की जा

आपल्यापैकी अनेकजण असे आहेत ज्यांना नैसर्गिक सौंदर्यात वेळ घालवायला खूप आवडत. त्यामुळेच पर्यटकांची मोठी गर्दी काश्मीर ते शिमला, मनाली, कुल्लू ते नैनिताल पर्यंत पोहोचते, पण आज आपण त्या ठिकाणाबद्दल बोलणार नाही, तर अशा मार्गांबद्दल सांगू जे अत्यंत सुंदर आहेत. आयुष्यात एकदा तरी तुम्ही या ठिकाणांची रोड ट्रिप नक्कीच प्लॅन करावी. चला तर मग आजच्या या लेखात आपण रोड ट्रिपच्या ठिकाणांबद्दल जाणून घेऊयात...

नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध भारतातील सर्वोत्तम रोड ट्रिप करायची आहे तर 'या' ठिकाणी नक्की जा
| Edited By: | Updated on: Jun 15, 2025 | 3:31 PM
Share

जेव्हा प्रवास करण्याचा किंवा बाहेर फिरायला जाण्याचा विचार येतो तेव्हा प्रत्येकजण डेस्टिनेशन ट्रिपचे प्लॅन करत असतात. जसे की कोणीतरी कुटुंब आणि मित्रांसह शिमलाला जाण्याचे प्लॅन करतात तर कोणी काश्मीरला भेट देऊ इच्छितात. तसेच अनेकजण आहेत ज्यांना प्रवास करायला खूप आवडतो. तर काहींना ऐतिहासिक ठिकाणे आणि कला यांचे वेड असते, पण जर प्रवास करताना तुमच्या डेस्टिनेशनपेक्षा जास्त आकर्षक वाटू लागला आणि तिथेच राहावेसे वाटले तर काय होईल? या लेखात, आपण देशातील अशा रस्त्यांबद्दल जाणून घेऊ जे फक्त प्रवास म्हणजेच रोड ट्रिप करण्यासाठी खूप सुंदर आहेत. तुम्ही या रस्त्यांच्या नैसर्गिक सौंदर्याचे कौतुक करत राहाल. या रस्त्यांवरून प्रवास करणे गोड स्वप्नासारखे मजेदार वाटेल आणि साहसाचीही कमतरता भासणार नाही.

जर निसर्गाच्या सौंदर्यासोबत अँडव्हेंचर असेल तर प्रवास तुमच्या ठरवलेल्या ठिकाणांपेक्षा जास्त आनंददायी वाटतो. संस्कृतीपासून इतिहास, तंत्रज्ञान आणि नैसर्गिक सौंदर्यापर्यंत, भारत कोणापेक्षाही कमी नाही. परदेशी पर्यटक देखील भारताचा शोध घेण्यासाठी येतात. चला अशा पाच रस्त्यांबद्दल जाणून घेऊया जे खूप सुंदर आहेत आणि तुम्ही आयुष्यात एकदा तरी या रोड ट्रिपचा आनंद घेतला पाहिजे.

स्वर्गाचा रस्ता, कच्छ, गुजरात

कच्छच्या रणातून जाणाऱ्या रस्त्याने तुम्ही एकदा नक्कीच प्रवास करावा. हा प्रवास इतका सुंदर असेल की तो तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील. याला ‘स्वर्गाचा रस्ता’ असेही म्हणतात. जेव्हा तुम्ही या रस्त्याने जाल तेव्हा तुम्हाला दोन्ही बाजूंनी समुद्र दिसेल.

खारदुंग ला पास-लडाख

बरेच लोकं लडाखचा प्रवास सायकलने पूर्ण करतात. जर तुम्हाला निसर्गाच्या सौंदर्यासोबतच साहस हवे असेल तर तुम्ही खारदुंग ला खिंडीला भेट द्यावी. तर या प्रवासात तुम्हाला आजु-बाजूला सर्वत्र बर्फाची दाट चादर पसरलेली दिसेल. तथापि, हा मार्ग कमी आव्हानात्मक असणार नाही, म्हणून पूर्ण तयारी केल्यानंतरच जा.

मसीनागुडी ते उटी, तामिळनाडू

ऊटी हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. लोक या ठिकाणाच्या नैसर्गिक सौंदर्यात हरवून जातात. मसिनागुडी ते ऊटी हा रस्ताच स्वर्ग आहे. या रोड ट्रिपला निलगिरी रोड ट्रिप म्हणतात, आजूबाजूला सुंदर हिरवेगार पर्वत आणि त्यावरील धुके अद्भुत दिसते.

कोल्ली हिल्स रोड – तामिळनाडू

जर तुम्हाला निसर्गाच्या कुशीत वेळ घालवण्याची आवड असेल तर एकदा कोल्ली हिल्स रोडला नक्की भेट द्या. हा प्रवास तुमच्यासाठी अद्भुत असेल. कारण येथे तुम्हाला वाटेत मनमोहक नैसर्गिक दृश्ये पाहायला मिळतील. जी तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी विसरू शकणार नाही.

 शिमला ते चैल हिल स्टेशन

जर तुम्हाला एक छोटी रोड ट्रिप प्लॅन करायची असेल तर तुम्ही शिमला जवळील चैल हिल स्टेशनला जावे. हे अंतर अंदाजे 45 किलोमीटर असेल. वाटेत दाट देवदार जंगले आहेत जी खूप सुंदर दिसतात आणि अनेक आकर्षक नैसर्गिक दृश्ये तुमचे मन मोहून टाकतील.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.