New year 2025 : जे झालं ते झालं… सुखी आणि निरोगी जगायचंय? नव्या वर्षात ‘या’ टिप्स फॉलो करा
गेल्या वर्षीच्या आजारपण आणि ताणतणावाचा अनुभव घेऊन, 2025 मध्ये एक सुखी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स या लेखात दिल्या आहेत. योग्य आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि स्वतःसाठी वेळ काढणे यांचा समावेश आहे. त्वचे आणि केसांची काळजी देखील महत्त्वाची आहे.

जे झालं ते झालं. सरत्या वर्षात अनेक संकल्प केले. पण या ना त्या कारणाने ते तडी गेले नाही. त्यामुळे सरत्या वर्षात आजारपण पाचवीला पुजलं गेलं. ताणतणाव कायम राहिला. फिरायचं राहून गेलं. घरच्यांना वेळ देता आला नाही. मनासारखं जगता आलं नाही. एवढंच कशाला साधा मोकळा श्वासही घेता आला नाही. पण 2025 या वर्षात त्याची पुनरावृत्ती करायची नाही. ते सर्व टाळायचं. सुखी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी काही टिप्स फॉलो करायच्या. आजपासूनच त्याची सवय लावायची. या टिप्स आम्ही तुम्हाला देत आहोत. त्याचा अवलंब करून तर पाहा.
कोणत्याही वयोगटातील व्यक्तीने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. वय वाढल्यावर आरोग्याची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यामुळे काही गोष्टी आधीच अंमलात आणल्या तर आरोग्य समस्यांपासून वाचता येऊ शकतं.
आहार
नव्या वर्षात तुम्ही तुमच्या आणि कुटुंबीयांच्या आहारावर लक्ष द्या. रोज सकाळी नाश्ता करण्याची सवय लावून घ्या. प्रोटीन, फायबर्स, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D असलेला आहार घ्या. यामुळे तुमचे स्नायू आणि हाडं मजबूत होतात, तसेच वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते.
झोप
चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप अत्यावश्यक आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत जागा राहणं हानिकारक ठरू शकतं. दररोज लवकर झोपण्याची आणि लवकर उठण्याची सवय लावून घ्या. कमीत कमी 7 तासांची झोप घेणं आवश्यक आहे.
योगासने
अनेक महिलांना जिममध्ये जाणं कठीण असतं. त्यामुळे, प्रत्येकाने दिवसातून किमान 30 मिनिटं योगासने करा. योगामुळे मानसिक आणि शारीरिक दोन्ही आरोग्याची देखील काळजी घेतली जाते. ताडासन, वृक्षासन, बालासन, अनुलोम-विलोम, सेतुबंधासन अशा सोप्या योगासनांचा सराव करा. त्याशिवाय, काही स्ट्रेचिंग व्यायाम करा. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किमान 20-25 मिनिटं चालण्याची सवय लागली पाहिजे.
स्वतःसाठी वेळ
स्वत:साठी वेळ काढणं अत्यंत गरजेचं आहे. यामुळे तुमचं मानसिक संतुलन राखता येतं आणि तुम्ही आनंदी राहता. आठवड्यात एक किंवा दोन दिवस केवळ स्वतःसाठी ठेवा. या दिवसांमध्ये तुम्ही फिरायला जाऊ शकता, मित्रांबरोबर वेळ घालवू शकता किंवा तुम्हाला आवडणारं काही करु शकता.
त्वचा आणि केसांची काळजी
महिलांना स्वत:ला सुंदर आणि आकर्षक ठेवण्याची आवड असते. त्यासाठी त्वचा आणि केसांची योग्य काळजी घेणं आवश्यक आहे. फेस पॅक, केसांमध्ये तेल मसाज, केसांचे मास्क आणि विविध सौंदर्य टिप्सचा वापर करा.
