भाजीपाला, खाद्यपदार्थांसह घरातील ‘या’ वस्तू सुद्धा ठेऊ शकता फ्रिजमध्ये; तुम्हाला माहीतही नसेल

तुम्ही तुमच्या फ्रिजमध्ये खाण्यापिण्याच्या वस्तूं व्यतिरिक्त अनेक वस्तू दीर्घकाळापर्यंत साठवून ठेवू शकता. त्याचा तुम्हाला नंतरही उपयोग होतो. डोळ्यांची काळजी घेण्यासाठी वापरले जाणारे प्रॉडक्ट सुद्धा तुम्ही तुमच्या फ्रीझ मध्ये ठेऊ शकता.

भाजीपाला, खाद्यपदार्थांसह घरातील 'या' वस्तू सुद्धा ठेऊ शकता फ्रिजमध्ये; तुम्हाला माहीतही नसेल
refrigeratorImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 3:44 PM

आपल्या स्वयंपाकघरात फ्रिज नसेल तर स्वयंपाकघर अपूर्णच आहे असं वाटतं. आजच्या घडीला फ्रिजशिवाय स्वयंपाकघराची कल्पना करणे अवघड आहे. कारण आपण भाज्यांपासून सॉस, जॅम, दूध, दही तसेच उरलेले जेवण असे अनेक खाद्यपदार्थ दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी फ्रिजचा वापर करतो. कारण फ्रिज हे ठेवलेले अन्नपदार्थ खराब होण्यापासून तर रोखतोच, याशिवाय पदार्थांची गुणवत्ताही टिकवून ठेवतो.

खाण्या-पिण्याबरोबरच अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपण फ्रीजमध्ये ठेवल्या तर त्यांची गुणवत्ता टिकून राहू शकते. आज आम्ही तुम्हाला तुमच्या फ्रीजमध्ये जेवणाव्यतिरिक्त आणखीन कोणत्या गोष्टी ठेवू शकता आणि त्यांची गुणवत्ता टिकवून ठेवू शकता. हे जाणून घेऊयात.

डोळ्यांसाठी वापरले जाणारे प्रोडक्ट

डोळ्यांची काळजी घेण्यासाठी वापरले जाणारे प्रॉडक्ट सुद्धा तुम्ही तुमच्या फ्रीझ मध्ये ठेऊ शकता. आय केअर क्रीम, अँटी एजिंग क्रीम, रिंकल क्रीम इत्यादी वापरत असलेले प्रॉडक्ट तुम्ही तुमच्या फ्रिजमध्ये स्टोअर करू शकता. हे प्रॉडक्ट तुम्ही फ्रिजमध्ये ठेवल्यास त्याची गुणवत्ता दीर्घकाळ टिकून राहते. इतकंच नाही तर जेव्हा तुम्ही डोळ्यांवर हे थंडगार क्रीम लावाल तेव्हा डोळे अधिक फ्रेश दिसतील. इतकंच नाही तर त्यांच्या वापराने लालसरपणाही दूर होतो.

लिपस्टिक स्टोअर करा

अनेकवेळा तुम्ही घेतलेल्या महागड्या लिपस्टिक काही दिवसातच खराब होतात. याचे कारण म्हणजे आपल्या खोलीच्या तापमानामुळे लिपस्टिकमधील तेल हळूहळू खराब होत जाते, आणि लिपस्टिकचा रंग ही फिकट होत जातो. अशा वेळेस तुम्ही तुमच्या लिपस्टिक या फ्रिज मध्ये ठेवल्यास खराब होणार नाही. व दीर्घकाळ टिकून राहतात. त्याच बरोबर तुमची लिपस्टिक जर मेल्ट होतेय अस वाटतं असेल तर तुम्ही ती फ्रिजमध्ये ठेवा.

पूजेची फुले

बाजारातून जेव्हा आपण आठवड्याभरासाठी लागणारी देवांच्या पूजेची फुल खर्डी करतो तेव्हा ती घरी आणल्यानंतर लगेच २ दिवसात खराब होतात. आता हि फुल ५-६ दिवस टिकवून ठेवण्यासाठी त्यांना फ्रीज मध्ये ठेऊन द्या. कारण थंड वातावरणात फुलाची पाने व खोड बराच काळ ताजी राहतात.

परफ्यूम

उन्हाळाच्या दिवसात खोलीचे तापमान अधिक असेल त्यामुळे खोलीत ठेवलेल्या वस्तू या लवकर खराब होतात. त्यात जर तुमचे परफ्यूम देखील खराब होत असेल तर तुम्ही तुमचे परफ्यूम फ्रिजमध्ये ठेवा. अशाने परफ्यूमची गुणवत्ता बिघडत नाही.

शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?.
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ.
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला.
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान.
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम.
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.