Bachelor Party : आता डेस्टिनेशन बॅचलर पार्टी आणखी मजेदार, मित्रांसह एक्सप्लोर करा ‘ही’ ठिकाणं

सध्या डेस्टिनेशन बॅचलर पार्टीचा ट्रेंड वाढला आहे.(Now Destination Bachelor Party More Fun, Explore 'These' Places With Friends)

  • Updated On - 2:16 pm, Sun, 13 December 20
Bachelor Party : आता डेस्टिनेशन बॅचलर पार्टी आणखी मजेदार, मित्रांसह एक्सप्लोर करा 'ही' ठिकाणं

मुंबई : लग्नाआधी प्रत्येकाला बॅचलर पार्टी करायची असते मुळात प्रत्येकालाच याचं क्रेझ आहे. काही वर्षांपूर्वी बॅचलर पार्टीला मुलं आपल्या मित्रांसोबत पार्टी करायचे. मात्र आता हा ट्रेंड बदलला आहे, मुलीसुद्धा आपल्या मैत्रिणींसोबत आता पार्टी करतात. त्यात आता सध्या डेस्टिनेशन बॅचलर पार्टीचा ट्रेंड वाढला आहे.

बॅचलर पार्टीमध्ये आपल्या मित्रांसह घालवलेले काही आनंदाचे क्षण असतात, जे आपण आयुष्यात कधीही विसरू शकत नाहीत. अशात आपल्या बजेटनुसार मित्रांसह डेस्टिनेशन बॅचलर पार्टी प्लॅन करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत.या आयडिया नक्कीच तुमच्या उपयोगी पडतील.

गोवा

गोवा
मित्रांसोबत गोवा प्लॅन करणं खूप मजेदार ठरू शकतं. गोव्याला पार्टी हब असंसुद्धा म्हणटलं जातं. तिथे बीच, कॅसिनो, नाइट क्लबसारख्या अनेक गोष्टी तरुणांना आकर्षित करतात. महत्वाचं म्हणजे तुम्हाला इथं बजेटमध्ये उत्तम हॉटेल्स मिळू शकतात. गोवा जाण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च महिना उत्तम आहे.

लडाख

लडाख
लडाख सुंदर ठिकाणांमधील एक ठिकाण आहे. इथे तुम्ही मित्रांसोबत उंच-उंच डोंगरांवर ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता. या व्यतिरिक्त तुम्ही लग्नाची खरेदीही करू शकता.

कसोल

कसोल
कसोलही एक सुंदर जागा आहे. महत्वाचं म्हणजे तुम्ही कसोलला कधीही जाऊ शकता. निसर्गाप्रेमींसाठी तर कसोल स्वर्ग आहे. तुम्ही येथे ट्रेकिंगसह रिव्हर राफ्टिंगचाही आनंद घेऊ शकता. कसोल लहान जागा असली तरी खूप सुंदर आहे तुम्ही इथे मित्रांसोबत धमाल करू शकता.

ऋषिकेश

ऋषिकेश

ऋषिकेशमध्ये तुम्ही मित्रांसह खूप धमाल करू शकता. रिव्हर राफ्टिंगसाठी ही जागा उत्तम आहे. या व्यतिरिक्त तुम्ही बंजी जंपिंग, ट्रेकिंग आणि बरेच काही करू शकता.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI