Numerology : सतत अडचणींच्या भोवऱ्यात अडकलेले असतात ‘या’ तारखेला जन्मलेले लोक
Mulank That Attracts Problems : अंकशास्त्रात अशा काही जन्म तारखा असतात ज्यांच्या आयुष्यात कायम अडचणी येत असतात. या तारखांना जन्मलेले लोक ही सतत कोणत्या ना कोणत्या अडचणीत फसत असतात. कठीण काळात त्यांना आर्थिक नुकसानाबरोबरच टीकेचाही सामना करावा लागतो.

अंकशास्त्रात अशा काही जन्म तारखा असतात ज्यांच्या आयुष्यात कायम अडचणी येत असतात. या तारखांना जन्मलेले लोक ही सतत कोणत्या ना कोणत्या अडचणीत फसत असतात. कठीण काळात त्यांना आर्थिक नुकसानाबरोबरच टीकेचाही सामना करावा लागतो.
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आनंद आणि दुःख यांच्यात संतुलन असतं. सुखाच्या दिवसांनंतर दु:खाचे वाईट दिवस येतात, आणि हे चक्र असच सुरू असतं. काही लोक त्यांच्या बुद्धिमत्तेने आणि शक्तीने त्यांच्या समस्या सोडवतात, तर काही लोक ज्योतिषीय उपायांचा आधार घेऊन त्यांचे जीवन यशस्वी करतात. खरं तर, जीवनाशी संबंधित सर्व समस्यांचे उपाय शास्त्रांमध्ये स्पष्ट केले आहेत. मात्र यातही काही लोकं असे असतात ज्यांच्या आयुष्यात कायम काहीतरी अडचणी येतच असतात. अंकशास्त्रात अशा काही जन्मतारखा आहेत. ज्याच्या आयुष्यात सतत अडचणी येत असतात. त्यांना कायम कुठल्यातरी वाईट प्रसंगाला सामोरं जावं लागत असतं. यामुळे ते रोजच्या जीवनात सारखं वादाच्या भोवऱ्यात सापडलेले असतात. आज आम्ही तुम्हाला याच जन्मतारखांबद्दल सांगणार आहोत.
हे लोक कायम वादाच्या भोवऱ्यात सापडतात
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या ४, १३, २२, ३१, ८, १७ आणि २६ तारखेला जन्मलेले लोक मनाने शुद्ध असतात. पण या लोकांच्या आयुष्यात कायम अडचणी येत असतात. आता आपलं आयुष्य सुरळीत सुरू आहे, असं जेव्हा या लोकांना वाटतं त्याचवेळी त्यांना अचानक एखाद्या समस्येला सामोरं जावं लागतं. एखाद्या छोट्याशा समस्येमुळे सुद्धा त्यांचं संपूर्ण आयुष्य वादांनी भरून गेल्यासारखं होतं. या जन्म तारखेच्या लोकांना आर्थिक समस्या, सामाजिक विवाद अशा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. काही लोक त्यांच्या बिघडत्या नातेसंबंधांमुळे त्रस्त असतात. सततच्या अडचणींमुळे या लोकांचे नाव समाजात खराब होते. त्यांना खूप टीकेचा सामना करावा लागतो. ज्यामुळे त्याच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.
विचार करण्यात वेळ घालवतात
अंकशास्त्रात असे म्हटले आहे की कोणत्याही महिन्याच्या २, ४, ७, ८, ११, १३, १६, १७, २०, २२, २५, २६ आणि २९ तारखेला जन्मलेले लोक खूप विचार करतात. हे लोक त्यांचा सर्व वेळ विचार करण्यात घालवतात, त्यामुळे त्यांना आयुष्यात कधीही यश मिळत नाही. याशिवाय, हे लोक घाईघाईत आणि इतरांच्या बोलण्याने प्रभावित होऊन चुकीचे निर्णय घेतात, ज्याचा त्यांना आयुष्यभर पश्चात्ताप होतो.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
