नैसर्गिक पध्दतीने चेहऱ्यावर चमक हवीय? मग, अशा प्रकारे करा संत्र्याच्या सालीचा वापर !

आपण फळे खाल्लानंतर फळांची साल फेकून देतो. परंतु आपल्याला माहिती आहे का याच फळांच्या सालीपासून विविध फेस मास्क तयार होऊ शकतात.

नैसर्गिक पध्दतीने चेहऱ्यावर चमक हवीय? मग, अशा प्रकारे करा संत्र्याच्या सालीचा वापर !
संत्रीचे साल

मुंबई : आपण फळे खाल्लानंतर फळांची साल फेकून देतो. परंतु आपल्याला माहिती आहे का याच फळांच्या सालीपासून विविध फेस मास्क तयार होऊ शकतात. आणि हे आपल्या चेहऱ्यासाठी अत्यंत चांगले आहे याच्यापुढे महागडे फेशियल आणि ब्रँडेड क्रीमही अपयशी ठरू शकतात. त्यातील पोषक घटक आपली त्वचा निरोगी बनवते आणि चेहर्‍यावर नैसर्गिक चमक देखील येते. (Orange peel face pack is beneficial for the skin)

-संत्र्याच्या सालापासून बनविलेले फेसपॅक बनविण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत.

-एक चमचे संत्र्याच्या सालीची पूड

-अर्धा चमचे हळद

-एक चमचे मध

-गरजेप्रमाणे गुलाब

हे सर्व एका भांड्यात घ्या आणि त्याचे मिश्रण तयार करा आणि त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित लावा साधारण 20 ते 25 मिनिटे चेहऱ्यावर तसेच ठेवा त्यानंतर चेहरा पाण्याने धूवून घ्या…संत्रीची साल सुकवून घ्या आणि त्याचे पावडर तयार करा या पावडरमध्ये मध आणि दूध मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. थोडया हलक्या हातांनी मसाज करा, कारण फेसमास्कबरोबरच हे चांगले स्क्रब आहे. मसाज केल्यानंतर ते कोरडे होऊ द्या. नंतर कोमट पाण्याने तोंड धुवा. संत्री हे व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत मानला जातो.

संत्र्याची ताजी साल आपण आपल्या कोपर, गुडघे आणि मानेवर रगडू शकता. यामुळे त्वचेचा काळपटपणा दूर होण्यास मदत मिळते. याव्यतिरिक्त संत्र्याच्या सालीची पेस्ट तयार करून त्यामध्ये मध मिक्स करा व हे मिश्रण आपल्या त्वचेवर लावा. संत्र्याच्या सालीमध्ये ‘व्हिटॅमिन सी’ची मात्रा भरपूर असते. यामध्ये अँटी-बॅक्टेरिअल, नैसर्गिक स्वरुपात तेलाचा होणारा अतिरिक्त स्त्राव नियंत्रणात आणण्याचे गुणधर्म, अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-मायक्रोबियल यासह अनेक गुणधर्म आहेत.

(टीप : कुठल्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा किंवा सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला घेणे बंधनकारक आहे.)

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Orange peel face pack is beneficial for the skin)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI