Parenting tips: पालकांनो, मुलाला घरी एकटेच ठेवताय? टिप्स पाळा, चिंता टाळा

मुलांना घरी एकटे ठेवल्याने मनाच्या कोपऱ्यात अकल्पित भीतीही दाटलेली असते. मुलांसोबतच पालकही समस्यांनी ग्रस्त असतात. तुम्ही मुलांना घरात एकटे ठेवण्याच्या स्थितीत असाल तर आम्ही सांगितलेल्या टिप्स नक्कीच फॉलो करा. तुमच्यासोबत मुलांची चिंता मिटल्याशिवाय राहणार नाही.

Parenting tips: पालकांनो, मुलाला घरी एकटेच ठेवताय?  टिप्स पाळा, चिंता टाळा
पालकांनो, मुलाला घरी एकटेच ठेवताय?
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 7:10 PM

मुंबई : महानगरात किंवा अलीकडे निमशहरातही पुरुषासोबत स्त्री देखील कौटुंबिक भार उचलते. कामानिमित्ताने दोघांनाही घराबाहेर पडावे लागते. अशावेळी प्रश्न उभा ठाकतो पाल्यांच्या संगोपनाचा. मुलांना घरी एकटे ठेवल्याने मनाच्या कोपऱ्यात अकल्पित भीतीही दाटलेली असते. मुलांसोबतच पालकही समस्यांनी ग्रस्त असतात. तुम्ही मुलांना घरात एकटे ठेवण्याच्या स्थितीत असाल तर आम्ही सांगितलेल्या टिप्स नक्कीच फॉलो करा. तुमच्यासोबत मुलांची चिंता मिटल्याशिवाय राहणार नाही.

मुलांना मोबाईल द्या

तुम्ही घरातून बाहेर पडताना मुलांना तुमचा मोबाईल देऊन ठेवा. तुम्ही बाहेर असताना तुम्हाला मुलाची माहिती वेळोवेळी मिळत जाईल.मुलाशी ठराविक वेळांनी फोनद्वारे बोलण्याने तुमचीही चिंता मिटेल आणि मुलालाही एकटेपणाची जाणीव भेडसावणार नाही.

आपत्कालीन (इमर्जन्सी) नंबर द्या

तुमचा मुलगा स्वतः नंबर डायल करण्यास सक्षम असल्यास त्याच्याजवळ आपत्कालीन नंबर देऊन ठेवा. जेणेकरुन आपत्कालीन परिस्थितीत मुलगा तुमच्याशी थेट संपर्क साधू शकतो.

गॕस सिलिंडर बंद

मुले हे पालकांच्या गैरहजेरीत नेहमी त्यांना मनाई करण्यात आलेल्या गोष्टींसाठी प्रयत्न करतात.त्यामुळे तुम्ही नसताना मुले गॕसच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तुम्ही घरातून बाहेर पडण्यापूर्वी गॕस सिलिंडरचे बटण बंद नेहमीच करा.

खाण्याचे पदार्थ ठेवा

मुलांना ठराविक अंतराने खाण्याची सवय असते. त्यामुळे मुलाचा हात पोहोचेल अशा ठिकाणी खाण्याच्या वस्तू उपलब्ध करुन ठेवा. मुलाला खाण्यासाठी किचनमध्ये जाण्याची वेळ येऊ नये. अन्यथा गॕसचा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टोकदार साहित्य जवळ नको

मुलांना हानी पोहचण्याची सर्वाधिक शक्यता टोकदार साहित्यामुळे असते. त्यामुळे शक्यतो चाकू, कापणी यंत्र, पेन यासारख्या वस्तू मुलांच्या हाती लागतील अशापद्धतीने ठेवणे टाळा.

विजेचे सॉकेट बंदिस्त

मुले छोटी असतील किंवा अद्याप समजण्याच्या इथपत वय नसल्याचे एक बाब प्राधान्यानं करा. विजेचं सॉकेट टेप किंवा अन्यपद्धतीने बंद करण्याचा प्रयत्न करा. मुलाचा नजरचुकीने हात लागल्याने विजेचा धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खोलीत बंद करू नका

घरात एकापेक्षा अधिक खोल्या असतात. त्यामुळे इतर खोल्यांना कुलूप लावून मुलाला खेळण्यासाठी एक खोली ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, शक्यतो असे करणे टाळावे. मुलाला वावराच्या खोलीला खिडकी असू द्या. जेणेकरुन आपत्कालीन स्थितीत खिडकीचा वापर करुन मुलाला बाहेर काढता येईल.

मुलाला व्यस्त ठेवा

मुलाच्या आवडीनुसार अभ्यास किंवा कलात्मक कामे उपलब्ध करुन द्या. चित्रकला किंवा क्राफ्टिंग पेपर सोबत ठेवा. मुल खेळणे किंवा अभ्यासात गुंतल्यास अन्य बाबींकडे त्याचे लक्ष जाणार नाही.

इतर बातम्या

Fastag Monthly Pass| फास्ट टॅग रिचार्जची झंझट संपली; आता काढा मासिक पास आणि बिनधास्त करा प्रवास

Winter Care | थंडीच्या लाटेत शरीरात उष्मा कसा टिकवायचा? कपड्यांपासून खाण्या-पिण्यापर्यंतच्या टिप्स

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.