रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काळी मिरी रामबाण उपाय !

शितल मुंडे, Tv9 मराठी

| Edited By: |

Updated on: Apr 11, 2021 | 11:48 AM

काळी मिरी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी काळी मिरी फायदेशीर आहे.

रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काळी मिरी रामबाण उपाय !
काळी मिरी
Follow us

मुंबई : काळी मिरी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी काळी मिरी फायदेशीर आहे. काळी मिरी एक शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट आहे. ज्यामुळे सर्दी आणि खोकला कमी होण्यास मदत होते. कफ प्रकृतीसाठी काळी मिरी खूप फायदेशीर मानली जाते. काळी मिरीत लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, जस्त, क्रोमियम, व्हिटामिन ए आणि इतर पोषक गुणधर्म आढळतात. (Pepper is beneficial for boosting immunity)

याशिवाय यामध्ये रायबोफ्लेविन, थायामिन, पोटॅशियम, सोडियम, फॉलेट, बेटेन आणि नियासिन हे घटकदेखील आढळतात. अपचनाची समस्या निर्माण होत असेल तर, लिंबाचा अर्धा तुकडा घेऊन त्यातील बिया काढून टाका. त्यात काळे मीठ आणि मिरपूड भरून गरम करा आणि चोखा. याने अपचनाची समस्या दूर होईल. फुफ्फुसात आणि श्वसन नलिकांमध्ये संसर्ग झाल्यास आपण काळीमिरी आणि पुदीना युक्त चहा पिऊ शकता.

-सतत खोकल्यामुळे त्रास होत असल्यास, काळीमिरीच्या 4-5 दाण्यांसह 15 मनुका चावून खाल्ल्याने आराम मिळेल. जर घसा बसला असेल, तर तूप, साखर आणि मिरपूड मिसळून त्याचे चाटण तयार करा.

-जर तम्हाला सतत खोकल्याचा त्रास होत असेत तर काळीमिरीचा वापर करून तुम्ही या समस्येतून मुक्त होऊ शकता. काळीमिरी सेवन केल्याने 3 ते 4 दिवसांतच फरक दिसून येईल

-गॅसची समस्या असल्यास काळी मिरी हा रामबाण उपाय आहे. एक कप पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा काळी मिरी पूड आणि अर्धा चमचा काळं मीठ याचं काही दिवस सेवन केल्याने गॅसची समस्या दूर होते.

-खोकला येत असेल तरी सुद्धा काळी मिरी लाभदायक ठरते. अर्धा चमचा काळी मिरी पूड आणि अर्धा चमचा मध एकत्र करुन खाल्याने खोकला दूर होतो.

(टीप : सेवानापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.)

संबंधित बातम्या : 

Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Pepper is beneficial for boosting immunity)

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI