AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात व्यायाम करताना डिहायड्रेशन टाळण्यासाठी प्या ‘ही’ 4 प्री वर्कआउट ड्रिंक्स

उन्हाळ्यात व्यायाम करताना स्वतःला हायड्रेटेड ठेवणे सर्वात महत्वाचे आहे. घाम येणे आणि जास्त उष्णता जाणवणे यामुळे शरीर डिहायड्रेट होऊ लागते. अशा वेळेस तुम्ही वर्कआउटपूर्वी हे पेय प्यावे, जेणेकरून वर्कआउट दरम्यान तुमचे शरीर डिहायड्रेट होणार नाही. चला तर मग आजच्या लेखात आपण प्री वर्कआउट ड्रिंक्स बद्दल जाणून घेऊयात.

उन्हाळ्यात व्यायाम करताना डिहायड्रेशन टाळण्यासाठी प्या 'ही' 4 प्री वर्कआउट ड्रिंक्स
Pre Workout DrinksImage Credit source: TV9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: May 02, 2025 | 3:58 PM
Share

प्रत्येक ऋतूमध्ये आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण नेहमी व्यायाम करत असतो. अशातच उन्हाळ्यात व्यायाम करणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. परंतु या ऋतूमध्ये व्यायाम करताना अधिक काळजी घ्यावी लागते. कारण या दिवसांमध्ये डिहायड्रेशन म्हणजेच पाण्याची कमतरता होण्याचा धोका देखील वाढत असतो. जास्त घाम येणे शरीरात इलेक्ट्रोलाइट्स आणि आवश्यक खनिजांची कमतरता निर्माण करू शकते, ज्यामुळे थकवा, चक्कर येणे आणि अशक्तपणा येतो. त्यामुळे वर्कआउट करण्यापूर्वी आपले शरीर हायड्रेटेड राहणे खूप महत्वाचे आहे.

जर तुम्ही व्यायामापूर्वी तुमचे शरीर हायड्रेट केले तर व्यायाम करताना तुमचे शरीर डिहायड्रेट होण्याची शक्यता कमी होते. येथे आम्ही तुम्हाला अशा 5 प्री-वर्कआउट ड्रिंक्सबद्दल सांगत आहोत जे शरीराला हायड्रेट ठेवत नाहीत तर ऊर्जा देखील वाढवतात. चला तर मग जाणून घेऊयात…

नारळ पाणी

नारळाच्या पाण्याला नॅचरल ड्रिंक्स देखील म्हणतात. कारण नारळाच्या पाण्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम आणि कॅल्शियम सारखे आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे शरीराला हायड्रेट ठेवतात. वर्कआउट करण्यापुर्वी एक ग्लास थंड नारळ पाणी पिल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते आणि घामामुळे गमावलेले इलेक्ट्रोलाइट्स देखील भरून निघतात. ते पोटासाठी हलके असते आणि लवकर पचते. लिंबू पाणी

लिंबू पाणी प्यायल्याने स्वतःला हायड्रेटेड ठेवण्याचा एक सोपा आणि स्वस्त मार्ग आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. जर तुम्ही लिंबू पाण्यात थोडे मध आणि चिमूटभर मीठ घातलं तर ते वर्कआउटपूर्वीचे एक उत्तम ड्रिंक्स बनते. हे शरीराला डिटॉक्स करते आणि व्यायामासाठी आवश्यक असलेली ऊर्जा देखील प्रदान करते.

बेल सिरप

उन्हाळ्यात बेल फळाचा रस हा एक देशी सुपर ड्रिंक्स आहे. हे शरीराला थंड करते आणि डिहायड्रेशन टाळते. बेल फळाच्या रसात नैसर्गिक साखर असते, जी त्वरित ऊर्जा देते. सकाळी वर्कआउटपूर्वी बेल फळाचा रस प्यायल्याने पचनसंस्था देखील सुधारते.

कलिंगडाचा ज्यूस

कलिंगडामध्ये 90% पेक्षा जास्त पाणी असते. त्यामुळे कलिंगडाचा ज्यूस प्यायल्याने शरीर त्वरित हायड्रेट होते. यामध्ये असलेले लायकोपीन, व्हिटॅमिन ए आणि सी शरीराला ऊर्जा प्रदान करतात. वर्कआउटपूर्वी कलिंगडाचा ज्यूस हा एक स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पर्याय आहे.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.