AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मशरुम खायला आवडतात?, गरोदरपणात ‘या’ चुका करु नका नाहीतर…

गरोदरपणात संतुलित आहार घेणे खूप महत्वाचे आहे. कारण आईने संतुलित आहार घेतला तर मूल निरोगी राहते.

मशरुम खायला आवडतात?, गरोदरपणात 'या' चुका करु नका नाहीतर...
फक्त 1 लाखात सुरु करा हा बिझनेस, प्रति महिना कमाव 10 लाख रुपये
| Updated on: Mar 17, 2021 | 12:24 PM
Share

मुंबई : गरोदरपणात संतुलित आहार घेणे खूप महत्वाचे आहे. कारण आईने संतुलित आहार घेतला तर मूल निरोगी राहते. या काळात बर्‍याच पौष्टिक गोष्टी गर्भवती महिलेच्या आहारात समाविष्ट कराव्यात असे सांगितले जाते. त्यामध्ये मशरूममध्ये अनेक पोषक तत्व आहेत. पण मशरूम खाण्याचे काही फायदे आणि तोटे देखील आहेत. मात्र, गरोदरपणात मशरूम खाणे आरोग्यासाठी चांगले आहे की, नाही हे आज आपण बघणार आहोत. (Pregnant women should follow this things while eating mushrooms)

गरोदरपणात महिलांनी मशरूम खाल्ये तरी काही हरकत नाही. मात्र, गरोदरपणात महिलांनी मशरूम खातांना विशेष काळजी घेण्याची आवश्यक्ता असते. गरोदरपणात मशरूम पुर्णपणे शिजवूनच खाल्ले पाहिजे. बाळासाठी मशरूम हे खूप चांगले असते. मशरूममध्ये पोटॅशियम, प्रथिने, तांबे, सेलेनियम, फॉस्फरस, अँटिऑक्सिडंट्स, फायटोकेमिकल्स, जीवनसत्त्वे सी, बी आणि डी सारख्ये बरेच पौष्टिक घटक आढळतात. हे घटक आपल्या शरीरास अनेक रोगांपासून दूर ठेवण्यास मदत करतात.

‘व्हिटामिन डी’ शरीरासाठी खूप महत्वाचा घटक आहे. शरीरात ‘व्हिटामिन डी’ची कमतरता असल्यास बरेच आजार उद्भवतात. नैसर्गिकरित्या ‘व्हिटामिन डी’ आढळणाऱ्या भाज्या आणि फळे तशी कमीच आहेत. यापैकीच एक भाजी आहे मशरूम. मशरूममध्ये ‘व्हिटामिन डी’ मुबलक प्रमाणात आढळते. दररोज मशरूम खाल्ल्याने शरीराला आवश्यक तितके ‘व्हिटामिन डी’ नैसर्गिकरित्या मिळू शकते. ‘पांढरे मशरूम’ आणि ‘पोर्टेबेला मशरूम’मध्ये ‘व्हिटामिन डी’ चांगल्या प्रमाणात आढळते.

न्यूट्रिशनिस्ट म्हणतात की, आपण आपल्या आहारात अनेक प्रकारच्या गोष्टी समाविष्ट केल्या पाहिजेत. मशरूम ही एक खाण्यास चविष्ट आणि बनवण्यास अतिशय सोपी भाजी आहे. यातील पौष्टिकता टिकवण्यासाठी मशरूम कुठल्याही प्रकारे शिजवणे फायदेशीर ठरते. ‘मशरूम’च्या विविध पाककृती बनवणे खूप सोपे आहे. आपण आपल्या रोजच्या आहारात कोशिंबीर, भाजी किंवा सूपसारख्या पदार्थांतून ‘मशरूम’चा समावेश करू शकता.

संबंधित बातम्या : 

(Pregnant women should follow this things while eating mushrooms)

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.