AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिझ्झा-बर्गरपेक्षा समोसा जास्त हेल्दी, पोटभर खाऊ शकता डोसा आणि बटाट्याचे पराठेही, ASSOCHAM रिपोर्टमधून खुलासा

Indian Food Is Healthy : ASSOCHAMच्या एका अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, चीज पिझ्झापेक्षा वडा पाव जास्त हेल्दी असतो. तसेच चॉकलेट आइस्क्रीमपेक्षा कुल्फी जास्त आरोग्यदायी आहे.

पिझ्झा-बर्गरपेक्षा समोसा जास्त हेल्दी, पोटभर खाऊ शकता डोसा आणि बटाट्याचे पराठेही, ASSOCHAM रिपोर्टमधून खुलासा
ऑनलाईन समोसा ऑर्डर करताच डॉक्टरला गीड लाखाला गंडाImage Credit source: freepik
| Updated on: Apr 17, 2023 | 1:00 PM
Share

नवी दिल्ली : तुम्हीसुद्धा समोसा (samosa) , वडा पाव किंवा डोसा (dosa)खाण्याचे शौकीन असल्यास ते आता पोटभर खाऊ शकता. कारण हे पदार्थ हेल्दी आहेत ! वाचून आश्चर्य वाटलं ना, पण हे खरं आहे. आणि हे आम्ही नव्हे तर Assocham या उद्योग संघटनेच्या अहवालात म्हटले आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी असोचेमच्या कार्यक्रमात इंडिया फूडचा अहवाल सादर केला. Indian Cusisine at Crossroads – असे या अहवालाचे नाव होते. Assocham या अहवालात सर्वात मनोरंजक बाब म्हणजे, समोसे हे बर्गरपेक्षा आरोग्यदायी असल्याचे सांगण्यात आले आहे. पाश्चात्य खाद्यपदार्थांपेक्षा भारतीय अन्न अधिक आरोग्यदायी असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

तसेच ASSOCHAMच्या एका अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, चीज पिझ्झापेक्षा वडा पाव जास्त हेल्दी असतो. एवढंच नव्हे तर चॉकलेट आइस्क्रीमपेक्षा कुल्फी आणि ॲप्पल पाय पेक्षा संदेश ही बंगाली मिठाई जास्त आरोग्यदायी आहे.

बर्गरच्या तुलनेत समोसे अधिक हेल्दी

खरंतर समोसा आणि बर्गर हे दोन्ही जंक फूड मानले जातात. समोसे हे मैद्यापासून बनवतात आणि तेलात तळलेले असतात. पण त्यामध्ये उकडलेले बटाटे, जिरे, वाटाणे, मीठ, मिरची आणि मसाले अशा सर्व ताज्या गोष्टी वापरल्या जातात. बर्गरमध्ये जे पदार्थ मिळतात त्यापेक्षा हे घटक चांगले असल्याचे अहवालात म्हटले आहे.

तर दुसरीकडे बर्गरमध्ये प्रिझर्व्हेटिव्ह्ज, ॲसिडिटी रेग्युलेटर, इम्प्रूव्हर आणि अँटिऑक्सिडंट्स तसेच रिफाइंड गव्हाचे पीठ, साखर, गव्हाचे ग्लूटेन, वनस्पती तेल, यीस्ट, मीठ, सोया पीठ, तीळ, अंडयातील बलक, चीज आणि बटाट्याच्या पॅटीज असतात. कॅलरी युक्त समोसे अधिक चांगले असतात, कारण त्यात रसायने आढळत नाहीत, असे या अहवालात म्हटले आहे.

डोसा आणि आलू पराठा देखील ठरतात हेल्दी

असोचेमच्या अहवालात असे म्हटले आहे की पिझ्झाच्या तुलनेत जास्त कॅलरीज असलेले डोसे आणि बटाट्याचे पराठे देखील आरोग्यदायी असतात. या दोन्हीमध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. असोचेमच्या सर्वेक्षण अहवालात, 46 टक्के लोकांनी सांगितले की, त्यांच्या आवडीच्या अन्नाला कमी आरोग्यदायी रेटिंग दिल्यास ते निरोगी अन्न पर्यायाकडे वळणार नाहीत.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.