कोरोना काळात मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी ‘या’ 4 टिप्स फॉलो करा; ताणतणाव दूर करा

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Apr 29, 2021 | 3:16 PM

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोना रूग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. संसर्गाच्या वाढत्या घटनांमुळे लोकांची चिंता देखील वाढली आहे.

कोरोना काळात मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी 'या' 4 टिप्स फॉलो करा; ताणतणाव दूर करा
हेल्थ
Follow us

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोना रूग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. संसर्गाच्या वाढत्या घटनांमुळे लोकांची चिंता देखील वाढली आहे. त्याचा थेट परिणाम लोकांच्या मानसिक आरोग्यावर होतो आहे. कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे लोकांना घरातच राहावे लागत आहे. ज्यामुळे जास्त तणाव व नैराश्याच्या समस्या येत आहेत. या वेळी कोरोनाची दुसरी लाट पूर्वीपेक्षा जास्त प्राणघातक आहे. (Special tips for maintaining good mental health during the Corona period)

सतत वाढत्या संक्रमण आणि निर्बंधांमुळे लोकांच्या जीवनात बरेच बदल होत आहेत. अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम कर्मचाऱ्यांना दिले आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची शाळा व महाविद्यालये ऑनलाईन झाली आहेत. वाढत्या संसर्गामुळे लहान मुलांना देखील घराच्या बाहेर पडणे अवघड झाले आहे. आपल्या सर्वांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो आहे, ज्यामुळे ताण आणि नैराश्याच्या समस्या वाढल्या आहेत. या कठीण काळात आपण मानसिकदृष्ट्या निरोगी आणि सशक्त कसे राहू शकतात. हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

स्वतःची काळजी घ्या बरेचदा आपण घरून काम करताना किंवा दररोजची कामे करताना स्वत: कडे लक्ष देत नाहीत. विशेषत: या वेळी या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. यावेळी तुम्ही त्या गोष्टी करा ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. जेव्हा जेव्हा तुम्हाला बोर झाल्यासारखे वाटेल तेव्हा या गोष्टी करा.

नित्यक्रम पाळा या कठीण काळात, आपल्याला नित्यक्रमांचे पालन केल्याने फायदा होईल. हे आपले जीवन सामान्य बनवेल. असे केल्याने आपल्या शरीराचे घड्याळ सेट करण्यात मदत होईल. आपण दिवसभर एका जागी न बसता, थोडे घरात फिरले पाहिजे.

लिखाण करा तुमच्या मनात कोरोनाबद्दल अनेक प्रकारचे विचार येत असतील. त्याकडे दुर्लक्ष करून लिखाण करत बसा. तुम्हाला कोणत्या विषयावर लिहिण्यासाठी आवडते. त्याविषयी लिहा म्हणजे काही वेळासाठी तुमचे मन त्या लिखाणामध्ये लागेल.

आपल्या आवडीच्या गोष्टी करा यावेळी आपले छंद आणि आवडीच्या गोष्टी निश्चितपणे करा. असे केल्याने तुमचे मानसिक आरोग्य सुधारेल. तसेच आपण आनंदी व्हाल. आपण ऑनलाइन कोर्समध्ये सामील होऊ शकता जेणेकरून आपण समविचारी लोकांशी संवाद साधू शकाल.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(Special tips for maintaining good mental health during the Corona period)

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI