AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Real vs Fake Watermelon : कलिंगड केमिकलयुक्त आहे की नाही? कसं ओळखाल? या 3 गोष्टी पटकन चेक करा; नाही तर जीवावर बेतेल

आजकाल खाण्या-पिण्याच्या पदार्थांमध्ये भेसळ होणं खूप कॉमन आहे, अशा अनेक केसेस आपणही ऐकतो. अन्नधान्य काय आजकाल तर फळंही सुरक्षित राहिलेली नाहीत. उन्हाळ्यात सहज उपलब्ध होणारी आणि भरपूर मागणी असलेली कलिंगडंसुद्धा रासायनिक पद्धतीने पिकवून विकली जातात. मग खरी, नैसर्गिक आणि बनावट कलिंगडं, यातला फरक कसा ओळखायाच, ते आज शिकूया.

Real vs Fake Watermelon : कलिंगड केमिकलयुक्त आहे की नाही? कसं ओळखाल? या 3 गोष्टी पटकन चेक करा; नाही तर जीवावर बेतेल
कलिंगड खरं की खोटं, कसं ओळखाल ?Image Credit source: Getty Images
| Updated on: Apr 28, 2026 | 1:16 PM
Share

Real vs Fake Watermelon : उन्हाळा सुरू होताच बाजारात कलिंगडाची आवक वाढते. गोड, रसाळ कलिंगड खायला सर्वांनाच आवडतं आणि ते शरारासाछीही फायदेशीर असतं. त्यातील पोषक तत्वे आणि पाणी शरीर हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात, परंतु खरं, चांगलं कलिंगड खाल्लं, तरच त्याचा फायदा होतो. आजकाल प्रत्येक गोष्टीत भेसळ होत असून, आता तर फळांमधअयेही भेसळ झाल्याचे दिसून येते. त्यातच मुंबईतील पायधुनी इथं एकाच कुटुंबातील चार जणांचा रविवारी रात्री विषबाधेनं मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. पती, पत्नी आणि दोन मुलींनी रविवारी पात्री आधी बिर्याणी आणि त्यानंतर कलिंगड खाल्लं होतं. पहाटेच त्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला होता. नंतर चौघांचाही मृत्यू झाला.

या घटनेमुळे सगळेच हादरले आणि आता कलिंगडाबददल लोकांच्या मनात भीती बसली आहे. खरंतर फळांध्ये, कलिंगडात भेसळ कशी होईल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना ? कलिंगडाचा बाहेरील थर पूर्णपणे खरा दिसू शकतो, पण त्याला लाल रंग देण्यासाठी त्यात इंजेक्शन देऊन कलर-केमिकल टोचलेली असू शकतात. अशी केमिकल्स मिसळलेले टरबूज खाल्ल्याने तुम्ही आजारी पडू शकता आणि त्याचा कोणताही फायदा होत नाही. त्यामुळे खरं आणि बनावट टरबूज यांमधील फरक कसा ओळखायचा, तसंच योग्य टरबूज कसे निवडायचं हे जाणून घेऊया. हे सांगणार आहोत.

फूड पॉयझनिंगचा धोका

उन्हाळ्यात कलिंगडाची मागणी जास्त असल्यामुळे, अनेक विक्रेते, ते पिकवण्यासाठी रसायनांचा वापर करतात, ज्यामुळे कलिंगडाला गडद लाल रंग येतो. गोडवा वाढवण्यासाठी त्यात साखरही घातली जाते. त्यामुळे, ग्राहकांची अनेकदा फसवणूक होते आणि ते बनावट कलिंगड विकत घेतात. पण भेसळयुक्त कलिंगड खाल्ल्याने (Adulterated Watermelon) फूड पॉयझनिंग तसेच पोटाच्या विविध समस्या उद्भवू शकतात. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) खरं आणि बनावट टरबूज कसे ओळखावे हे सांगितलं आहे. चला, जाणून घेऊया.

खरं आणि बनावट कलिंगड कसं ओळखायचं ?

– सर्वात सोपी आणि सहज युक्ती म्हणजे टिशू पेपरची युक्ती. जेव्हा तुम्ही कलिंगड विकत घेता, तेव्हा ते पिकले आहे की नाही हे दाखवण्यासाठी दुकानदार ते कापतो. जर तुम्ही हे आधीपासून करत नसाल, तर तुम्ही ही युक्ती नक्कीच करू शकता. विक्रेत्याला कलिंगडाचा एक तुकडा कापायला सांगा आणि त्यावर टिश्यू पेपर ठेवा. जर तुम्ही तो टिशू पेपर कलिंगडावर lठेवला आणि त्याचा रंग लाल किंवा नारंगी झाला, तर ते कलिंगड, रंग बनावट आहे. जर टिशू पेपरचा रंग बदलला नाही, तर ते फळ अस्सल आहे असं समजा.

– बनावट कलिंगड ओळखण्यासाठी तुम्ही पाण्याची युक्ती देखील वापरू शकता. कलिंगडाटी एक फोड पाण्यात टाका. जर त्यामुळे पाण्याचा रंग लाल झाला, तर ते बनावट आहे. खऱ्या कलिंगडामुळे पाण्याचा रंग कधीही बदलत नाही. रासायनिकरित्या रंगवलेले कलिंगड हे पाण्यात विरघळू लागतं.

– तुम्ही रंगावरूनही कलिंगड ओळखू शकता. जर देठ पिवळसर आणि कोरडा असेल, आणि बुडाशी पिवळा ठिपका असेल, तर ते पिकलेलं असतं. जर देठ हिरवट असेल, बुडाशी पांढरा ठिपका असेल, रंग गडद लाल असेल आणि बिया पांढऱ्या असतील, तर ते बनावट कलिंगड असण्याची शक्यता आहे.

Follow Us
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक CCTV फुटेज समोर!
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,  ठाकरेंच्या नगरसेवकाला... नेमकं प्रकरण काय?
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला दुखापत
40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
Dhiraj Seth | भारतीय लष्कराला नवे सेनाप्रमुख! 40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ; नेमकं काय सांगितलं?