AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूर्यास्तच्या वेळी चालणे आरोग्यासाठी आहे खूपच फायदेशीर, जाणून घ्या फायदे

फिरायला जाणे किंवा फेरफटका मारणे हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तसेच सर्व वयोगटातील लोकांनी रोज थोडे थोडे चालायला जावे कारण यामुळे तुमच्या शरीरातील ऊर्जा टिकून राहते आणि अनेक आजारांचा धोका कमी होतो.

सूर्यास्तच्या वेळी चालणे आरोग्यासाठी आहे खूपच फायदेशीर, जाणून घ्या फायदे
| Edited By: | Updated on: May 11, 2025 | 10:42 AM
Share

आजकाल प्रत्येक व्यक्ती रोजच्या धावपळीमध्ये इतकी व्यस्त झाली आहे की त्यांच्याकडे सर्व काम करण्यासाठी वेळ आहे पण स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्यासाठीही वेळ नाही. हेच कारण आहे की लोकं त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यानंतर शरीर लहान वयातच अनेक आजारांना बळी पडते. अनेक लोकांवर कामाचा इतका ताण असतो की ते नैराश्य आणि चिंतेचे बळी बनतात. या सगळ्याला तोंड देण्याचे अनेक मार्ग आहेत, पहिले म्हणजे ध्यान करणे किंवा फिरायला जाणे. काही व्यायाम देखील आहेत जे तुमचा ताण कमी करण्यास मदत करतात. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही जिम किंवा योगा देखील करू शकता जे तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवेल.

तुम्ही अनेक लोकांना मॉर्निंग वॉकला जाताना पाहिले असेलच. शिवाय सकाळी लवकर उठुन चालायला जावे असा सल्ला देताना पाहिले आणि ऐकले असेल. जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल ज्यांना सकाळी लवकर उठण्यासाठी वेळ मिळत नाही किंवा ऑफिसच्या कामामुळे वेळ मिळत नाही, तर सूर्यास्तच्या वेळेस चालणे तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. त्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया.

सूर्यास्तच्या वेळेस चालणे (सनसेट वॉक) म्हणजे काय?

जेव्हा तुम्ही सूर्यास्ताच्या वेळी फिरायला जाता तेव्हा त्याला सनसेट वॉक म्हणतात. यामध्ये तुम्ही संध्याकाळच्या सुंदर दृश्यांचा आनंद घेत फिरू शकता, यामुळे तुमचा संपूर्ण दिवसाचा ताण कमी होईल आणि तुम्हाला बरे वाटेल. तसेच हा टाईम नेचरशी संपर्क साधण्यासाठी आणि तुमचा खराब मूड सुधारण्यासाठी काळ सर्वोत्तम आहे. म्हणून शक्य असल्यास तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी फिरायला जावे.

सूर्यास्ताच्या वेळी चालण्याचे काय फायदे आहेत?

तुमचा मूड चांगला करते

दिवसभराच्या धावपळीनंतर आणि जबाबदाऱ्या पूर्ण केल्यानंतर तुम्ही निसर्गाच्या जवळ जाऊन तुमच्या दिवसाचा सर्व ताण कमी करू शकता. सूर्यास्ताच्या वेळी फिरायला जाण्याने तुमच्या मनाला शांती मिळते. सूर्यास्ताच्या वेळी आकाशाचे सुंदर दृश्य, थंड वारा आणि चालताना दिसणारा प्रकाश यामुळे तुमचा खराब मूड देखील सुधारू शकतो.

झोप सुधारते

सूर्यास्ताच्या वेळी फिरायला जाण्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल ज्यामुळे तुम्हाला ताण जाणवणार नाही आणि जेव्हा मन शांत असेल तेव्हा तुमची झोपही चांगली होईल.

पचन चांगले होते

रात्रीच्या जेवणापूर्वी थोडे फिरायला गेल्याने पचनसंस्था निरोगी राहते. म्हणूनच संध्याकाळी जेवणानंतर फिरायला जाण्याचा सल्ला दिला जातो. संध्याकाळी जेवणापूर्वी तुम्ही सूर्यास्ताच्या वेळी फिरायला जाऊ शकता.

ऊर्जा वाढवते

तुम्ही तुमच्या व्यस्त टाईममधुन थोडा वेळ स्वतःसाठी काढून सनसेट पार्कला जावे, यामुळे तुमच्या आरोग्यासाठी अनेक फायदे होतील. तुमच्या शरीरासोबतच तुमचे मानसिक आरोग्यही चांगले राहील. फिरायला जाण्याने शरीरात ऊर्जा वाढते, त्यामुळे तुम्हाला कोणतेही काम करण्यास आळस वाटत नाही.

सर्जनशीलता वाढवते

निसर्ग तुमचा सर्वात चांगला मित्र आहे. त्याच्या जवळ गेल्याने, तुमची सर्व नकारात्मकता नाहीशी होते आणि तुम्ही गोष्टींबद्दल चांगल्या पद्धतीने विचार करू शकता आणि तुमचे मन देखील जलद काम करते ज्यामुळे तुमची सर्जनशीलता वाढते.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.