उन्हाळ्यात आपल्या पर्समध्ये ‘हे’ नक्कीच असू द्या….

आता थंडी संपत आली आहे उन्हाळा सुरू होत आहे. त्यामुळे आता सनस्क्रीनचा नियमित वापर करा.

उन्हाळ्यात आपल्या पर्समध्ये 'हे' नक्कीच असू द्या....
तेलकट त्वचा
Follow us
| Updated on: Mar 04, 2021 | 9:48 AM

मुंबई : आता थंडी संपत आली आहे उन्हाळा सुरू होत आहे. त्यामुळे आता सनस्क्रीनचा नियमित वापर करा. निरोगी त्वचेकरिता सनस्क्रीनचा वापर करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. उन्हाळ्याच्या वेळी दर तीन तासांनी पुन्हा सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. कधीही सनस्क्रीनशिवाय बाहेर पडण्याची चूक करू नका. सनस्क्रीनचा वापर हा अकाली वृद्धत्वापासून नक्कीच संरक्षण करेल. (Take care of your skin in summer)

रात्रीच्या वेळी देखील त्वचेची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. रात्रीच्यावेळी रेटिनॉइड्स समाविष्ट करा. ते आपल्या त्वचेची पोत सुधारण्यास मदत करेल तसेच मुरुमांपासून बचाव करेल. रेटिनॉल-आधारित मॉइश्चरायझर किंवा सीरम वापरू शकता. त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यासाठी आठवड्यातून एक्सफोलिएशन आणि स्टीम देऊ शकता. आठवड्यातून दोनदा सौम्य एक्फोलीएटर वापरा आणि आपल्या त्वचेला चमक कशी प्राप्त होते ते पहा.

एक्सफोलिएशन छिद्रांना अनलॉक करेल आणि त्वचेच्या सर्व मृत पेशीपासून मुक्त होईल. उन्हाळ्यात चेहऱ्याची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी फेशियल मिस्ट स्प्रे जवळ ठेवा. घाम आलेल्या त्वचेवर फवारा.आपल्या बॅगमध्ये सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर ठेवा. डोळ्यांभोवती त्वचा विशेषतः अधिक संवेदनशील असते. त्या त्वचेचे संरक्षण करा आणि उन्हात बाहेर पडताना नेहमी सनग्लासेस घाला.

ओठांनाही एसपीएफ असलेले लिप बाम वापरा. काही तासांनी हे लिप बाम पुन्हा लावा. आणि ओठ कोरडे वाटल्यास कधीही चाटू नका.हाताची आणि पायांची नियमित देखभाल करा. दर महिन्याला मेनिक्युअर आणि पेडीक्युअर करा. जर आपल्या त्वचेला खाज सुटण्यास त्रास होत असेल त्वचाविकार तज्ञांचा सल्ला घ्या. हलके आणि सूती कपडे घाला.

अंघोळीसाठी कोमट पाण्याचा वापर करा. उन्हाळ्यासाठी आपल्या त्वचेची देखभाल नियमित करण्यामध्ये मेसोथेरपी एक चांगला उपचार आहे. मेसोथेरपीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, खनिजे आणि पेप्टाइड्स यांचे मिश्रण वापरले जाते जे त्वचेला आतून संरक्षण करण्यास मदत करते. याकरिता आपल्या त्वचारोगतज्ज्ञ संवाद साधा.

संबंधित बातम्या : 

(Take care of your skin in summer)

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.