AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरातील फरशी दिसेल चमकदार फक्त पाण्यात मिक्स करा ‘ही’ एक पांढरी गोष्ट

घरातील फरशी कितीही घासून पुसली तरीही त्यावर चमक येत नाही. तर फरशीवरील तेलकट व हट्टी पिवळे डाग घालण्यासाठी महागड्या फ्लोअर क्लीनर पेक्षा स्वयंपाकघरातील या साध्या गोष्टी अधिक प्रभावी ठरू शकतात. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात.

घरातील फरशी दिसेल चमकदार फक्त पाण्यात मिक्स करा 'ही' एक पांढरी गोष्ट
Image Credit source: Social media
| Edited By: | Updated on: Apr 28, 2026 | 3:45 PM
Share

घराची स्वच्छता ही आपल्या आरोग्याशीही जोडलेली असते. त्‍यामुळे घर जर स्वच्छ आणि सुवासिक असेल तर मन आपोआपच प्रसन्न आणि हलके वाटते. पण अनेकदा घरातील फरशीवर सर्वाधिक धूळ, घाण आणि जीवाणू जमा होतात. मात्र रोज फरशी पुसूनही तिचा पिवळेपणा तसाच राहतो आणि जंतू पूर्णपणे नष्ट होत नाहीत. अशावेळी महागडी फ्लोअर क्लीनर वापरूनही अपेक्षित परिणाम मिळत नाही. पण तुम्हाला माहित आहे का की एक असा घरगुती उपाय आहे जो केवळ फरशीला चमकदार बनवत नाही, तर जीवाणूंचा नाश करतो आणि अनेक समस्यांपासून सुटका मिळवण्यास मदत करतो. चला तर मग आजच्या लेखात आपण कोणती आहे ही गोष्ट ते जाणून घेऊयात.

फरशी पुसण्याच्या पाण्यात मिक्स करा ही एक गोष्ट

घरातील फरशी पुसण्यासाठी पाण्यात मीठ टाका. तर मीठ केवळ आयोडीनची कमतरता दूर करण्यासाठी किंवा चव वाढवण्यासाठीच उपयुक्त नाही, तर ते तुमच्या घरातील फरशी चमकदार मदत करते. फक्त एका बादलीभर पाण्यात दोन चमचे मीठ टाका आणि त्याने संपूर्ण फरशी पुसून घ्या. याचे अनेक फायदे आहेत.

फरशीवरील जीवाणू नाहीसे होतात

पाण्यात मीठ टाकून फरशी पुसल्याने खोलवर स्वच्छता होते. तसेच फरशीवरील जीवाणू नाहीसे होण्यास मदत होते. कारण मीठामध्ये जीवाणूनाशक गुणधर्म असतात, जे फरशीवरील जीवाणूंना मारतात. तुम्ही या पाण्याने तुमच्या संपूर्ण घरातील फरशी पुसून ती पूर्णपणे जीवाणूमुक्त करू शकता.

फरशीवरील पिवळेपणा देखील निघून जातो

कधीकधी पांढऱ्या फरशीवर पिवळसरपणा येतो, जी फरशी स्वच्छ करणाऱ्या क्लीनरनेही निघत नाही. अशावेळेस तुम्ही पाण्यात मीठ टाकून फरशी पुसू शकता. यामुळे डाग निघून जातील, दुर्गंधी नाहीशी होईल आणि फरशी चमकदार दिसेल. मात्र, हे लक्षात ठेवा की हा पिवळेपणा केवळ नियमित वापरानेच काढता येतो. तात्काळ परिणामांची अपेक्षा करू नका.

माश्यासुद्धा पळून जातात

उन्हाळा सुरू झाला की घरांच्या फरशीवर माश्या जमा होऊ लागतात. त्यामुळे फरशीवर घाणही पसरते. अशावेळेस पाण्यात मीठ टाकून फरशी पुसल्याने माश्या दूर राहतात आणि तुमचे घर स्वच्छ राहते.

चिकटपणा निघून जातो

उष्णता वाढल्याने फरश्या दमट वातावरणामुळे चिकट होतात. तुम्ही कितीही पुसले तरी चिकटपणा तसाच राहतो. हा चिकटपणा दूर करण्यासाठी पाण्यात मीठ टाकून फरशी पुसने फायदेशीर मानले जाते. यामुळे चिकटपणा दूर होण्यास मदत होते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
महायुतीत मोठी खळबळ! आम्हाला वेगळंच... इकडे निमंत्रण पत्रिकेवरून बिनसल
महायुतीत मोठी खळबळ! आम्हाला वेगळंच... इकडे निमंत्रण पत्रिकेवरून बिनसलं तिकडे स्वबळाची भाषा; राजकारणात मोठं वादळ?
संघ, विश्व हिंदू परिषदेतील कार्यकर्त्यांना घडवा; ठाकरेंचा भाजपला सल्ला
Sharmila Thackeray | आमची पोरं कशाला चोरता, संघ, विश्व हिंदू परिषदेतील कार्यकर्त्यांना घडवा; शर्मिला ठाकरेंचा भाजपला सल्ला
शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांच्या स्वागतासाठी CM फडणवीस उपस्थित
शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांच्या स्वागतासाठी CM फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, सुनेत्रा पवार शाळांमध्ये उपस्थित
सरकारवर विश्वास वाढला, पण...; मनोज जरांगेंचं मोठं विधान चर्चेत
Manoj Jaranage | सरकारवर विश्वास वाढला, पण...; मनोज जरांगेंचं मोठं विधान चर्चेत
पुन्हा तेच घडलं! नवी मुंबईतील निमंत्रण पत्रिकेत शिंदेंचं नाव वगळलं?
पुन्हा तेच घडलं! नवी मुंबईतील निमंत्रण पत्रिकेत शिंदेंचं नाव वगळलं? भाजप नेता म्हणाला, महायुतीत सगळं...
2 महिन्यांनंतर शाळा सुरू! कुठे ढोल-ताशे, कुठे फुलांचा वर्षाव!
2 महिन्यांनंतर शाळा सुरू! कुठे ढोल-ताशे, कुठे फुलांचा वर्षाव; विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत
शाळेची घंटा वाजली अन् विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव!
Pune Mordern School First Day | शाळेची घंटा वाजली अन् विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव! उन्हाळी सुट्टीनंतर विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत
ज्यांच्यावर काडीमात्र शंका नसते तेच... युवा सेनेतील 40 कार्यकर्त्यांचा
ज्यांच्यावर काडीमात्र शंका नसते तेच... युवा सेनेतील 40 कार्यकर्त्यांचा उल्लेख करत राऊतांनी अखेर सगळंच सांगितलं
सोन्याने मोडले सर्व विक्रम! 10 ग्रॅमचा भाव 1.55 लाखांच्या पार
Gold -Silver Rate | सोन्याने मोडले सर्व विक्रम! 10 ग्रॅमचा भाव 1.55 लाखांच्या पार, तर चांदीचा भाव काय?
रोहित पवारांचं उपोषण अखेर स्थगित! मात्र मागण्या मान्य नाही झाल्या तर..
Rohit Pawar Protest | रोहित पवारांचं उपोषण अखेर स्थगित! मात्र मागण्या मान्य नाही झाल्या तर 4 जुलैला पुन्हा रणशिंग