AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मूर्ख पाकिस्तानची पोलखोल, भारताने कितीही दान केलं तरी…माजी राजदूताने सगळं बाहेर काढलं!

भारताने पाकिस्तानची वेगवेगळ्या मार्गांनी कोंडी केलेली आहे. सिंधू जलवाटप करार स्थगित करण्याचा निर्णयही याच रणनीतीचा भाग आहे. दरम्यान, याच सिंधू जलवाटप कराराबाबत पाकिस्तानचं दुखणं काय आहे? याची भारताचे माजी राजदूत विनय महोन क्वात्रा यांनी पोलखोल केली आहे.

मूर्ख पाकिस्तानची पोलखोल, भारताने कितीही दान केलं तरी...माजी राजदूताने सगळं बाहेर काढलं!
india and pakistan water treatyImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 02, 2026 | 3:18 PM
Share

India Pakistan Relations : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध खूप अगोदरपासूनच बिघडलेले आहेत. या दोन्ही शेजारी राष्ट्रांमधील संबंध सुरळीत व्हावेत यासाठी अनेकदा प्रयत्न झाले. परंतु अद्याप यात यश आलेलं नाही. 2025 साली पहलगाम हल्ल्यानंतर तर भारताचे पाकिस्तानसोबतचे संबंध जास्तच बिघडले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आता कोणताही व्यापार होत नाही. भारताने पाकिस्तानसोबत कोणताही व्यवहार करणार नसल्याचे जाहीर केलेले असले तरीही पाकिस्तान मात्र भारताविरोधात अजूनही कुरापती करत असतो. भारताने पाकिस्तानची वेगवेगळ्या मार्गांनी कोंडी केलेली आहे. सिंधू जलवाटप करार स्थगित करण्याचा निर्णयही याच रणनीतीचा भाग आहे. दरम्यान, याच सिंधू जलवाटप कराराबाबत पाकिस्तानचं दुखणं काय आहे? याची भारताचे माजी राजदूत विनय महोन क्वात्रा यांनी पोलखोल केली आहे.

पाकिस्तान अजूनही मागे का आहे?

अमेरिकेतील भारताचे राजदूत म्हणून काम केलेले विनय मोहन क्वात्रा यांनी सिंधू जलवाटप करारावर सविस्तर भाष्य केलंय. भारताने पाकिस्तानसोबत मैत्री आणि सद्भावनेच्या उद्देशाने हा करार केला होता. परंतु गेल्या कित्येक वर्षांपासून पाकिस्तानच्या आचरणात कोणताही बदल झालेला नाही, असं मत क्वात्रा यांनी व्यक्त केलंय. ‘न्यूजविक’मध्ये त्यांनी एक लेख लिहिला आहे. या लेखात त्यांनी पाकिस्तान कोणती चूक करतोय. पाकिस्तान अजूनही मागे का आहे? याची कारणं सांगितली आहेत. सिंधू जलवाटप करार स्थगित केल्याने अडचणीवाढणार नाहीत. उलट अगोदरपासूनच जे संबंध बिघडलेले आहेत, त्यांचा औपचारिक स्वीकार करणे होय, असं मत क्वात्रा यांनी व्यक्तं केलंय. भारताने 23 एप्रिल 2025 रोजी सिंध जलवाटप करार स्थगित केला होता. भारताच्या याच निर्णयाववर चर्चा करण्यासाठी पाकिस्तानात नुकतेच एक संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाची सगळीकडे चर्चा चालू असताना राजदूत विनय क्वात्रा यांनी लेख लिहून पाकिस्तानची पोलखोल केली आहे.

40 टक्के पाणी जातं वाया

सिंधू नदीचे साधारण 80 टक्के पाणी हे पाकिस्तानात जाते. परंतु यातील बरेच पाणी अजूनही वाया जाते. पाकिस्तानला मिळणाऱ्या एकूण पाण्यापैकी फक्त 40 टक्केच पाणी पाकिस्तानातील शेतापर्यंत पोहोचते, असं सांगत पाकिस्तानचे धोरण हे तकलादू आहे, असं क्वात्रा यांनी या लेखात सांगितलं आहे.

Follow Us
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का? NCP नेत्याचा...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का? बड्या NCP नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले
अंगावर भागलपुरी शाल, कानांवर रुमाल अन्... एका मतासाठी BMC तील नगरसेवक
अंगावर भागलपुरी शाल, कानांवर रुमाल अन्... एका मतासाठी भाजपनं BMC तील नगरसेवकाला रुग्णालयातून आणलं, Video व्हायरल
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण?
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? बड्या नेत्याचं भाकित ऐकून चकित व्हाल
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवास..
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे... नेमकं प्रकरण काय?
एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे...
एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे... फडणवीसांचा उल्लेख करत बड्या नेत्याचा धक्कादायक दावा