Gen-Z मध्ये वाढतोय राईस बिअर पिण्याचा ट्रेंड, आरोग्यासाठी किती फायदेशीर ?
मद्य कोणत्याही स्वरुपाचे असो ते प्रकृतीसाठी वाईटच असते. काही लोक बिअर चांगली मानतात. आता Gen-Z मध्ये राईस बिअर पिण्याचा ट्रेंड वाढतोय. त्यामुळे ती खरंच आरोग्यदायी आहे का ? काय म्हणतात तज्ज्ञ?

आजकाल तरुणांची लाईफस्टाईल वेगाने बदलत आहे. यात केवळ फॅशनच नव्हे तर खाण्यापिण्याचे अंदाज बदलत आहेत. खास करुन Gen-Z म्हणजे नव्या पिढीचे कल्चर बदलत आहे. आधी लोक पार्टीत बिअर पिण्यास प्राधान्य देत होते. आता राईस बिअर पिण्याचा नवा ट्रेंड सुरु झाला आहे. यात बिअर केवळ एक ड्रींक राहिली नाही. तर लाईफ स्टाईलचा भाग बनली आहे. येथे लोक आता रिलॅक्सेशन, मुड फ्रेश करणे आणि सोशल कनेक्शन वाढवण्यासाठी पित आहेत.
विशेष म्हणजे आजकल ‘लाईट बिअर’,वा ‘क्राफ्ट बिअर’ सारख्या व्हरायटी देखील यंगस्टरना आवडत आहेत.यांना ते हेल्दी ऑप्शन मानत आहेत. परंतू या वाढत्या ट्रेंड दरम्यान मोठा प्रश्न येतो की बिअर खरेच आरोग्याला चांगली असते का ? का हे केवळ एक मिथक आहे. या लेखात आपण बिअर फायद्याची की वाईट हे पाहणार आहोत.
राईस बिअर म्हणजे काय ?
राईस बिअरला फर्मेंटेड राईस ( तांदुळ ) पासून बनवले जाते. या हल्का, स्मुद आणि कमी कडू चव येण्यासाठी तयार केले जाते. त्यामुळे या बिअरची चव सर्वसाधारण बिअर पेक्षा जास्त ताजा असते. खासकरुन आशियाई देशात याचा ट्रेंड खूप जुना आहे. परंतू आता Gen-Z मध्ये हा ट्रेंड वाढत आहे. लोक तिला या साठी पसंद करत आहेत कारण ती लाईट असते. मात्र,या बिअरमध्ये अल्कोहोल असते. त्यामुळे तिचे सेवन कमी प्रमाणात करायला हवे. मात्र, हीला हेल्दी म्हटले जाते ते खरे की खोटे? तज्ज्ञ काय म्हणतात ?
गोरखपूरच्या रिजेन्सी हॉस्पिटलचे इंटर्नल मेडिसिन कंसल्टन्ट डॉ. विजय कुमार शर्मा यांच्या मते राईस बिअरमध्ये जरी काही प्रमाणात व्हिटामिन -B कॉम्प्लेक्स ,उदा. थायमिन (B1), राइबोफ्लेविन (B2) आणि नियासिन (B3) आढळते. परंतू हीला हेल्थी ड्रींक मानने चुकीचे आहे.कारण या राईस बिअरमध्ये अल्कोहोल देखील असते. जे जास्त प्रमाणात घेतले तर लिव्हर,मेंदू आणि हार्टवर नकारात्मक प्रभाव टाकते. एखादा व्यक्ती कधीतरी किंवा मर्यादित प्रमाणात ही बिअर घेत असेल तर काही नुकसान होत नाही. परंतू दररोज पिल्याने धोका निर्माण होतो.
Rice Beer चांगली की वाईट
राईस बिअरमध्ये काही प्रमाणात मॅग्नेशियम, पॉटेशियम आणि एंटीऑक्सीडेंट्स देखील असते. जे शरीराच्या मेटाबॉलिझ्म आणि एनर्जी प्रोडक्शनला मदत करते. परंतू हे मायक्रोन्युट्रिएंट्स खूपच कमी प्रमाणात असतात. ते मिळवण्यासाठी मद्यसेवन करणे योग्य प्रकार नाही. यामुळे राईस बिअर पिणे कमीत कमी प्यावी असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.
