AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात गुळापासून बनलेल्या सरबताचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे शरीरासाठी ठरेल वरदान, जाणून घ्या

उन्हाळ्याच्या दिवसांत शरीरातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी विविध प्रकारची पेये पितो. पण तुम्हाला माहित आहे का की गुळाच्या सरबताचे हे आरोग्यदायी फायदे कोणत्याही वरदानपेक्षा कमी नाहीत. चला तर मग गुळाचा सरबत कसा बनवायचा आणि त्याचे फायदे जाणून घेऊयात.

उन्हाळ्यात गुळापासून बनलेल्या सरबताचे 'हे' आरोग्यदायी फायदे शरीरासाठी ठरेल वरदान, जाणून घ्या
उन्हाळ्यात गुळापासून बनलेल्या सरबताचे 'हे' आरोग्यदायी फायदे शरीरासाठी ठरेल वरदान, जाणून घ्याImage Credit source: Freepik
| Edited By: | Updated on: Mar 30, 2026 | 6:24 PM
Share

उन्हाळा सुरू झाला की अनेकांना थकवा, अशक्तपणा, डोकेदुखी आणि डिहायड्रेशन या सामान्य समस्या उद्भवत असतात . यामुळे शरीराला एका नैसर्गिक आणि पौष्टिक पेयाची गरज भासते. यासाठी गुळाचा सरबत हा उन्हाळ्यातील या समस्या टाळण्यासाठी एक अत्यंत फायदेशीर, ताजेतवाने करणारे आणि ऊर्जा देणारे पेय आहे. गुळाचा सरबत प्यायल्याने शरीराला त्वरित थंडावा आणि ऊर्जा मिळते. तसेच उष्णतेमुळे शरीरात होणाऱ्या अनेक समस्यांपासून आराम मिळतो. चला तर मग आजच्या लेखात आपण उन्हाळ्यात गुळाचा सरबत पिण्याचे आरोग्यदायी फायदे कोणते आहेत ते कसे बनवायचे हे देखील जाणून घेऊयात.

गुळातील पोषक तत्वे-.

आयुर्वेदात गुळाला अमृत मानले जाते. कारण यामध्ये नैसर्गिक गोडव्याचा एक समृद्ध स्रोत असून साखरेपेक्षा कितीतरी चांगला पर्याय आहे. गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी 6 आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.

गुळाचे सरबत पिण्याचे फायदे:

1. ऊर्जा-

उन्हाळ्यात जेव्हा लोकांना थकवा आणि अशक्तपणा जाणवतो, तेव्हा गूळाचा सरबत प्यावे. यामुळे त्वरित ऊर्जा मिळते आणि रक्तक्षय दूर करण्यास मदत करतो.

2. पचन-

गूळाच्या सेवनाने पचनसंस्था मजबूत होण्यास मदत होते. ज्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो आणि आतडे स्वच्छ राहते.

3. पोटात जळजळीपासून आराम-

उन्हाळ्यात पाण्यात किंवा ताकात गूळ मिक्स करून प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो, तहान भागते आणि डिहायड्रेशन टळते. तसेच यामुळे पोटातील गॅस, आम्लपित्त आणि छातीत जळजळ कमी होते.

4. शरीरातील उष्णता काढून टाकण्यासाठी फायदेशीर गुळाचा सरबत

आयुर्वेदानुसार गुळातील नैसर्गिक खनिजे शरीराचे तापमान राखण्यास मदत करतात, ज्यामुळे उष्णतेतही अशक्तपणा जाणवत नाही. गुळाच्या सेवनाने ग्लुकोजदेखील मिळते, ज्यामुळे त्वरित ऊर्जा मिळते.

5. शरीराला हायड्रेट करते

उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात. गुळाचा सरबत मात्र त्यांची भरपाई करतो आणि शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत होते.

6. प्रतिकारशक्ती मजबूत होते

गुळाचे सरबत प्यायल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास आणि थकवा कमी होण्यासही मदत होते.

गुळाचे सरबत कसे बनवायचे

गुळाचे सरबत बनवणे देखील खूप सोपे आहे. अर्धा कप गूळ दोन कप पाण्यात विरघळवा. आता त्यात एक मोठा चमचा लिंबाचा रस, अर्धा छोटा चमचा भाजलेले जिरे, पुदिन्याची काही पाने आणि चवीनुसार काळे मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या. उन्हाळ्यात रोजच्या सेवनासाठी हे सरबत उत्तम आणि चविष्ट आहे.

तज्ञांच्या मते, उन्हाळ्यात गुळाचे सरबत पिणे खूप फायदेशीर आहे, कारण ते शरीराला नैसर्गिकरित्या थंडावा देते आणि आतून मजबूत करते. तथापि उन्हाळ्यात जास्त प्रमाणात गुळाचे सेवन करणे टाळावे. दिवसातून एक किंवा दोन ग्लास पुरेसे आहेत. मधुमेहींनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच गुळाचे सेवन करावे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी..
Big Breaking | नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी निदा खानला...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची महत्त्वाची बैठक सुरू, बारामतीतील...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने प्रवाशांना त्रास!
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारण
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारणारं दृश्य
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच...
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच उसळल्या लाटा
उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
Badlapur | धोक्याची घंटा! उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट,
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट, 300 मिमी पावसासह ढगफुटी...
प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
मोठी बातमी! प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील... थरकाप उडवणारे दृश्य समोर
नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद
Nashik | नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय