AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या अन्नपदार्थांपासून चार हात दूर राहा, अन्यथा कमी वयातच म्हातारे दिसाल, NIH चा धक्कादायतक अहवाल

Cause of premature aging : तुम्ही असे अन्नपदार्थ वारंवार खाल्ले किंवा त्यांचे आहारातील प्रमाण सारखे वाढत ठेवले तर हृदय रोगासह डायबिटीस आणि अन्य समस्यांना आयते आमंत्रण मिळेल.....

या अन्नपदार्थांपासून चार हात दूर राहा, अन्यथा कमी वयातच म्हातारे दिसाल, NIH चा धक्कादायतक अहवाल
ULTRA PROCESSED FOOD
| Updated on: Aug 06, 2024 | 2:55 PM
Share

तरुण पिढीला बर्गर, पिझ्झा, चाऊमीन आणि पेस्ट्री किंवा केक सारखे फास्ट फूड खूपच पसंद असते. याला अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्स मानले जाते. प्रोसेस्ड आणि अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्स एकदा खाऊ लागले तर आपल्याला ते संपविल्याशिवाय चैनच पडत नाही इतके ते स्वादिष्ठ असतात. परंतू आरोग्यावर त्याचा दूरगामी परिणाम होत असतो. त्यामुळे डॉक्टर अशा आहारापासून दूर राहण्याचा सल्ला देतात.  NIH च्या अहवालानुसार अल्ट्रा प्रोसेस्ड फूड खाल्याने 55 टक्के लठ्ठपणाला आमंत्रण मिळते.  41 टक्के स्लीप डिसऑर्डर, 40 टक्के टाईप – 2 डायबिटीज आणि 20 टक्के डिप्रेशनचा धोका असतो. प्रोसेस्ड फूडमुळे वयाआधीच म्हातारपण येते. त्यामुळे डॉक्टरांनी यापासून दूर रहायला सांगितले आहे.

प्रोसेस्ड फूडचा आरोग्यावर परिणाम

प्रोसेस्ड फूडमध्ये अनेक प्रकारचे स्वीटनर्स, कलर्स, थिकनर्स आणि एडिक्टिव्सचा वापर केला जातो. प्रोसेस्ड फूडने गट मायक्रोबायोटा असंतुलित होतात. यामुळे इंफ्लमेशनचा रिस्क देखील वाढते. प्रोसेस्ड फूड्स ( Processed Foods ) इटिंग डिसऑर्डर देखील वाढते. यामुळे ब्लोटिंग, डायरिया आणि पोटदुखीच्या समस्या निर्माण होतात. प्रोसेस्ड फूड्‍सने मेंदूच्या कार्यावर देखील मोठा वाईट प्रभाव पडतो.

1. डायबिटीजचा धोका वाढतो

प्रोसेस्ड फूडमध्ये फॅट्स आणि साखरेचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे आरोग्यावर मोठा परिमाण होतो. एक अहवालानूसार, जे लोक आपल्या आहारापैकी 22% पर्यंत प्रोसेस्ड फूड्स खातात त्यांच्यात डायबिटीजचा धोका जास्त असतो.नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या अहवालानूसार आठवड्यातून 2-3 वेळा जंक फूड खाणाऱ्यांना इन्सुलिन रेजिस्टेंसचे रिस्क वाढत आहेत.

2. वजन वाढणे

हाय शुगर, फॅटस आणि कार्ब्सने भरपूर असलेले  अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्स खाल्याने शरीरात कॅलेरीज वाढत जाते, त्यामुळे लठ्ठपणाचा धोका वाढत जातो. रिफांईड कार्ब्स, एडिड शुगर आणि ट्रांस तसेच सॅचुरेडिट फॅट्सच्या जादा वापराने हार्मोनल असंतुलन वाढत जाते. यामुळे शरीरात आळस आणि वजनवाढण्याच्या समस्या वाढत जातात. दररोज प्रोसेस्ड फूड खाल्याने लाईफस्टाईल डिसऑर्डर सारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

3. हार्ट अॅटॅकची समस्या

प्रोसेस्ड फूडमधील जादा चरबी शरीरात कार्डियोवस्कुलर डिसिजसारख्या समस्यांना वाढविते. हार्टअॅटॅक, स्ट्रोक आणि हायपरटेन्शन सारख्या जोखीम वाढतात. फूड एडिक्टिव्सने शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढत जाते. आणि हार्टअटॅक, स्ट्रोक आणि हायपरटेंशनची जोखीम वाढू लागते. हार्वर्ड हेल्थच्या रिपोर्टनूसार 20,000 लोकांनी 10 वर्षांपर्यंत दिवसाच्या चारी जेवणात प्रोसेस्ड फूडचा वापर केल्याने 62 टक्के लोकांना हृदयासंबधी समस्यांचा सामना करावा लागला.

4. वारंवार काही खाण्याची इच्छा

प्रोसेस्ड फूड्समध्ये अनहेल्दी फॅट्स, शुगर, ऑईल, केमिकल्स आणि मीठाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे खाल्यानंतर देखील भूक लागत असते. नेहमीच काही तरी खाण्याच्या इच्छेला इटिंग डिसऑर्डर म्हणतात. त्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर देखील वाईट परिणान होतो.

5. मेटाबॉलिज्मवर प्रभा

कार्ब्स खाल्ल्याने शरीरात एप्टी कॅलरी वाढते. त्याने डायजेशन वीक, ब्लोटिंग आणि पोट दुखी, एसिडीटीचा त्रास वाढत जातो. शुगर एडिड ड्रिंक, व्हाईट ब्रेड और चिप्स एंड वेफर्स खाल्ल्यान पचन क्षमतेवर मोठा परिणाम होतो. बॉडीत बॅक्टीरियाची पातळी वाढल्याने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल प्रॉब्लम वाढू शकतात.

6. स्किन की समस्या

शुगरी, ऑईली आणि रिफांइड कार्ब्स खाल्ल्याने स्किनवर सीबम सिक्रीशन वाढते. त्यामुळे चेहऱ्यावर तारुण्य पिटिका येतात.हिरड्यांचा त्रास होतो. ऑईली स्किनची समस्या वाढते. दरदिवशी प्रोसेस्ड फूड सेवन केल्याने त्वचा लवकर म्हातारपणाच्या खुणा दिसू लागतात.त्यामुळे कमी वयातच आपण म्हातारे दिसू लागतो.

( सावधान : ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. उपचार करण्यापूर्वी तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यावा )

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.