AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Infertility in Male : पुरूषांनो, या छोट्या-छोट्या सवयींमुळे वाढू शकते तुमची प्रजनन क्षमता

वंध्यत्वाची समस्या ही पुरूष किंवा महिला, मुली यांपैकी कोणालाही होऊ शकते. म्हणूनच आजच्या काळात मग पुरुष असो वा स्त्री, प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी योग्य ती पावले उचलत राहिली पाहिजेत.

Infertility in Male : पुरूषांनो, या छोट्या-छोट्या सवयींमुळे वाढू शकते तुमची प्रजनन क्षमता
Image Credit source: freepik
| Updated on: Apr 03, 2023 | 1:40 PM
Share

नवी दिल्ली : वंध्यत्वाची समस्या (infertility) म्हणजेच पिता होऊ न शकणे ही समस्या आज पुरुषांमध्ये सामान्य झाली आहे. खराब जीवनशैली, चुकीचे खाणे (unhealthy eating habits) याशिवाय अशा अनेक सवयी आहेत ज्या पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या कमी करण्याचे काम करतात. अनेक संशोधनानुसार वयाच्या 23 किंवा 25 व्या वर्षापासून आपण आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. वंध्यत्वाची समस्या ही पुरूष किंवा महिला, मुली यांपैकी कोणालाही होऊ शकते. म्हणूनच आजच्या काळात मग पुरुष असो वा स्त्री, प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी (health care) घेण्यासाठी योग्य ती पावले उचलत राहिली पाहिजेत.

येथे आपण काही सवयी जाणून घेऊया, ज्याचा अवलंब करून शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता वाढवता येते.

तुमची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी या सवयींचा करा अवलंब

जास्तीत जास्त पाणी पिणे

आजकालच्या व्यस्त जीवनात अन्नाशी संबंधित मोठी चूक म्हणजे पाणी नीट न पिणे. कमी पाणी प्यायल्याने शरीरात निर्जलीकरण म्हणजेच डिहायड्रेशन होऊ लागते आणि त्याचा परिणाम वंध्यत्वाच्या रूपात दिसून येतो. तज्ञांच्या मते, प्रत्येक व्यक्तीने दिवसातून किमान 3 लिटर पाणी प्यायले पाहिजे.

मद्यपान आणि सिगारेटपासून लांब रहावे

अल्कोहोल आणि सिगारेटमुळे जीवघेणी परिस्थिती उद्भवू शकते आणि हे माहित असूनही, बहुतेक पुरुषांना त्याचे व्यसन लागले आहे. पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता कमी करणारी ही सवय बाप होण्याचा आनंद हिरावून घेते. त्यांच्यापासून लांब राहण्याची चांगली सवय अंगिकारली पाहिजे.

योगासने किंवा व्यायाम

बहुतेक पुरुष हे डेस्क जॉब करतात किंवा बरेच लोक असे आहेत ज्यांचे वेळापत्रक खूप व्यस्त असते. तुम्ही कितीही व्यस्त असलात तरी तुमच्या आयुष्यातील किमान अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे तरी व्यायामासाठी काढावेत. नियमित व्यायाम केल्याने केवळ तुमची प्रजनन क्षमता वाढणार नाही तर आरोग्य चांगले राहील. तसेच हृदय आणि इतर अवयवही देखील निरोगी राहतील.

ड्राय फ्रूट्सचे रूटीन

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, शरीरात पौष्टिकतेच्या कमतरतेमुळे शुक्राणूंची पातळी कमी होऊ लागते. रोज किमान दोन बदाम, एक अक्रोड, दोन अंजीर आणि तीन ते चार मनुके भिजवून खाण्याची सवय लावावी. असे केल्याने तुम्हाला काही दिवसात फरक दिसून येईल.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.