ड्राय स्किनपासून सुटका हवी आहे? घरच्या घरी करा हे बेस्ट उपाय…
त्वचेची काळजी घेण्यासाठी सर्वात महत्वाचे ठरतात ते म्हणजे घरगुती उपाय. बरेच लोक ड्राय स्किनमुळे त्रस्त आहेत. जर तुम्ही यामुळे त्रस्त असाल तर काही घरगुती उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे.

हिवाळ्यात थंडी जास्त असल्या कारणामुळे त्वचा पूर्णपणे ड्राय पडते. त्यामुळे काही वेळा त्यातून रक्त सुधा येण्याची शक्यता असते. त्यावर आपण अनेक मश्चरायझर क्रिम अशा अनेक महागड्या गोष्टींचा वापर करत असतो. या गोष्टींना घेऊन अनेक लोक खूप त्रासलेली आहेत. पण आता घाबरायची गरज नाही घरच्या घरी करता येतील असे काही सोपे आणि प्रभावी उपाय आणि ते कसे करावेत ते आपण पाहणार आहे. त्वचा कोरडी होण्यामागे अनेक कारणे असू असतात. थंड व कोरडे हवामान, जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ करणे आणि कडक किंवा रासायनिक साबणांचा वापर केल्यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते व त्वचा कोरडी होते.
शरीरात पाण्याची कमतरता, संतुलित आहाराचा अभाव तसेच पुरेशी काळजी न घेतल्यासही त्वचा कोरडी पडते. काही वेळा वाढते वय, हार्मोनल बदल किंवा काही आजारांमुळेही त्वचेचा कोरडेपणा वाढू शकतो. योग्य मॉइश्चरायझरचा वापर, भरपूर पाणी पिणे आणि सौम्य साबण वापरणे यामुळे कोरड्या त्वचेची समस्या कमी करता येते.
कोरड्या त्वचेसाठी सर्वोत्तम घरगुती उपाय कोणता आहे?
कोरड्या त्वचेसाठी घरगुती आणि नैसर्गिक उपाय अतिशय प्रभावी ठरतात. रोज रात्री झोपण्यापूर्वी नारळ तेल किंवा तिळाचे तेल त्वचेवर लावल्यास त्वचेला आवश्यक ओलावा मिळतो आणि कोरडेपणा कमी होतो. आठवड्यातून दोन ते तीन वेळा दूधाची साय किंवा मध व दूध यांचे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यास त्वचा मऊ, गुळगुळीत व पोषक बनते. यासोबत भरपूर पाणी पिणे, कोमट पाण्याने आंघोळ करणे आणि कडक साबण टाळणे हे उपाय केल्यास त्वचा नैसर्गिकरित्या निरोगी आणि उजळ राहते.
रात्री झोपताना करा हे अत्यंत फायदेशीर उपाय
जर तुम्ही कोरड्या त्वचेमुळे त्रस्त असाल तर तुमच्यासाठी सर्वात महत्वाचे ठरते ते म्हणजे तेल आणि पाणी. बाकी काहीही तुम्ही त्वचेला लावले नाही तरीही चालते. तुम्ही रात्री झोपताना आठवणीने आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी थोडे तेल घ्या आणि त्यामध्ये पाणी मिक्स करून अंगाला लावा. ज्यामुळे त्वचेच्या समस्या कायमच्या दूर होण्यास मदत मिळते.
