Diabetes Test | मधुमेहाची तपासणी करताना करू नका ‘या’ चुका, अन्यथा होईल मोठी गडबड!

आपल्याला मधुमेह असल्यास, शरीरातील ग्लूकोजची पातळी नियंत्रित राखण्यासाठी आपण आपल्या रक्तातील साखरेची नियमितपणे तपासणी करणे अतिशय महत्वाचे आहे.

Diabetes Test | मधुमेहाची तपासणी करताना करू नका ‘या’ चुका, अन्यथा होईल मोठी गडबड!
जाणून घ्या कोरोनाव्हायरस तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर कसा परिणाम करतो?

मुंबई : आपल्याला मधुमेह असल्यास, शरीरातील ग्लूकोजची पातळी नियंत्रित राखण्यासाठी आपण आपल्या रक्तातील साखरेची नियमितपणे तपासणी करणे अतिशय महत्वाचे आहे. मधुमेहासाठी जे लोक औषध घेत नाहीत, त्यांनी नियमितपणे रक्तातील साखर तपासल्यास, मधुमेहावर नियंत्रण ठेवणे अधिक सोपे जाते. ही तपासणी करताना याची अचूकता तुम्ही कशाप्रकारे तपासणी करता यावर अवलंबून असते (These things keep in mind while checking blood sugar).

मधुमेह तपासणीसाठी बाजारात अनेक प्रकारचे प्रगत ग्लूकोमीटर उपलब्ध आहेत. परंतु, तरीही लोकांना ते एकतर योग्यप्रकारे कसे वापरावे हे माहित नाही किंवा त्यांच्याकडून काही लहान चूक केली जाते, ज्यामुळे त्यांच्या रीडिंगमध्ये मोठा फरक पडतो. आपले डायबीटीस रीडिंग चुकीचे येऊ नये म्हणून, आपण खाली नमूद केलेल्या या 5 गोष्टींकडे लक्ष देणे अतिशय महत्वाचे आहे.

जर तहान लागली असेल…

जर आपल्याला तहान लागली असेल आणि आपल्या शरीरात पाण्याची कमतरता असेल, तर त्याचा आपल्या मधुमेह तपासणीवर परिणाम होऊ शकतो. निर्जलीकरणामुळे शरीराच्या एकूण कामकाजावर परिणाम होण्याचा धोका देखील असतो. म्हणूनच यावेळी मद्यपान टाळा आणि आपण पुरेसे पाणी प्यायले आहे, याची खात्री करा.

जेवणानंतर लगेच साखर तपासताय?

बहुतेक वेळा लोक जेवणाच्या अर्धा तास किंवा एक तासाच्या नंतर रक्तातील साखर तपासतात, ही गोष्ट बरोबर मानली जाते. जेवण किंवा न्याहारीनंतर ताबडतोब चाचणी केल्यास आपल्या साखर पातळीत नेहमीच वाढ होते. जर आपल्याला योग्य निकाल मिळवायचा असेल, तर आपण खाण्यापूर्वी तपासणी करणे चांगले. किंवा खाल्ल्यानंतर किमान दोन तास थांबा (These things keep in mind while checking blood sugar).

तपासणी करण्यापूर्वी हात धुवा

स्वच्छता राखणे खूप महत्वाचे आहे, कारण यामुळे देखील आपले रीडिंग चुकीचे येऊ शकते. जर आपण चाचणी घेण्यापूर्वी काही खाल्ले किंवा प्यायले असेल आणि त्यातील पदार्थ आपल्या हातावर असेल, तर तो आपल्या मधुमेह तपासणीवर मोठ्या प्रमाणात परिणाम करू शकतो.

एकाच सुईचा वारंवार वापर टाळा

असे आढळले आहे की, बरेच रुग्ण एकाच सुईचा वापर पाच ते सहा वेळा करतात किंवा जास्त काळ सुई बदलणे टाळतात. यामुळे संसर्गाची शक्यता अनेक पटीने वाढू शकते. आपले मधुमेह रीडिंग योग्य यावे, म्हणून सुई एका वापरानंतर बदलली जावी.

चाचणी डिव्हाईसचा चुकीचा वापर

सर्वात अचूक परिणाम मिळवण्यासाठी. आपल्याला आपल्या मीटरसाठी योग्य लान्सट आणि चाचणी पट्ट्या वापरण्याची आवश्यकता आहे. आपण त्यांचा पुन्हा वापरल्यास, त्याने वाईट परिणाम दिसू शकतात. म्हणूनच प्रत्येक उपयोगानंतर त्यांना बदलण्याचा सल्ला दिला जातो. अचूक परिणाम मिळवण्यासाठी या तपासणी पट्ट्यांची एक्सपायरी तपासात राहा, कालबाह्य झाल्यास त्याचा वापर थांबवा.

(These things keep in mind while checking blood sugar)

हेही वाचा :

Published On - 6:21 pm, Fri, 12 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI