पती-पत्नीने एकमेकांना चुकूनही देऊ नयेत हे गिफ्ट; अन्यथा नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो
पती-पत्नीमधील नातेसंबंधात एकमेकांना गिफ्ट देणे फार महत्त्वाचे असते. पण काही वस्तू चुकूनही गिफ्ट म्हणून देऊ नयेत. त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्या जोडीदाराला देणे शक्यतो टाळाव्यात.

जोडीदाराला गिफ्ट देणे हे नात्यातील महत्त्वाचा भाग मानला जातो. लग्नाचा वाढदिवस असो,सण असो किंवा मग जोडीदाराचा वाढदिवस असो. अशा अनेक प्रसंगाना जोडीदाराला गिफ्ट दिले जाते. पण अनेकांना हे माहित नसेल की पती-पत्नीने एकमेकांना गिफ्ट दिले पाहिजे पण त्यातही काही वस्तू आहेत ज्या मकमेकांना टाळले पाहिजे. कारण त्या वस्तूंचा नात्यांवर नकळत परिणाम होतो. चला तर मग जाणून घेऊयात अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या जोडीदाराला गिफ्ट म्हणून देऊ नयेत.
बूट आणि चप्पल
तुमच्या जोडीदाराला बूट आणि चप्पल देऊ नयेत. या भेटवस्तू देण्याची चूक करू नका. असे म्हणतात की बूट आणि चप्पल दिल्याने जोडीदारांमध्ये वाद होतात आणि लवकरच नात्यात दुरावा निर्माण होतो. जर तुम्हाला तुमचे नाते कायमचे टिकवायचे असेल तर बूट आणि चप्पल देणे टाळा.
हँकरचीफ किंवा घड्याळ
तुमच्या जोडीदाराला रुमाल किंवा घड्याळ भेट देऊ नका. असे म्हणतात की या भेटवस्तू देणे म्हणजे वाईट काळाची सुरुवात असते. म्हणून, या वस्तू गिफ्ट म्हणून देऊ नये.
परफ्यूम
गिफ्ट म्हणून परफ्यूम देणे रोमँटिक वाटू शकते, पण ते योग्य नाही. असे म्हटले जाते की यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. ही भेटवस्तू दिल्याने पती-पत्नीमधील नाते बिघडू शकते. द्यायचेच असेल तर परफ्यूम ऐवजी तुम्ही अत्तर देऊ शकता. पण त्यात अल्कोहोलचे घटक नसतील याची काळजी घ्यावी लागेल.
काळी साडी
पतीने पत्नीला कधीही काळी साडी भेट म्हणून देऊ नये. काळे कपडे अशुभ मानले जातात. ते दिल्याने घरात समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो किंवा ते बिघडू शकते.
बुडणारे जहाज
बुडत्या जहाजाचे चित्र किंवा शोपीस कधीही भेट देऊ नये. अशा चित्रामुळे संघर्ष होऊ शकतो. अशा वस्तू भेटवस्तू दिल्याने जोडीदाराचे नुकसान देखील होऊ शकते. अशा वस्तू खरेदी करणे किंवा भेटवस्तू देणे टाळणेच चांगले.
जोडीदाराला गिफ्ट म्हणून काय देणे चांगले
जोडीदाराला तुम्ही सुगंधी परफ्यूम ऐवजी फुले देऊ शकता. तसेच चांदीचा किंवा सोन्याचा दागिना देऊ शकता. पर्स हा देखील त्या एक चांगला पर्याय आहे. तसेच तुमच्या जोडीदाराला वाचणाची आवड असेल तर तुम्ही एखाद छान पुस्तक गिफ्ट म्हणून देऊ शकता. किंवा तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर रोमँटीक डीनर डेटवरही जाऊ शकता तेही एक गिफ्टच आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
