AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रोमबुकबद्दल पसरलेल्या अफवा, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या या 8 सत्य गोष्टी

Chromebook आजच्या काळात केवळ विद्यार्थ्यांसाठीच नाही, तर ऑफिस, व्यवसाय, आणि अगदी सामान्य वापरासाठीही एक किफायतशीर, सुरक्षित आणि स्मार्ट पर्याय आहे. अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी या सत्य गोष्टी जाणून खरेदी करणे केव्हाही शहाणपणाचं ठरेल.

क्रोमबुकबद्दल पसरलेल्या अफवा, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या या 8 सत्य गोष्टी
ChromebookImage Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Jul 19, 2025 | 6:58 PM
Share

गेल्या दहा वर्षांपासून Google चं ChromeOS ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारे Chromebook लॅपटॉप्स बाजारात आहेत. एकेकाळी हे केवळ वेब ब्राउझिंगसाठी वापरले जायचे, पण आता हे वैयक्तिक आणि व्यावसायिक वापरासाठी एक उत्तम पर्याय ठरत आहेत. साधं इंटरफेस, सुरक्षेचे आधुनिक तंत्र, आणि सहज वापर ही याची प्रमुख वैशिष्ट्यं आहेत. मात्र तरीही Chromebook संदर्भात अनेक चुकीच्या समजुती आजही लोकांमध्ये आहेत. ‘ऑफलाइन वापरता येत नाही’, ‘हे खूपच कमी पॉवरचे असतात’ अशा अनेक अफवा सोशल मीडियावर फिरताना दिसतात. आज आपण अशाच 8 प्रमुख गैरसमजांचा वैज्ञानिक आणि तांत्रिक दृष्टिकोनातून उलगडा करूया.

1. Chromebook कमजोर असतात

शुरुवातीच्या काळात Chromebook खरंच फक्त वेब ब्राउझिंगसाठी वापरले जायचे. पण आता ते MediaTek, Intel, आणि Qualcomm सारख्या प्रोसेसरसह येतात. २०,००० रुपयांपासून १ लाखापर्यंतच्या रेंजमध्ये विविध क्षमतेचे मॉडेल्स उपलब्ध आहेत. सध्याच्या ChromeOS वर Android अ‍ॅप्स, व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि क्लाउड गेमिंग सहज चालतात.

2. ChromeOS म्हणजे फक्त Chrome ब्राउझर?

ChromeOSवर तुम्ही Brave, Firefox सारखे इतर ब्राउझर्स सुद्धा वापरू शकता. हे सर्व Google Play Store मध्ये उपलब्ध असून Chromebook टॅबलेट मोडमध्येही उत्तम काम करतात.

3. Chromebook सुरक्षित नाहीत

Chromebook मध्ये ऑटो अपडेट्स, सॅन्डबॉक्सिंग, आणि मल्टी-लेयर सिक्युरिटी असते. CVE डेटा सांगतो की २०१० पासून फक्त ५० सिक्युरिटी इश्यूज ChromeOS मध्ये नोंदवले गेले, जे Windows 10 च्या तुलनेत खूपच कमी आहे (Windows 10 मध्ये ३,०००+ इश्यूज).

4. Chromebook ऑफलाइन वापरता येत नाही

आजकाल Google Docs, Gmail, YouTube Music, Notes App वगैरे ऑफलाइन वापरता येतात. तुम्ही इंटरनेट शिवायही दस्तऐवज तयार, वाचू किंवा संपादित करू शकता. त्यामुळे ही धारणा कालबाह्य झाली आहे.

5. गेमिंगसाठी Chromebook वाईट आहेत

Play Store वरच्या Android गेम्स, Steam, GeForce Now, Amazon Luna, आणि Xbox Cloud Gaming हे सर्व Chromebook वर सहज चालतात. काही खास गेमिंग Chromebook मॉडेल्स (जसं Acer Chromebook 516 GE) सुद्धा बाजारात आले आहेत.

6. फोटो/व्हिडिओ एडिटिंगसाठी Chromebook योग्य नाही

प्रोफेशनल एडिटिंगसाठी Windows/Mac आवश्यक आहेत, पण कुटुंबासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी LumaFusion, Google Photos व्हिडिओ एडिटर आणि Adobe च्या अ‍ॅप्स Chromebook वर उत्तम चालतात.

7. Microsoft Office चालत नाही

Microsoft Office 365 चे Progressive Web Apps (PWA) Chromebook वर वापरता येतात. हे अ‍ॅप्स ऑफलाइनही काम करतात आणि नोटिफिकेशनही देतात. फक्त काही advanced फीचर्स डेस्कटॉप Office मध्ये जास्त मिळतात.

8. Windows Chromebook वर चालत नाही

तुम्ही थेट Windows इंस्टॉल करू शकत नाही, पण Chrome Remote Desktop किंवा Parallels for Chrome सारख्या टूल्सच्या साहाय्याने तुम्ही Windows किंवा Mac ला रिमोटली अ‍ॅक्सेस करू शकता.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.