AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हे’ नैसर्गिक आयुर्वेदिक स्किन केअर किट उन्हाळ्यात तुमच्या त्वचेला देतील गुलाबी चमक, जाणून घ्या बनवण्याची घरगुती पद्धत

उन्हाळ्यातील वातावरणामुळे त्वचेच्या समस्यांचा अनेकांना सामना करावा लागतो. अशातच चेहरा निस्तेज दिसू शकतो आणि त्याची चमक नाहीशी होऊ शकते. यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात त्वचा चमकदार करण्यासाठी हे नैसर्गिक स्किन केअर किट खुप फायदेशीर ठरेल. चला तर मग ते कसे बनवायचे जाणून घेऊयात.

'हे' नैसर्गिक आयुर्वेदिक स्किन केअर किट उन्हाळ्यात तुमच्या त्वचेला देतील गुलाबी चमक, जाणून घ्या बनवण्याची घरगुती पद्धत
| Edited By: | Updated on: May 29, 2026 | 6:22 PM
Share

उन्हाळ्यातील अतिरिक्त घाम, तीव्र सूर्यप्रकाश आणि दमटपणा यांचा केवळ आरोग्यावरच नव्हे तर त्वचेवरही परिणाम होतो. त्यामुळे ऋतूच्या बदलानुसार आपण प्रत्येकजण स्किन केअर च्या सवयींमध्ये बदल करत असतो. कारण उन्हाळ्यात मुरुमांची वाढ, त्वचेचा टॅन होणे आणि निस्तेजपणा यांसारख्या समस्या वाढू शकतात. स्किन केअर रूटिंगचे योग्य पालन केल्यास तुम्हाला त्वचेच्या अनेक समस्या कमी करता येतात, शिवाय तुमचा चेहरा तेजस्वी आणि चमकदारही राहतो. तर त्वचेच्या समस्या कमी करण्यासाठी महागडी उत्पादने नव्हे तर नैसर्गिक घटक उत्तम ठरतात.

सेलिब्रिटी पोषणतज्ञ श्वेता शाह यांनी नैसर्गिक घटकांचा वापर करून त्वचा निरोगी कशी राहील याबद्दल टिप्स सांगितल्या असून त्यांनी त्वचेची चमक वाढवण्यासाठी आयुर्वेदिक आणि नैसर्गिक घटकांचा वापर कसा करावा याबद्दल काही उपाय शेअर केले आहेत. त्यांनी एक सोपी समर किट शेअर केली आहे, जी तुम्ही सहजपणे फॉलो करू शकता. चला तर मग, या समर स्किन केअर किटबद्दल जाणून घेऊयात.

सकाळचे डिटॉक्स पेय

उन्हाळ्यात तुमच्या स्किन केअर किट मधील पहिली गोष्ट म्हणजे डिटॉक्स पेय. यासाठी सकाळी पाव चमचा ज्येष्ठमध पावडर पाण्यात उकळवा. दोन ते तीन वेळा उकळल्यानंतर गॅस बंद करा, गाळून घ्या आणि हे प्या. हे पेय तुमची त्वचा आतून स्वच्छ करण्यास मदत करेल.

हा ज्यूस तुमच्या त्वचेला बनवेल ग्लो

पोषणतज्ञ श्वेता शाह यांनी ज्यूसची एक रेसिपीसुद्धा शेअर केली आहे. हा ज्यूस उन्हाळ्यात तुमची त्वचा उजळ करेल आणि तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. बीट, गाजर, 1 आवळा आणि 8 ते 9 कढीपत्ता पाण्यासोबत एकत्र वाटून घ्या. गाळून घ्या आणि प्या. यामुळे तुमचे रक्त शुद्ध होईल आणि तुमच्या त्वचेची नैसर्गिक चमक वाढेल.

रात्रीची त्वचेची काळजी घेणारी क्रीम

रात्री एक साधे स्किन रिपेअर क्रीम वापरावी. ही क्रिम बनवण्यासाठी ताजा कोरफडीचा गर घ्या किंवा बाजारातून विकत आणा. त्यात कुमकुमादी तेलाचे 2-3 थेंब आणि तांदळाचे पाणी मिक्स करून मिश्रण चांगले फेटून घ्या. नंतर ते चेहऱ्यावर लावा आणि तसेच राहू द्या. हे घटक तुमच्या त्वचेला खोलवर आर्द्रता देतील आणि तिची दुरुस्ती करतील.

आठवड्याचे स्किन केअर

उन्हाळ्यातही तुमची त्वचा चमकदार ठेवण्यासाठी तुम्ही आठवड्यातून एकदा स्किन केअर घेतले पाहिजे. तर यासाठी लुध्रा पावडर, पांढरे चंदन, ज्येष्ठमध पावडर, मंजिष्ठा पावडर आणि गुलाबपाणी घ्या. हे सर्व औषधी वनस्पती समान प्रमाणात मिक्स करून पेस्ट बनवण्यासाठी त्यात गुलाबपाणी मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटांनंतर पाण्याने धुवा. हा फेस पॅक टॅनिंग कमी करण्यास, मुरुमे कमी करण्यास आणि उन्हाळ्यामुळे आलेला टॅन कमी करण्यासाठी मदत करतो. तर हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून दोनदा लावू शकता.

या गोष्टी लक्षात ठेवा

पोषणतज्ञांनी तुमची त्वचा उजळ करणाऱ्या काही आयुर्वेद आणि निसर्गोपचार-आधारित पद्धती सांगितल्या आहेत. या सर्व घटकांमुळे दुष्परिणाम होण्याचा धोका खूप कमी असतो आणि या गोष्टी सर्वज्ञात आहेत. जर तुम्हाला कोणत्याही घटकाची ॲलर्जी असेल, तर त्याचे सेवन करणे किंवा लावणे टाळा. याव्यतिरिक्त, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि क्लिंझिंग यांसारख्या तुमच्या दैनंदिन त्वचेच्या काळजीच्या नित्यक्रमाकडे दुर्लक्ष करू नका.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार?
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार? शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचा नेमका अर्थ काय?
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, चक्क…
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम...
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... राष्ट्रवादीत काय घडतंय?
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... अचानक दिलेल्या आदेशांमुळे राष्ट्रवादीत खळबळ
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! भाविकाकडुन कोट्यवधींच दान
Pandharpur | विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! अज्ञात भाविकाकडुन कोट्यवधींचं दान
काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात...
Baramati | काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात दुमदुमली बारामती, भक्तिमय क्षण कॅमेऱ्यात कैद
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने संपवलं जीवन
इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात दुचाकीची अंत्ययात्रा
Kolhapur App Protest | इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात थेट दुचाकीची अंत्ययात्रा; सरकारविरोधात जोरदार आंदोलन
यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये रक्तरंजीत राडा!
Mumbai Local | यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजीत राडा! काय घडलं?
NEET UG 2026 परीक्षेचा निकाल जाहीर, आर्यन गुप्ता आणि पंशुल बंसल अव्वल.

NEET UG 2026 परीक्षेचा निकाल जाहीर, आर्यन गुप्ता आणि पंशुल बंसल अव्वल

लॉर्ड्सवर रोहित शर्माच्या क्रिकेट कारकि‍र्दीला पूर्णविराम! वनडे वर्ल्डकप खेळणार नाही- रिपोर्ट्स.

लॉर्ड्सवर रोहित शर्माच्या क्रिकेट कारकि‍र्दीला पूर्णविराम! वनडे वर्ल्डकप खेळणार नाही- रिपोर्ट्स

धक्कादायक, एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारासह १४ जणांवर गुन्हा दाखल, काय नेमके प्रकरण ?.

धक्कादायक, एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारासह १४ जणांवर गुन्हा दाखल, काय नेमके प्रकरण ?

रोहित शर्माला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर का काढलं जात आहे? जाणून घ्या 3 कारणं.

रोहित शर्माला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर का काढलं जात आहे? जाणून घ्या 3 कारणं

जयंत पाटील अर्थमंत्री होणार ? महायुतीत अर्थमंत्री पदावरुन धुसफूस.

जयंत पाटील अर्थमंत्री होणार ? महायुतीत अर्थमंत्री पदावरुन धुसफूस

मोठी बातमी! जयंत पाटील शिंदेंच्या भेटीला, मोठं काहीतरी घडणार? नंदनवन निवासस्थानी खलबतं, घडामोडींना वेग.

मोठी बातमी! जयंत पाटील शिंदेंच्या भेटीला, मोठं काहीतरी घडणार? नंदनवन निवासस्थानी खलबतं, घडामोडींना वेग