Coronavirus : कोरोनाशी लढायचंय? तर ‘हे’ पदार्थ आहारात असायलाच हवेत, वाचा केंद्राच्या यादीत काय काय?

कोरोनापासून दूर राहण्यासाठी आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर दिला पाहिजे.

Coronavirus : कोरोनाशी लढायचंय? तर 'हे' पदार्थ आहारात असायलाच हवेत, वाचा केंद्राच्या यादीत काय काय?
फूड

मुंबई : कोरोनापासून दूर राहण्यासाठी आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर दिला पाहिजे. यासाठी आपल्याला जीवनशैलीमध्ये थोडासा बदल करणे आवश्यक आहे. हेल्दी आहार आणि व्यायाम सर्वात महत्वाचा आहे. यामुळेच आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. (To increase immunity include these things in the diet the government released the list)

रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आपण आहारात अनेक गोष्टी समाविष्ट करत आहोत. मात्र, आता भारत सरकारने आपल्या ट्विटर हँडलवरून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नेमके आपण आहारात काय घेतले पाहिजे. याची एक यादीच शेअर केली आहे. तसेच कोरोना रुग्णाने काय करावे? त्यासंदर्भात एक मार्गदर्शक सूचनाही प्रसिद्ध करण्यात आली आहे.

तज्ज्ञांच्या मते, कोरोना रूग्णांनी स्नायू बळकट होतील आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढेल अशाच अन्नाचा समावेश आपल्या आहारात केला पाहिजे. अशा गोष्टी खाल्ल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. कोरोना रूग्णांनी आहारात नाचणी, ओट्स, चिकन, मासे, अंडी, सोया यांचे सेवन केले पाहिजे. मार्गदर्शक तत्त्वानुसार शारीरिक व्यायाम, योग आणि श्वासोच्छ्वास करण्याचे व्यायाम कोरोना रूग्णांनी केले पाहिजेत.

तज्ज्ञांच्या मते, जर आपल्याला अन्न खाण्यास आणि चघळण्यास त्रास होत असेल तर अन्न अधिक शिजवा आणि थोडीशी आंब्याची पावडर त्यावर घाला. थोड्या थोड्या वेळाने खात राहा. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी दररोज हळद असलेले दूध प्या. तसेच डार्क चॉकलेटचे सेवन करा यात 70 टक्के कोको आहे. ज्यामुळे तणाव कमी होतो. हे खाल्ल्याने तुमची मनःस्थिती चांगली राहण्यास मदत होते.

डार्क चॉकलेट
डार्क चॉकलेट खाल्ल्याने मूड चांगला होतो. त्यात असलेले कोको रक्त परिसंचरण वाढविण्यासाठी कार्य करते, ज्यामुळे आपल्याला ऊर्जा प्राप्त होते. डार्क चॉकलेटमध्ये अँटीऑक्सिडेंट असतात. जे मेंदूत एंडोर्फिन आणि सेरोटोनिन वाढविण्यास मदत करतात. ओट्स आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. आपण ते वेगवेगळ्या प्रकारे खाऊ शकता. एका संशोधनात असे आढळले आहे की, नाश्त्यामध्ये 1.5-6 ग्रॅम ओट्स खाल्ल्याने दिवसभर आपल्याला उत्साह येतो. तसेच यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(To increase immunity include these things in the diet the government released the list)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI