AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोव्यात गर्दी, ‘हे’ 5 बीच ठरू शकता नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी खास

तुम्ही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बेस्ट डेस्टिनेशनच्या शोधात आहात का? तुम्ही गोव्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी याशिवाय देखील काही खास डेस्टिनेशन्स आहेत, त्याचा तुम्ही विचार करू शकता. अनेक समुद्रकिनारे आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी जाऊ शकतात. हे डेस्टिनेशन्स नेमके कोणते आहेत, याविषयी जाणून घेऊया.

गोव्यात गर्दी, ‘हे’ 5 बीच ठरू शकता नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी खास
| Edited By: | Updated on: Jan 03, 2025 | 1:50 PM
Share

नवीन वर्ष जवळ येत असून अनेकांचे सेलिब्रेशन्सचे प्लॅन आखणे सुरु आहेत. यातही बेस्ट डेस्टिनेशन्स कोणते, कुठे मजा येईल, समुद्रकिनाऱ्यावर नवीन वर्षाचं सेलिब्रेशन कसं राहिलं, असे सगळे प्रश्न सध्या चर्चेत आहेत. तुम्ही देखील नववर्षाच्या स्वागतासाठी बेस्ट डेस्टिनेशनच्या शोधात असाल तर ही बामती खास तुमच्यासाठी आहे. तुम्ही गोव्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी याशिवाय देखील काही खास डेस्टिनेशन्स आहेत, याविषयी आज विस्तारने जाणून घेऊया.

नवीन वर्षाचे स्वागत आम्ही खाली दिलेल्या डेस्टिनेशन्सवर करू शकता. हे समुद्रकिनारे केवळ सुंदरच नाहीत तर तुम्हाला एक वेगळा आणि खास अनुभवही देतील. गर्दीपासून दूर कुठेतरी नवीन वर्षाचं स्वागत करायचं असेल तर इथे जाण्याचा प्लॅन करू शकता.

2024 हे वर्ष जवळजवळ संपत आले आहे. लोकांनी 2025 म्हणजेच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी प्लॅनिंग सुरू केले आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला गोवा हे प्रसिद्ध ठिकाण आहे. इथल्या समुद्रकिनाऱ्यावर लोक खूप एन्जॉय करतात. नाईटलाईफ आणि न्यू इयर पार्टीसाठी ही जागा परफेक्ट आहे. अनेकांनी येथे नववर्ष साजरे करण्याचे नियोजनही केले आहे.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला गोव्यात एवढी गर्दी असते की, पाय ठेवायलाही जागा नसते. विमानांपासून ते हॉटेलरूमच्या दरांपर्यंत दर गगनाला भिडत आहेत. प्रत्येकाला हे परवडत नाही.

तुम्हाला न्यू इयरला बीचवर पार्टी करायची असेल तर आम्ही तुम्हाला भारतातील काही बीचबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही न्यू इयर सेल सेलिब्रेट करू शकता. येथे तुम्ही कुटुंबीय, मित्र, जोडप्यांसोबत ही जाऊ शकता. चला जाणून घेऊया त्या समुद्रकिनाऱ्यांबद्दल.

गोकर्ण, कर्नाटक

गोव्याचा पर्याय पाहिला तर कर्नाटकचा गोकर्ण परफेक्ट डेस्टिनेशन आहे. हे ठिकाण शांततेसाठी, सौंदर्यासाठी ओळखले जाते. येथे ओम बीच, कुडले बीच आणि हाफ मून बीचवर तुम्ही न्यू इयर पार्टी सेलिब्रेट करू शकता. इथलं सौंदर्य नववर्ष अधिक खास बनवेल. इथे तुम्हाला फोटो क्लिक करण्यासाठी चांगलं व्ह्यूही मिळेल. येथे तुम्ही सेल्फी, ग्रुप फोटो काढू शकता.

राधानगर बीच, अंदमान

अंदमानमधील राधानगर बीच आशियाखंडातील सर्वात मोठ्या समुद्र किनाऱ्यांमध्ये गणला जातो. येथील पांढरे वाळवंट, स्फटिक स्वच्छ पाणी आणि हिरवळ नवीन वर्षाचा आनंद लुटण्यासाठी परफेक्ट आहे. इथे खूप कमी गर्दी पाहायला मिळेल. नववर्षाच्या पूर्वसंध्येला तुम्ही येथे अनेक वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता.

कन्याकुमारी बीच, तमिळनाडू

कन्याकुमारी समुद्रकिनारा अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागराला मिळतो. नववर्षाच्या पूर्वसंध्येला सूर्योदय आणि सूर्यास्ताचे सुंदर दृश्य आपण येथे पाहू शकता. दरवर्षी न्यू इयर सेल साजरा करणाऱ्यांची गर्दी होत असते. ही जागा इतकी सुंदर आहे की तुम्ही इथल्या मैदानी भागात हरवून जाल.

मांडवी बीच, गुजरात

गुजरातमधील मांडवी बीच ज्यांना शांतता हवी आहे त्यांच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आहे. येथे तुम्ही उंटांच्या स्वारीचा आनंद घेऊ शकता. सूर्यास्ताचे सुंदर दृश्य पाहता येते. नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी हे परफेक्ट ठिकाण आहे.

चेराई बीच, केरळ

केरळचा चेराई बीच पर्यटकांची पहिली पसंती आहे. निसर्गप्रेमी येथे जाऊन नववर्ष साजरे करू शकतात. इथे समुद्राच्या लाटा तुम्हाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातील. गोव्यापेक्षा वेगळी जागा शोधत असाल तर हा बीच बेस्ट असेल.

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान