AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाळ्याच्या दिवसात खूपच मनमोहक दिसतात तेलंगणातील ही 5 ठिकाणं, नक्की करा एक्सप्लोर

पावसाळ्याच्या दिवसात तेलंगणामध्ये निसर्ग खूप सुंदर बहरलेला असतो. त्यामुळे यंदा पावसाच्या हलक्या सरीमध्ये निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जाण्याच्या प्लॅन करत आहात तर तेलंगणातील ही पाच ठिकाणांना भेट द्या

पावसाळ्याच्या दिवसात खूपच मनमोहक दिसतात तेलंगणातील ही 5 ठिकाणं, नक्की करा एक्सप्लोर
Bogatha Waterfall
| Edited By: | Updated on: Jun 03, 2026 | 8:06 AM
Share

तेलंगणा राज्य आपल्या संस्कृती आणि सुंदर ठिकाणांसाठी ओळखला जातो. त्यातच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये येथील सौंदर्य शिगेला पोहोचते. त्यामुळे तुम्ही जर पावसाळी ट्रिप प्लॅन करत असाल, तर तुम्ही तुमच्या फिरण्याच्या लीस्टमध्ये तेलंगणाचा समावेश करू शकता. पावसाळ्यात येथील डोंगर, धबधबे आणि हिरवळ स्वर्गासारखं वाटते.

पावसाळ्याच्या आगमनाने तेलंगणातील अनेक पर्यटन स्थळे एका नव्या तेजाने उजळून निघतात. ढगांनी वेढलेली दरी, खळाळणारे धबधबे आणि हिरवीगार वनराई पर्यटकांना खुणावतात. या लेखात आम्ही तुम्हाला तेलंगणातील अशा सर्वोत्तम ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जी पावसाळी ट्रिपसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतात.

बोगथा धबधब्याचे सौंदर्य अनुभवा

जर तुम्ही पावसाळ्यात तेलंगणात फिरण्याचा प्लॅन करत असाल, तर बोगथा धबधब्याला भेट द्यायला विसरू नका. हा धबधबा त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जातो. पावसाळ्यात त्याचे सौंदर्य शिगेला पोहोचते. पावसाळा सुरू झाला की त्याचे खळाळणारे पाणी आणि आजूबाजूची हिरवळ एक मनमोहक दृश्य निर्माण करते जे पाहतच राहावं असं वाटतं. याला “तेलंगणाचा नायगारा धबधबा” म्हणून ओळखले जाते.

अनंतगिरी हिल्स

हैदराबादपासून काही तासांच्या अंतरावर असलेल्या अनंतगिरी हिल्स पावसाळ्यात ढगांनी आणि हिरव्यागार वनराईने वेढले जाते. पावसाळ्यात या ठिकाणाला भेट देणे हा एक अनोखा अनुभव असतो. तुम्ही ट्रेकिंग, निसर्गप्रेमीं या शांत वातावरणाचा आनंद घेऊ शकता. हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी एक स्वर्ग आहे. पावसाळ्यात येथील दृश्य अधिकच मनमोहक होते.

कुंतला धबधबा

आदिलाबाद जिल्ह्यात असलेला कुंतला धबधबा हा तेलंगणातील सर्वात उंच धबधबा आहे. या ठिकाणाला अवश्य भेट द्यावी. पावसाळ्यात त्याचा पाण्याचा प्रवाह अनेक पटींनी वाढतो, ज्यामुळे त्याचे सौंदर्य अधिकच खुलते. निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफी शौकिनांसाठी हे ठिकाण एक आदर्श पर्यटन स्थळ ठरू शकते.

लखनवरम तलावावर काही निवांत क्षण घालवा

तुम्ही जर निवांत सुट्टीच्या शोधात असाल, तर लखनवरम तलाव हे भेट देण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. घनदाट जंगल आणि लहान टेकड्यांनी वेढलेला हा तलाव पावसाळ्यात एक विस्मयकारक दृश्य सादर करतो. तलावावरील झुलता पूल हे पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण आहे. येथील शांत आणि नैसर्गिक वातावरण पावसाळ्यात एक अनोखी शांती प्रदान करते.

मल्लेला तीर्थम देखील एक्सप्लोर करा

नाल्लामालाच्या जंगलात वसलेला मल्लेल तीर्थम हा एक निसर्गरम्य धबधबा आहे, जो पावसाळ्यात अधिकच आकर्षक बनतो. वाहणारे पाणी, घनदाट जंगल आणि सभोवतालचा परिसर पर्यटकांना निसर्गाच्या अधिक जवळ आणतो. पावसाळ्यातील ट्रिपसाठी तेलंगणातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी हे एक मानले जाते.

Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले