Skin Care Tips: टॅनिंगच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ उपाय

रणरणत्या उन्हामुळे त्वचा टॅन होते. दरवेळेस पार्लरमध्ये जाऊन टॅनिंग घालवणं शक्य नाही. घरच्याघरी हे उपाय करून पहा आणि टॅनिंगपासून कायमची मुक्ती मिळवा.

Skin Care Tips: टॅनिंगच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी घरच्या घरी करा 'हे' उपाय
skin tanning
Image Credit source: Twitter
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Jul 06, 2022 | 3:56 PM

उन्हाच्या तडाख्यामुळे कामासाठी बाहेर पडणा-या लोकांची त्वचा सूर्यकिरणांच्या संपर्कात येऊन काळवंडते. या हानिकारक किरणांमुळे त्वचा तर टॅन (Tannig Problem)होतेच पण अनेक समस्यांचाही सामना करावा लागतो. प्रदूषणामुळेही त्वचेवर परिणाम होतो. काळवंडलेल्या त्वचेचा रंग पूर्ववत करण्यासाठी प्रत्येक वेळेस पार्लरमध्ये जाऊन अपॉइंटमेंट घेणे शक्य होत नाही. तसेच टॅनिंग कमी करण्यासाठी वापरलेल्या ब्युटी प्रोडक्ट्समुळे (Beauty Products) त्वचेचे नुकसानही होऊ शकते. मात्र दरवेळी ब्युटी प्रॉडक्ट्स वापरण्यापेक्षा घरच्याघरी (Home remedies) उपाय केले तर टॅनिंग कमी होतेच पण त्वचेचीही हानी होत नाही. काळवंडलेली त्वचा पूर्ववत करण्यासाठी म्हणजेच टॅनिंगचा त्रास कमी करण्यासाठी घरात सहज सोप्या रितीने कोणते उपाय करता येतील ते पाहूया.

मध आणि पपई

मधाचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. मात्र हाच मध आपल्या त्वचेसाठीही तितकाच उपयुक्त ठरतो. एका बाऊलमध्ये दोन चमचे पपईची पेस्ट घ्या. त्यामध्ये एक चमचा मध मिसळा. आता हे मिश्रण नीट एकत्र करा. जिथे जिथे त्वचा काळवंडली आहे किंवा टॅनिंग झाले आहे, त्या भागावर हे मिश्रण लावून 20 मिनिटांनी ते थंड पाण्याने धुवून टाका. नियमित वापरानंतर बदल दिसून येईल.

बेसन आणि हळदीचा पॅक

हळदीचे उपयोगी गुणधर्म तर सर्वांनाच माहीत आहेत. आपल्या रोजच्या आहारातही आपण हळदीचा आवर्जून समावेश करतो. हीच हळद त्वचेसाठीही खूप गुणकारी आहे. टॅनिंग घालवण्यासाठी एका बाऊलमध्ये एक चमचा बेसन घ्यावे. त्यात चिमुटभर हळद घालावी. त्यामध्ये थोडेसे दही घालून हे सर्व मिश्रण नीट एकत्र करून घ्यावे व काळवंडलेल्या भागावर लावावे. त्वचेवर लावलेला पॅक वाळल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवावे.

टोमॅटोचा वापर

एक टोमॅटो घेऊन तो स्वच्छ धुवावा. त्याचा अर्धा भाग कापून तो मॅश करावा. हा मॅश केलेला भाग टॅनिंग झालेल्या जागी चोळून लावावा. थोड्या वेळानंतर तो भाग स्वच्छ धुवून घ्यावा आणि मऊ कापडाने पुसावा. टोमॅटोच्या वापरामुळे तुमची त्वचा चमकदार होण्यास मदत होते.

काकडी आणि गुलाबजल

त्वचेवरील टॅनिंग घालवण्यासाठी काकडी आणि गुलाबजल खूप उपयुक्त ठरते. काकडी किसून एका बाऊलमध्ये त्याचा रस घ्यावा. त्यामध्ये समप्रमाणात गुलाबजल मिसळावे. आता कापसाच्या मदतीने ते मिश्रण टॅन झालेल्या भागावर हळुवारपणे लावावे. ते वाळल्यानंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवावे. यामुळे टॅनिंग निघण्यास मदत तर होतेच त्याशिवाय त्वचेलाही थंडावा मिळतो.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें