जेवणात दालचिनी वापरा अन् मधुमेह, रक्तदाबावर नियंत्रण मिळवा

विविध आजार दूर करण्यासाठी दालचिनी उपयुक्त आहे. मधुमेहावर तर दालचिनी एक रामबाण औषध आहे. (Use cinnamon in meals and control diabetes and blood pressure)

जेवणात दालचिनी वापरा अन् मधुमेह, रक्तदाबावर नियंत्रण मिळवा
जेवणात दालचिनी वापरा अन् मधुमेह, रक्तदाबावर नियंत्रण मिळवा
Follow us
| Updated on: Mar 12, 2021 | 9:32 AM

मुंबई : जेवणात दालचिनीचा उपयोग करणे हे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. दालचिनी विविध अर्थाने गुणकारी आहे. त्यामुळे मसाल्यात आवर्जून दालचिनीचा वापर करायला हरकत नाही. दालचिनीचे आयुवैर्दिक गुणधर्म आहेत. त्यातील प्रमुख गुणधर्म म्हणजे दालचिनी खण्यामुळे शरिरातील साखरेचे प्रमाण झपाट्याने कमी करण्यास मदत होते. त्यामुळे जेवण चवदार बनवण्याच्या हेतूनेच नव्हे तर एक आयुर्वेदिक उपाय म्हणून जेवणात दालचिनीचा वापर रोज केला पाहिजे. विविध आजार दूर करण्यासाठी दालचिनी उपयुक्त आहे. मधुमेहावर तर दालचिनी एक रामबाण औषध आहे. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठीही दालचिनी उपयुक्त आहे. याच पार्श्वभूमीवर दालचिनीचा जेवणमध्ये वापर किती प्रमाणात करायचा हे जाणून घेऊया. (Use cinnamon in meals and control diabetes and blood pressure)

दालचिनी चहा

अन्नाची चव वाढवण्यासाठी मसाला वापरला जातो. त्याचबरोबर चहामध्ये दालचिनी वापरून आरोग्याची काळजी घेता येते. दालचिनी चहा रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास उपयुक्त आहे. जाणकारांच्या मते, दालचिनीमध्ये अनेक औषधी घटक असतात. यात अँटी-ऑक्सीडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मदेखील आहेत. टाईप- 2 मधुमेह आणि इन्सुलिन रेसिस्टंटमध्ये दालचिनी चहा रामबाण उपाय आहे. प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी दालचिनी चहा फायदेशीर आहे. यासाठी दररोज सकाळी आणि संध्याकाळी दोन कप दालचिनी चहा प्या. त्याचवेळी दररोज चालणे करा.

दालचिनी पावडर टाकून उकळलेले पाणी प्या

आपण मधुमेहाचे रुग्ण असल्यास आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवू इच्छित असल्यास आपण या सोप्या मार्गाने दालचिनी वापरू शकता. यासाठी तीन चमचे दालचिनी पावडर एक लिटर पाण्यात 20 मिनिटे उकळवा. त्यानंतर संपूर्ण दिवसभर हे पाणी प्या. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

संशोधनातही दालचिनीचे महत्त्व सिद्ध

माझंदरण वैद्यकीय विज्ञान विद्यापीठाच्या संशोधनात दालचिनीचे वर्णन मधुमेहावरील औषध म्हणून करण्यात आले आहे. मधुमेहाचा प्रभाव कमी करण्यासाठी दालचिनी प्रभावी ठरू शकते, हे या संशोधनातून समोर आले आहे. यासाठीच मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या सोयीनुसार दालचिनीचा जेवण, चहामध्ये वापर करावा. दालचिनीचे सेवन रक्तातील साखर नियंत्रित करण्यास खूप मोठी मदत करते. त्यामुळे मधुमेह वा रक्तदाब असेल तर चिंता करण्याची गरज नाही. दालचिनीसारख्या रामबाण औषधाचा वापर करून आपण या गंभीर आजारांवरही मात करू शकतो. (Use cinnamon in meals and control diabetes and blood pressure)

इतर बातम्या

अवघ्या 299 रुपयांत कोरोनाची RTPCR टेस्ट; ‘या’ विमान कंपनीची जबरदस्त ऑफर

China Virus Passport : कोरोनाला थोपवण्यासाठी चीनमध्ये ‘व्हायरस पासपोर्ट’चं लाँचिंग, जाणून घ्या नेमकी भागनड काय?

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.