Travel | भारताच्या ‘या’ गावात आजही सुखाने नांदतायत कौरव-पांडवांचे वंशज, तुम्हीही देऊ शकता भेट!

Harshada Bhirvandekar

|

Updated on: Mar 09, 2021 | 10:09 AM

उत्तराखंडमध्ये फिरण्याची योजना आखत असाल, तर इथे बघण्यासारखे खूप काही आहे. या राज्यात बरीच शहरे आणि गावे आहेत, ज्याबद्दल लोकांना जास्त माहिती नाही.

Travel | भारताच्या ‘या’ गावात आजही सुखाने नांदतायत कौरव-पांडवांचे वंशज, तुम्हीही देऊ शकता भेट!
कलाप गाव
Follow us

मुंबई : भारतातील उत्तराखंड या राज्याला ‘देवभूमी’ म्हणून ओळखले जाते. या राज्यात सगळ्याच हंगामात पर्यटकांची गर्दी असते. हवामान काहीही असो, उत्तराखंडचे सौंदर्य नेहमीच खुलून दिसते. उत्तराखंडमध्ये फिरण्याची योजना आखत असाल, तर इथे बघण्यासारखे खूप काही आहे. या राज्यात बरीच शहरे आणि गावे आहेत, ज्याबद्दल लोकांना जास्त माहिती नाही (Uttarakhand Travel Descendants of the Kauravas and Pandavas still happily live in Kalap village).

आज आम्ही तुम्हाला उत्तराखंडमधील एका खेड्याबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल माहिती करून घेणे तुम्हाला नक्कीच आवडेल. हे गाव पांडव आणि कौरवांशी संबंधित आहे.

पांडव आणि कौरवांच्या वंशजांचे गाव

उत्तराखंडच्या वरच्या गढवाल भागात असलेले ‘कलाप’ गाव बर्‍याच भागापासून अलिप्त आहे आणि बहुतेक लोकांना त्याची माहितीही नाही. इथली लोकसंख्या सामान्य लोकसंख्येपेक्षा कमी आहे. फारशी लोकसंख्या नसतानाही आणि या गावात प्रसिद्ध असे काही नसले तरीही कलाप गाव अतिशय खास आहे आणि याच गावात आपल्यात पौराणिक काळाचे एक खोल रहस्य दडले आहे.

‘कलाप’ गाव उत्तराखंडच्या टन्स व्हॅलीमध्ये स्थित आहे आणि ही संपूर्ण दरी महाभारताचे जन्मस्थान मानली जाते. असे मानले जाते की, रामायण आणि महाभारताचा इतिहास या गावाशी जोडलेला आहे. याच कारणास्तव, इथले लोक अजूनही स्वत:ला पांडव आणि कौरवांचे वंशज म्हणतात (Uttarakhand Travel Descendants of the Kauravas and Pandavas still happily live in Kalap village).

निसर्ग सौंदर्याने नटलेल कलाप गाव

हे गाव त्या भागातील इतर भागांपासून काहीसे अलिप्त आहे. इथल्या लोकांचे आयुष्यही खूप कठीण आहे. शेती हा येथील रहिवाशांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. याशिवाय मेंढी पालनही केले जाते. या गावच्या सौंदर्यामुळे आणि रामायण व महाभारताशी खास नाते असल्यामुळे, हे प्रवासी ठिकाण म्हणून सध्या विकसित केले जात आहे.

कलाप गावाशी संबंधित विशेष गोष्टी

या गावात कर्णाचे एक मंदिर आहे. म्हणूनच येथे कर्ण महाराज उत्सवही साजरा केला जातो. हा विशेष उत्सव येथे दर दहा वर्षांच्या अंतराने साजरा केला जातो. इतकेच नाही, तर येथे जानेवारी महिन्यात पांडव नृत्यही सादर केले जाते, त्यात महाभारताच्या अनेक कथा सादर केल्या जातात.

भौगोलिक दृष्ट्या हे स्थान खूपच दुर्गम मानले जाते. हेच कारण आहे की, येथील लोक जे काही खातात, पितात किंवा घालतात ते सर्व काही तिथेच तयार केले जाते. या गावात खसखस, गूळ आणि गव्हाचे पीठ एकत्र करून एक खास पदार्थ बनवला जातो.

आपण येथे कधी भेट देऊ शकता?

कलाप हे गाव दिल्लीपासून 540 किलोमीटर अंतरावर आहे, तर हे देहरादूनपासून 210 किलोमीटर अंतरावर आहे. आपण वर्षाच्या कोणत्याही वेळी या गावात जाऊ शकता. येथून आपण हिमवृष्टीचे सुंदर आणि अविस्मरणीय दृश्य पाहू शकता.

(Uttarakhand Travel Descendants of the Kauravas and Pandavas still happily live in Kalap village)

हेही वाचा :

Weekend Trip | आठवडाभराच्या ताणाने कंटाळलायत? मग, मुंबईतील ‘या’ विरंगुळ्याच्या ठिकाणांना नक्की भेट द्या!

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI