AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एप्रिलमध्येही बर्फवृष्टीचा घ्या आंनद, भारतातील ‘या’ ठिकाणी बघायला मिळेल सुंदर दृश्य

एप्रिल आणि मे हे महिन्यातील वातावरण खूप दमट आणि उष्ण असतात. या महिन्यांत, काही लोकांना अनेकदा थंड ठिकाणी जाण्याला सर्वाधिक प्राधान्य देतात. यासाठी अनेकजण हिमाचल प्रदेश ते काश्मीर असा प्रवास करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की देशात अशी काही ठिकाणे आहेत जिथे तुम्हाला थंड हवामान तर मिळेलच पण उन्हाळ्यात बर्फाशी खेळण्याचा आनंदही मिळेल. चला तर मग त्या ठिकाणांबद्दल जाणून घेऊयात...

एप्रिलमध्येही बर्फवृष्टीचा घ्या आंनद, भारतातील 'या' ठिकाणी बघायला मिळेल सुंदर दृश्य
SnowfallImage Credit source: Tv9 Bharatvarsh
Updated on: Apr 25, 2025 | 8:01 PM
Share

उन्हाळ्याच्या दिवसात कडक उन्हाचा तडाखा आणि वाढत्या तापमानाचा तुम्हाला त्रास होऊ लागतो तेव्हा तुम्हाला अशा ठिकाणी जावेसे वाटते जिथे थंड वारा, बर्फाची पांढरी चादर आणि शांतता असते. बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की हिमवर्षाव आणि बर्फवृष्टीचा आनंद फक्त हिवाळ्यातच घेता येतो. पण ते तसं नाहीये. भारतात अशी काही ठिकाणे आहेत जिथे तुम्ही एप्रिल आणि मे सारख्या उष्ण महिन्यांतही बर्फाळप्रदेशात जाऊन या सर्वांचा आंनद घेऊ शकतात.

तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. तुम्हाला बर्फात खेळायचे असेल, बर्फावर ट्रेकिंगचा थरार अनुभवायचा असेल किंवा फक्त बर्फाच्छादित पर्वतांचे कौतुक करायचे असेल, भारतात अशी काही ठिकाणे आहेत जिथे तुम्हाला उन्हाळ्यातही थंडाव्याचा आनंद घेऊ शकता. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा 5 सुंदर ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला एप्रिल-मे महिन्यातही बर्फवृष्टीचा अनुभव देतील.

युमथांग व्हॅली (सिक्कीम)

युमथांग व्हॅलीला भारताचे स्वित्झर्लंड असेही म्हणतात. हे ठिकाण इतके सुंदर आहे आणि बर्फाने झाकलेले आहे की पाहणारे फक्त त्याकडे पाहत राहतात. एप्रिल आणि मे महिन्यातही येथे बर्फाची दाट चादर असते आणि आजूबाजूला बहरलेली रंगीबेरंगी फुले पाहून हे दृष्य मनाला स्पर्शून जाते. हे ठिकाण गंगटोकपासून सुमारे 140 किमी अंतरावर आहे आणि त्याला व्हॅली ऑफ फ्लॉवर्स म्हणूनही ओळखले जाते.

द्रास (लडाख)

द्रास हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात थंड वस्ती असलेला भाग मानला जातो. येथील हिवाळा अत्यंत कडक असतो, परंतु उन्हाळ्यातही उंचावरील भाग बर्फाने झाकलेले राहतात. एप्रिल-मे मध्येही येथे बर्फ दिसते. विशेषतः जर तुम्ही कारगिल आणि झोजिला खिंडीतून जात असाल तर. उन्हाळ्यातही तुम्ही येथे येऊन बर्फाचा पुरेपूर आनंद घेऊ शकता.

रोहतांग खिंड (हिमाचल प्रदेश)

मनालीपासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेला रोहतांग पास उन्हाळ्यात भेट देण्यासाठी एक अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे. एप्रिल आणि मे महिन्यातही येथे बर्फवृष्टी होत असते ज्यामुळे येथे बर्फाच्या खेळांचा पुरेपूर आनंद घेता येतो. जसे स्कीइंग, स्नोबोर्डिंग आणि स्नो बाइकिंग. हे ठिकाण जोडप्यांसाठी आणि मित्रांकरिता सुट्टीसाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे.

थाजीवास हिमनदी (जम्मू आणि काश्मीर)

सोनमर्गपासून काही किलोमीटर अंतरावर थाजीवास हिमनदी आहे. उन्हाळ्यातही बर्फाचा आनंद घेण्यासाठी हे ठिकाण परिपूर्ण आहे. येथे तुम्ही घोडेस्वारी, स्नो ट्रेकिंग आणि स्लेज रायडिंग सारख्या मजेदार ॲक्टिव्हिटी करू शकता. एप्रिल आणि मे महिन्यात येथील हवामान आल्हाददायक असते आणि येथील दृश्ये एखाद्या चित्रपटाच्या दृश्यापेक्षा कमी वाटत नाहीत.

5. सेला पास (अरुणाचल प्रदेश)

अरुणाचल प्रदेशातील उंच शिखरांमध्ये वसलेला सेला पास 13,700 फूट उंचीवर आहे. हे ठिकाण जवळजवळ वर्षभर बर्फाने झाकलेले असते आणि उन्हाळ्यातही तुम्हाला येथे बर्फ पहायला मिळेल. जर तुम्ही कमी गर्दीचे, शांत आणि नैसर्गिक सुंदर ठिकाण शोधत असाल तर सेला पासला नक्कीच भेट द्या.

युनेस्कोत शिवरायांचा गौरव; शिवराज्याभिषेक अन् राजमुद्रेचंही कौतुक
युनेस्कोत शिवरायांचा गौरव; शिवराज्याभिषेक अन् राजमुद्रेचंही कौतुक.
उद्या भारत बंद, 25 कोटी कामगारांचा सहभाग; 'या' सेवांवर होणार परिणाम
उद्या भारत बंद, 25 कोटी कामगारांचा सहभाग; 'या' सेवांवर होणार परिणाम.
अपघातग्रस्त कार भाजप आमदार सुरेश धसांच्या नावावर, नेमकं घडलं काय?
अपघातग्रस्त कार भाजप आमदार सुरेश धसांच्या नावावर, नेमकं घडलं काय?.
मध्यरात्र ते दुपारी 4 पर्यंत मीरारोडच्या मनसेच्या मोर्चात बघा काय घडल?
मध्यरात्र ते दुपारी 4 पर्यंत मीरारोडच्या मनसेच्या मोर्चात बघा काय घडल?.
खाकीला डाग! पुणे पोलीस दलात खळबळ, पोलिसानेच लाटले 73 तोळे सोने अन्...
खाकीला डाग! पुणे पोलीस दलात खळबळ, पोलिसानेच लाटले 73 तोळे सोने अन्....
मेळाव्यानंतर राज ठाकरेंचा संभ्रम? ठाकरे बंधू एकत्र पण युतीबद्दल काय?
मेळाव्यानंतर राज ठाकरेंचा संभ्रम? ठाकरे बंधू एकत्र पण युतीबद्दल काय?.
शिवसेनेच्या मंत्र्याची मनसेच्या मोर्चात एन्ट्री अन् काय घडल? बघा VIDEO
शिवसेनेच्या मंत्र्याची मनसेच्या मोर्चात एन्ट्री अन् काय घडल? बघा VIDEO.
ओम फट् स्वाहा...विरोधकांनी गोगावलेंना डिवचल, बघा VIDEO हसू अवरणार नाही
ओम फट् स्वाहा...विरोधकांनी गोगावलेंना डिवचल, बघा VIDEO हसू अवरणार नाही.
महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्...
महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्....
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार.