AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इम्युनिटी वाढवायचीये? तर मग रोज एका हिरव्या टोमॅटोचे सेवन करा, इतरही आहेत अनेक फायदे

हिरवा टोमॅटो हा व्हिटॅमिन सी ची (Vitamin C)खान असल्याचे मानले जाते. यामध्ये मोठ्याप्रमाणात व्हिटॅमिन सी असते. त्याचसोबत कॅल्शियम, पोटॉशिअम यांचे प्रमाण देखील मुबलक प्रमाणात असते.

इम्युनिटी वाढवायचीये? तर मग रोज एका हिरव्या टोमॅटोचे सेवन करा, इतरही आहेत अनेक फायदे
| Edited By: | Updated on: Jan 25, 2022 | 12:44 AM
Share

टोमॅटोचा वापर जवळपास सर्वच पदार्थांमध्ये होतो. त्याचबरोबर आपण टोमॅटो कच्चा देखील खाऊ शकतो.अनेकजण तर टोमॅटो सूप मोठ्या आवडीने पितात. मात्र अनेक जण फक्त पिकलेल्या लाल टोमॅटोचाच (Red tomato) आपल्या आहारात समावेश करतात. परंतु तुम्ही कधी हिरव्या टोमॅटोचे (Green tomato health benefits)नाव ऐकले आहे का? या हिरव्या टोमॅटोमध्ये अनेक औधषी गुणधर्म असतात. त्याचबरोबत तुम्हाला हिरव्या टोमॅटोमधून अनेक पोषण तत्त्वे मिळतात. हिरवा टोमॅटो हा व्हिटॅमिन सीची (Vitamin C)खान असल्याचे मानले जाते. यामध्ये मोठ्याप्रमाणात व्हिटॅमिन सी असते. त्याचसोबत कॅल्शियम, पोटॉशिअम यांचे प्रमाण देखील मुबलक प्रमाणात असते. आज आपण हिरव्या टोमॅटोच्या सेवनाने शरीराला कोणते फयदे होऊ शकतात हे जाणून घेणार आहोत.

डोळे

हिरवे टोमॅटो हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत चांगले असते. हिरव्या टोमॅटोमध्ये डोळ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या बिटा कॅरोटीनचे प्रमाण अधिक असते. हिरव्या टोमॅटोच्या नियमित सेवनामुळे दृष्टी दोष दूर होतो. त्याचबरोब डोळ्याच्या इतर छोट्या-मोठ्या समस्या देखील नाहिश्या होतात.

ब्लड प्रेशर

आजच्या युगामध्ये मानवाचे आयुष्य हे खूप फास्ट बनले आहे. त्यामुळे अनेकदा आपले आपल्या शरीराकडे दुर्लक्ष होते. यातूनच पुढे आपल्याला ब्लड प्रेशर सारखे आजार जडतात. ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी तुम्ही मग गोळ्यांचे सेवन चालू करता. मात्र गोळ्यांच्या अतिरेकामुळे आणखी नवी समस्या निर्माण होऊ शकते. मात्र तुम्ही जर रोज एक टोमॅटो खाल्ले तर तुमचे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकेल.

त्वचेसाठी उपयुक्त

देशात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले आहे. काही प्रमुख शहरातील एअर इंडेस्कने तर धोक्याची पातळी ओलांडली आहे. वाढत्या प्रदूषणामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. हिरव्या टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्याप्रमाणात असल्याने तुम्ही जर हिरव्या टोमॅटोचे सेवन केले तर त्वचेशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते.

इम्युनिटी वाढवण्यासाठी

हिरव्या टोमॅटोमध्ये असे अनेक औषधी गुणधर्म तसेच पोषण तत्वे असतात, ज्यामुळे तुमची इम्युनिटी देखील वाढते. तुम्हाला जर तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असल्यास दिवसातून एका तरी हिरव्या टोमॅटोचे सेवन करा.

टीप : वरील माहिती ही सामान्य ज्ञानाच्या आधारावर आहे, त्यामुळे तुम्ही तुमचा डायट प्लॅन ठरवताना डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.

संबंधित बातम्या

थंडीच्या दिवसात कमी पाणी प्यायलाने होऊ शकतो लकवा आणि ब्रेन स्ट्रोक, मेंदूची घ्या अशी काळजी !!

झोप पूर्ण होत नाहीये, चिडचिडेपणा वाढलाय?, चांगल्या झोपेसाठी फॉलो करा या टीप्स

शरद पवारांच्या तब्येतीबाबत नवाब मलिक यांनी दिली माहिती, मलिक म्हणतात…

Follow Us
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ...
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ....
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक...
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक....
ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंना...
ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंना....
आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोल
आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोल.
कांदा मोर्चात सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त....
कांदा मोर्चात सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त.....
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला..
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला...
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत.
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत...
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत....
महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक.
इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!
इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!.