AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वजन कमी करण्यासाठी रात्री ‘हे’ 5 पेये पिण्यास करा सुरुवात; 15 दिवसांत जाणवेल आश्चर्यकारक परिणाम

खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लोक वाढते वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जात असतात. पण या व्यतिरिक्त तुम्ही रोज रात्री काही विशिष्ट पेये प्यायल्याने 15 दिवसांत परिणाम दिसून येतो. हे पेये कॅलरीज बर्न करण्यास मदत करतात आणि वजन कमी करण्यास मदत करतात. चला तर मग या पेयांबद्दल जाणून घेऊयात...

वजन कमी करण्यासाठी रात्री 'हे' 5 पेये पिण्यास करा सुरुवात; 15 दिवसांत जाणवेल आश्चर्यकारक परिणाम
रात्री 'हे' 5 पेये पिण्यास करा सुरुवातImage Credit source: Instagram
Updated on: Jul 05, 2025 | 10:45 AM
Share

रोजच्या धावपळीच्या जीवनात लोकांसाठी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे एक आव्हानात्मक होत चालेलं आहे. कारण चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि अस्वस्थ जीवनशैलीमुळे लोकं अनेक प्रकारच्या आजारांना बळी पडत आहेत. सतत तासंतास काम करत राहणे. तसेच व्यायाम न करणे. यामुळे लोकांमध्ये मधुमेह आणि हृदयरोगांचा धोका झपाट्याने वाढत आहे. यासोबतच लठ्ठपणाची समस्या देखील दिसून येत आहे.

लठ्ठपणा सहज वाढतो पण तो कमी करणेही तितकेच कठीण आहे. वजन कमी करण्यासाठी लोकं दररोज जिममध्ये जातात. यासाठी त्यांना खूप पैसेही मोजावे लागतात. तर अनेकवेळा वेगवेगळ्या प्रकारचे डाएट देखील फॉलो करतात. जर तुम्हीही हे सर्व काही करून पाहिले असेल आणि तरीही तुमचे वजन कमी होत नसेल, तर आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला अशा काही पेयांबद्दल सांगणार आहोत जे तुम्ही रात्री प्यावे. जर तुम्ही हे करून पाहिले तर तुम्हाला फक्त 15 दिवसांत त्याचा परिणाम दिसेल. चला सविस्तर जाणून घेऊयात –

लिंबू पाणी

तुम्हाला जर वजन लवकर कमी करायचे असेल तर रात्री झोपण्यापूर्वी आणि जेवणानंतर लिंबू पाणी प्या. लक्षात ठेवा की पाणी कोमट असावे. यामुळे कॅलरीज लवकर बर्न होतील. त्यामुळे शरीरही स्वच्छ होईल. हे पेय तुमचे पचन निरोगी ठेवेल.

ग्रीन टी

बहुतेक लोकं वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी पितात . सहसा लोकं ग्रीन टी फक्त दिवसा पित असतात. तर या टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि कॅटेचिन असतात, जे चयापचय वाढवतात आणि फॅट बर्न करण्यास प्रोत्साहन देतात. जर तुम्ही झोपण्यापूर्वी ग्रीन टी प्यायली तर ते रात्रभर कॅलरीज बर्न करण्यास मदत करू शकते.

जिरे चहा

जिऱ्याचे चहा तुमचे वजन सहज कमी करण्यास मदत करू शकते. यासाठी तुम्हाला पुदिना, जिरे आणि आले मिसळून सुमारे 10 मिनिटे हे पाण्यात उकळवावे लागेल. थंड झाल्यावर हे पाणी तुम्ही जेवणानंतर अर्धा तासाने पिऊ शकता.

पुदिन्याचा चहा

पुदिन्याचा चहा प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. त्यामुळे पोटातील वायू देखील कमी होतात. झोपण्यापूर्वी एक कप पुदिन्याचा चहा प्यायल्याने तुम्हाला आरामदायी झोप मिळेल. त्याचबरोबर कॅलरीज जलद बर्न होण्यासही मदत होईल.

दालचिनी पाणी

अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी समृद्ध, दालचिनी रक्तातील साखर नियंत्रित करते. जर तुम्ही दररोज रात्री एक कप दालचिनीचे पाणी प्यायले तर तुमचे शरीर कॅलरीज जलद बर्न करू शकते. ज्याने वजन लवकर कमी होते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

सगळे आमदार माजले... फडणवीसांनी भर सभागृहात कोणाला फटकारलं?
सगळे आमदार माजले... फडणवीसांनी भर सभागृहात कोणाला फटकारलं?.
बदनापूर तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस; शेतांना आलं तळ्याचे स्वरूप
बदनापूर तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस; शेतांना आलं तळ्याचे स्वरूप.
मुलीला गलिच्छ शिव्या, आव्हाडांच्या पत्नीनं सांगितलं संपूर्ण प्रकरण
मुलीला गलिच्छ शिव्या, आव्हाडांच्या पत्नीनं सांगितलं संपूर्ण प्रकरण.
आव्हाडांना धमकी, काय म्हणाले शशिकांत शिंदे
आव्हाडांना धमकी, काय म्हणाले शशिकांत शिंदे.
हल्ल्यासाठी गुंड विधानभवनात आणले; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
हल्ल्यासाठी गुंड विधानभवनात आणले; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा.
..तो आमदार खुणावतो अन् मारहाण सुरू होते, आव्हाडांचा रोख नेमका कोणावर?
..तो आमदार खुणावतो अन् मारहाण सुरू होते, आव्हाडांचा रोख नेमका कोणावर?.
भास्कर जाधवांना हातवारे करणं भोवलं, विधान भवनाच्या पायऱ्यांवर लोटांगण
भास्कर जाधवांना हातवारे करणं भोवलं, विधान भवनाच्या पायऱ्यांवर लोटांगण.
Padalkar : तुम्हाला जमत नसेल तर मी बोलत नाही, पडळकर भरसभागृहात भडकले
Padalkar : तुम्हाला जमत नसेल तर मी बोलत नाही, पडळकर भरसभागृहात भडकले.
एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, 'विधान भवनाचं पावित्र्य ...'
एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, 'विधान भवनाचं पावित्र्य ...'.
भास्कर जाधवांवर का आली सभागृहात वारंवार माफी मागण्याची वेळ?
भास्कर जाधवांवर का आली सभागृहात वारंवार माफी मागण्याची वेळ?.