AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight loss: रात्रीच्या जेवणात या सोप्या रेसिपी करून पहा, यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यातही मदत होईल

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल आणि जर तुम्ही रात्रीच्या जेवणाचे हेल्दी पर्याय शोधत असाल तर आम्ही तुम्हाला यामध्ये थोडी मदत करू शकतो. आम्‍ही तुम्‍हाला अशाच काही सोप्या डिनर रेसिपीज सांगणार आहोत, ज्या चवदार असण्‍यासोबतच हेल्दी आणि पचनास हलक्याही आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घ्या...

Weight loss: रात्रीच्या जेवणात या सोप्या रेसिपी करून पहा, यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यातही मदत होईल
वेट लॉस करण्यासाठी या डिनर टिप्स फॉलो करा. Image Credit source: (Image Google)
| Edited By: | Updated on: Jun 17, 2022 | 1:54 PM
Share

वजन वाढणे आणि लठ्ठपणा (Fatness) यामागे आपला आहार हे प्रमुख कारण आहे. आहार जर बरोबर नसेल तर वजन वाढते. वजन वाढल्याने अनेक आजार होतात. तंदुरुस्त राहण्यासाठी लोक जिममध्ये जाणे सुरू करतात. ते त्यांच्या जीवनशैलीत (Lifestyle) बदल करतात, परंतु यासोबतच तुम्हाला आहारातही बदल करणे आवश्यक आहे. बहुतेक लोक जिम करण्यापूर्वी ( Gym diet tips ) आणि नंतर काय खावे याची विशेष काळजी घेतात, परंतु या दिनचर्यामध्ये तुमचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण देखील निरोगी असले पाहिजे. ( Healthy dinner recipes )लोक ब्रेकफास्ट आणि दुपारच्या जेवणाकडे जास्त लक्ष देतात, पण दिवसभराच्या थकव्यामुळे बहुतेक लोक रात्रीचे जेवण हलकेच करणं पसंत करतात.

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल आणि रात्रीच्या जेवणाचे हेल्दी पर्याय तुम्ही शोधत असाल तर आम्ही तुम्हाला यामध्ये थोडी मदत करू शकतो. आम्‍ही तुम्‍हाला अशाच काही सोप्या डिनर रेसिपीज सांगणार आहोत, जे चवदार असण्‍यासोबतच हेल्दी आणि पचनास हलक्याही आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घ्या….

ओट्स इडली

या अन्नामध्ये प्रथिने तसेच कर्बोदके असतात आणि ते फक्त रात्रीच्या जेवणातच नव्हे तर नाश्त्यातही इडली खाणं आरोग्यदायी मानलं जातं. जर तुम्हाला रात्रीच्या जेवणात ओट्स खायचे असतील तर त्यासाठी काहीतरी वेगळे करून पहा. ओट्स इडलीही आरोग्यदायी आहे आणि चवीलाही चांगली आहे. विशेष म्हणजे पोषक तत्वांनी युक्त ओट्स इडली बनवणे खूप सोपे आहे.

कोकोनट राईस

ही एक लाईट, सोपी आणि चवदार रेसिपी आहे, जी आहारतज्ञ देखील आजकाल खाण्याचा सल्ला देतात. कोकोनट राईसमध्ये कोबी घालून तुम्ही तो आणखी हेल्दी बनवू शकता. ही डिश बनवणेही सोपे आहे आणि खास गोष्ट म्हणजे यामुळे तुम्ही डिनरमध्ये काहीतरी युनिक देखील ट्राय करू शकता.

एग चाट

प्रथिने, हेल्दी फॅट्स आणि जीवनसत्त्वे असलेले अंडी दररोज योग्य प्रमाणात खावी. फक्त जिम वर्क आऊट करणाऱ्यांनीच नाही तर सामान्य लोकांनीही अंडी खावीत. वजन नियंत्रित करण्यासाठी तुम्ही रात्रीच्या जेवणात अंडा चाट ही रेसपी करून खाऊ शकता. यासाठी अंडी उकडून एका भांड्यात मॅश करा. त्यात पालक, टोमॅटो, कांदा आणि इतर भाज्यांचा समावेश करा. थोडे मीठ आणि मिरपूड घालून रात्रीच्या जेवणात खा. हे चविष्ट देखील आहे आणि तुम्हाला ते बनवताना जास्त त्रास सहन करावा लागणार नाही.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.