वेट लॉस करिता केटो डाएट फॉलो करताय? तर ‘या’ दुष्परिणामाचा करावा लागु शकतो सामना
वजन कमी करण्यासाठी अनेक डाएट्स असतात. त्यापैकी एक म्हणजे केटो डाएट जो जास्त फॅटयुक्त डाएट आहे ज्यामध्ये तुम्ही कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिनांचे सेवन कमी करता आणि तुमच्या आहारात अंडी, चिकन, मासे आणि दुग्धजन्य पदार्थ यांसारखे फॅटयुक्त पदार्थ तुमच्या आहारात समाविष्ट करता. जरी हा डाएट वजन कमी करण्यास मदत करतो परंतु त्याचे काही तोटे देखील आहेत. या लेखात आपण जाणून घेऊया की केटो डाएटचे तुमच्या शरीरावर कोणते दुष्परिणाम होऊ शकतात.

आजकाल प्रत्येकजण वाढत्या वजनाने त्रस्त आहेत. त्यामुळे अनेकजण वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय करतात. कारण वजन वाढल्याने आपले शरीराचे आणि आरोग्याचे स्वरूपच बिघडते असे नाही तर शरीर हळूहळू आजारांचे घर बनते. आजकाल लोकं लहान वयातच मधुमेहासारख्या गंभीर आजारांना बळी पडत आहेत. याशिवाय, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल किंवा इतर आरोग्य समस्या असणे सामान्य झाले आहे. अशा परिस्थितीत वजन नियंत्रित करणे खूप महत्वाचे आहे. म्हणून, वजन कमी करण्यासाठी अनेक पद्धती वापरल्या जातात, त्यापैकी एक म्हणजे केटो डाएट. जे लोकं हा डाएट करतात ते कमी कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांचे सेवन करतात आणि जास्त फॅटयुक्त पदार्थांचा समावेश करतात. याद्वारे, शरीरातील फॅट बर्न करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते.
या आहारामुळे वजन लवकर कमी होते पण तुम्हाला माहिती आहे का की त्याचे अनेक दुष्परिणाम देखील आहेत. सोशल मीडियावरील व्हिडिओ किंवा इतर ट्रेंड पाहिल्यानंतर लोकं अशा आहाराचे पालन करण्यास सुरुवात करतात परंतु त्यापैकी बहुतेकांना त्यांचे दुष्परिणाम माहित नसतात. निरोगी आहाराची ही पद्धत तुमच्यासाठी कशी हानिकारक ठरू शकते ते आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत…
केटो डाएट म्हणजे काय?
केटो डाएटमध्ये कमी कार्ब आणि जास्त फॅटयुक्त पदार्थांचे सेवन या सूत्रावर लक्ष केंद्रित केले जाते. तज्ञांच्या मते, यासाठी शरीराला केटोसिस नावाच्या चयापचय परिस्थितीत आणणे आवश्यक आहे. खरंतर, जेव्हा शरीर केटोसिसच्या स्थितीत असते तेव्हा ते उर्जेसाठी ग्लुकोजऐवजी फॅट बर्न करण्यास सुरुवात करतात. केटो डाएटमध्ये तुम्ही अंडी, मासे, मांस यांसारखे पदार्थ आहारात समाविष्ट करता. याशिवाय, सुकामेवा, पालक, ब्रोकोली सारख्या हिरव्या पालेभाज्या आणि दूध, दही सारखे दुग्धजन्य पदार्थ आहाराचा भाग बनवले जातात.
केटो डाएटचे दुष्परिणाम काय आहेत?
शरीरात पोषणाची कमतरता असू शकते
केटो डाएटचे फॉलो केल्याने तुमच्या शरीरात आवश्यक पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते. कारण या आहारात तुम्ही फळे, भाज्या, प्रथिने आणि कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांचे सेवन करत नाही, ज्यामुळे हा डाएट जास्त काळ फॉलो केल्याने तुमच्या शरीरात प्रथिनांची कमतरता निर्माण होऊ शकते.
हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
केटो डाएटमध्ये आपण आपल्या आहारातून कार्बोहायड्रेट्सचे सेवन कमी करतो. ज्यामुळे तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे जी लोकं दीर्घकाळ केटो डाएट फॉलो करतात. त्यांना इतरांपेक्षा हृदयविकाराचा धोका जास्त असतो. केटो डाएटमध्ये फक्त फॅटयुक्त पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. पण फक्त फॅटयुक्त पदार्थ खाल्ल्याने तुमच्या शरीराला जास्त पोषक तत्वे मिळत नाहीत.
किडनीच्या आजारांचा धोका वाढू शकतो
आहारात अंडी, मासे, मांस यांसारखे जास्त फॅटयुक्त पदार्थ समाविष्ट केल्याने किडनीशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे तुम्हालाही किडनी स्टोन होऊ शकतात.
पचनाच्या समस्या उद्भवू लागतात
केटो डाएटमध्ये तुम्ही जास्त फॅटयुक्त पदार्थ खाता आणि आहारात कार्बोहायड्रेट्सचा समावेश केला जात नाही. अंडी, मासे, दूध आणि दही यांसारखे फॅटयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने तुमची पचनसंस्था कमकुवत होऊ शकते. हेच कारण आहे की केटो डाएट फॉलो केल्याने तुम्हाला बद्धकोष्ठता, आम्लता आणि अपचन यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
