Health | ‘सुस्ती’ला द्या सुट्टी: म्युझिक ते स्ट्रेचिंग; कामाच्या वेळी आळस घालविण्याचे सर्वोत्तम पर्याय

Health | 'सुस्ती'ला द्या सुट्टी: म्युझिक ते स्ट्रेचिंग; कामाच्या वेळी आळस घालविण्याचे सर्वोत्तम पर्याय
आकड्यांचा गोलमाल की खरखुरं चित्र, जाणून घ्या बेरोजगारी दराविषयीचं नेमकं वास्तव

तुम्ही कामादरम्यान सुस्ती अनुभवत असल्यास 'ब्रेक' घेणं अत्यंत महत्वाचं आहे. मानवी शारीरिक क्रियांचा अभ्यास करणाऱ्या कॕनडा येथील संशोधकांनी महत्वाचे निष्कर्ष मांडले आहेत. कामाच्या वेळेदरम्यान प्रति एक तासाने ब्रेक घेण्याचा सल्ला देतात आणि 15 मिनिटे केवळ उभे राहण्याचे सुचविले आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Dec 19, 2021 | 10:18 PM

नवी दिल्ली: क्षणभर विचार करा, तुम्ही कार्यालयात आहात आणि अचानक तुम्हाला जांभाई येण्यास सुरुवात झाली आणि तुमचे डोळे मिटायला सुरुवात झाली. कामाच्या वेळी अशी स्थिती निर्माण होणं नक्कीचं आवडणार नाही. त्यामुळे कार्यालयीन दुपारच्या वेळेत तुम्हाला येणारी सुस्ती घालविण्यासाठी आमची सुचवतोय तुम्हाला काही पर्याय-

लंचनंतर काय करावे?

शरीरासाठी दुपारच्या जेवणानंतरची क्रियाशीलता अत्यंत महत्वाची आहे. तुम्ही घेतलेला आहाराच्या पचनासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. त्यामुळे अन्नद्रव्यातील शर्करेला स्थिर करतात. जेणेकरुन जेवणानंतर तुम्हाला येणारी झोप टळली जाते. तुम्ही जेवण केल्यानंतर काही ठराविक अंतर चालण्याचा दिनक्रम अंगिकारा. जेवणानंतर त्वरित पुन्हा काम सुरु करणे टाळा. काही पावलं चालणे किंवा स्ट्रेचिंग डोळ्यांना येणारी सुस्ती टाळण्यासाठी मदतगार ठरतील. तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि तुम्ही सदैव उर्जावान राहतात.तुम्ही आर्म सर्कल,नेक रोल आणि सीटेड स्पायनल ट्विस्ट सारख्या कमी श्रमाच्या शारीरिक हालचाली करू शकतात.

स्ट्रेचिंगमुळे आपल्या शरीरातील स्नायू लवचिक आणि मजबूत बनतात.त्यामुळे कार्यशील राहण्यासाठी आणि परिपूर्ण आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते

कामात हवा ‘ब्रेक’

तुम्ही कामादरम्यान सुस्ती अनुभवत असल्यास ‘ब्रेक’ घेणं अत्यंत महत्वाचं आहे. मानवी शारीरिक क्रियांचा अभ्यास करणाऱ्या कॕनडा येथील संशोधकांनी महत्वाचे निष्कर्ष मांडले आहेत. कामाच्या वेळेदरम्यान प्रति एक तासाने ब्रेक घेण्याचा सल्ला देतात आणि 15 मिनिटे केवळ उभे राहण्याचे सुचविले आहे. कामानंतर ठराविक काळाने चालणे किंवा उभे राहण्यामुळे हृद्याच्या गतीत वाढ होते. ज्यामुळे थकव्यावर मात करण्यासाठी अधिक उर्जा प्राप्त होते. त्यामुळे तुम्हाला अशाप्रकारचा अनुभव पुन्हा आल्यास नक्कीच फेरफटका मारण्याचा प्रयत्न करुन बघण्यास हरकत नाही.

बाहेर पडा

सूर्यकिरणांमुळे आपल्या शरीरातील सेरोटोनिनच्या पातळीत वाढ होते. ज्यामुळे अधिक उर्जावान,शांत,सकारात्मक आणि एकाग्रतेत निश्चितच वाढ होते. त्यामुळे शक्यतो तुमच्या कामाच्या जागेवरुन अर्थात डेस्कच्या बाहेर जाऊन क्षणभर फेरफटका मारा. मोकळ्या हवेत घालविलेल्या काही क्षणांमुळे तुमच्या मूडमध्ये बदल जाणवेल आणि कामामधील कार्यशीलतेत निश्चितच सुधारणा होईल.

म्युझिकचं ट्युनिंग

अलीकडच्या काळात अनेक वर्कप्लेसमध्ये अंतर्गत संगीत सिस्टीम देखील असते. त्यामुळे कामाच्या ठिकाणी फ्रेशनेस टिकून राहण्यात निश्चितच मदत होते. तुम्हाला संधी मिळत असल्यास निश्चितच म्युझिकशी ट्युनिंग जमवा. तुमच्या सुस्तीची क्षणार्धात सुट्टी झाल्याविना राहणार नाही.

इतर बातम्या

सीलबंद पाण्याची ‘एक्स्पायरी’ तपासली का? जाणून घ्या महत्वाची कारणे

लहान मुलांचे डोळे लाल होणे, यामागची कारणं आणि उपाय

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें